News

वेस्ट इंडिज विरूद्ध भारत दुसरा टी२०आयः पाच विकेट्सच्या विजयाने विंडीजकडून विजयाची बरोबरी

By Mumbai Indians

वेस्ट इंडिजने भारतावर वॉर्नर पार्क येथे झालेल्या सामन्यात पाच विकेट्सने विजय प्राप्त करून टी२०च्या पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ ची बरोबरी केली.

डेवॉन थॉमसने शेवटच्या टप्प्यात केलेली धुंबाधार फलंदाजी (१९ चेंडूंमध्ये ३१ धावा) आणि ओपनर ब्रँडन किंगच्या ६८ धावांमुळे यजमान संघावर आलेला ताण कमी करून १९.२ ओव्हर्समध्ये १३९ धावांचे लक्ष्य सहजसाध्य झाले. सामन्याच्या पहिल्या सत्रात जलदगती गोलंदाज ओबेड मॅकॉयच्या ६/१७ या धमाकेदार खेळीशिवाय हा विजय शक्य झाला नसता.

वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही टीम्सनी आपल्या ११ च्या संघात बदल करण्याचा पर्याय निवडला. भारतासाठी रवी बिष्णोईच्या जागेवर अवेश खानला संधी देण्यात आली.

यजमान वेस्ट इंडिजने कीमो पॉल आणि शमरा ब्रुक्सऐवजी ब्रँडन किंग आणि डेवॉन थॉमसला खेळण्यासाठी उतरवले.

भारताची सुरूवात थोडी डळमळीतच झाली. विंडीजचा ओबेड मॅकॉय आणि अल्झारी जोसेफ यांनी पाहुण्या संघाला पॉवरप्लेमध्ये ५६/३ वर आणले. कर्णधार रोहित शर्मा शून्यावर बाद झाला आणि टी२०आय इनिंग्सच्या पहिल्याच चेंडूवर बाद होणारा हा तिसरा भारतीय खेळाडू ठरला.

भारतीय संघाने ६.३ आणि १३.४ या दरम्यान रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या यांच्यादरम्यान ४३ धावांची भागीदारी पाचव्या विकेटसाठी जोडल्यामुळे तग धरला. त्यांनी भारताला १०० धावा पूर्ण करून दिल्या. भारताने १०० धावांची  आकडेवारी १२.५ ओव्हर्समध्ये पूर्ण केली.

परंतु, जडेजा १७ व्या ओव्हरमध्ये बाद झाल्यानंतर भारताच्या विकेट्स एकामागून एक जाऊ लागल्या. शेवटी ते १९.४ ओव्हर्समध्ये १३८ धावांवर सर्वबाद झाले.

ओबेड मॅकॉय याने आज भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले. त्याने टी२०आय क्रिकेटमध्ये आपल्या करियरमधील सर्वोत्कृष्ट ६/१७ ची कामगिरी केली. हा डावखुरा जलदगती गोलंदाज टी२०आयमध्ये भारताविरूद्ध पाच विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला  आहे.

विंडीजने १३९ धावांचा पाठलाग करतून पहिल्या सहा ओव्हर्समध्ये ४६/० अशी सुलभ धावसंख्या रचली.

परंतु पुढच्या चार ओव्हर्समध्ये यजमान संघाने २७ धावा काढून दोन विकेट्स गमावल्या. हार्दिक पंड्याने कायली मेयर्स (८)ची विकेट घेतली तर स्पिनर रवीचंद्रन अश्विनने वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनला १४ धावांवर बाद केले.

विंडीजचा ओपनर ब्रँडन किंग १२ ओव्हरच्या शेवटी अर्धशतक पूर्ण करून ६८ धावांवर बाद झाला. तेव्हा त्याच्या टीमला हा सामना डिंकण्यासाठी पुढील २७ चेंडूंवर ३२ धावांची गरज होती.

आपला सहावा टी२०आय खेळणाऱ्या डेव्हॉन थॉमसने १९ चेंडूंवर ३१ धावा काढून आपला वेग कायम ठेवला. त्याने अर्शदीप सिंग, अवेश खान आणि हार्दिक पंड्या यांच्या गोलंदाजीवर हल्ला करून यजमान संघाला विजय मिळवून दिला.

विंडीजने आपली इनिंग १४१/५ वर १९.४ ओव्हर्समध्ये पूर्ण केली. त्यांनी शेवटच्या सहा चेंडूंवर १० धावा फटकावल्या.

हा सामना वेस्ट इंडिजसाठी अटीतटीचा ठरला कारण त्यांना शेवटच्या तीन ओव्हर्समध्ये १८ चेंडूंवर २७ धावांची गरज होती.

परंतु १८ व्या आणि १९ व्या ओव्हर्समध्ये भारतीय गोलंदाजांनी १७ धावा दिल्या. त्यामुळे डेव्हॉन थॉमस (३१*) आणि ओडियन स्मिथ (४*) यांना वेस्ट इंडिजला फिनिश लाइनपलीकडे नेता आले.

आता दोन्ही संघ मंगळवार दिनांक २ ऑगस्ट रोजी तिसऱ्या टी२०आय सामन्यासाठी आमनेसामने येतील.