WPL लिलाव २०२७: लिलावाच्या मोठ्या दिवसाआधी जाणून घ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी!

WPL लिलाव २०२७: लिलावाच्या मोठ्या दिवसाआधी जाणून घ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी!

By Mumbai Indians

पलटन, आता लिलावाबाबत चर्चा आणि रणनीती आखण्याची वेळ आली आहे. मंच सज्ज आहे, बोली लावण्यासाठी पॅडल्स तयार आहेत आणि WPL विजेतेपदासाठीची चुरस आता आणखी रंगणार आहे. प्रत्येक फ्रँचायझी आपल्या संघाची योग्य बांधणी करण्यासाठी आणि सामन्याचं चित्र पालटू शकणाऱ्या नव्या खेळाडूंच्या शोधात असताना, २८ ऑक्टोबर २०२६ रोजी कोची येथे होणारा WPL लिलाव चांगलाच रंगतदार ठरणार आहे. मुंबई इंडियन्ससाठी मात्र निळ्या आणि सोनेरी रंगांचा विजयी वारसा पुढे नेणं आणि पुन्हा एकदा विजेतेपदाचं स्वप्न साकार करण्यासाठी मजबूत संघ उभारणं, हेच मुख्य ध्येय असणार आहे.

WPL २०२७ साठी मुंबई इंडियन्सने कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी पाहिली नसेल, तर इथे नक्की वाचा!

WPL २०२७ च्या लिलावात उपलब्ध असलेल्या २७ जागांसाठी एकूण १४६ खेळाडूंची चुरस पाहायला मिळणार आहे. लिलावासाठी नोंदणी केलेल्या खेळाडूंमध्ये ११९ भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. यापैकी २२ खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे, तर ९७ खेळाडू अद्याप आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले नाहीत. भारतीय खेळाडूंसाठी एकूण २० जागा उपलब्ध असतील. दुसरीकडे, परदेशी खेळाडूंच्या यादीत २७ जणांचा समावेश असून, त्यापैकी सहा खेळाडू असोसिएट देशांमधील आहेत. या २७ खेळाडूंपैकी १४ जण आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले आहेत, तर १३ खेळाडू अनकॅप्ड आहेत. परदेशी खेळाडूंसाठी एकूण सात जागा उपलब्ध असणार आहेत.

WPL लिलावाच्या यादीत भारतासह जगभरातील अनेक दिग्गज आणि अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये दोन खेळाडूंनी सर्वाधिक ५० लाख रुपये मूळ किंमतीच्या गटात नोंदणी केली आहे. चार खेळाडू ४० लाख रुपयांच्या गटात आहेत, तर ३० खेळाडूंनी ३० लाख रुपये मूळ किंमतीसह लिलावात आपलं नाव नोंदवलं आहे.

मुंबई इंडियन्सबद्दल बोलायचं झालं, तर संघाने आतापर्यंत १४.१ कोटी रुपये खर्च केले आहेत. आता संघाच्या पर्समध्ये ९० लाख रुपये शिल्लक असून, आणखी सहा जागा भरायच्या आहेत. मात्र परदेशी खेळाडूंसाठीच्या सर्व जागा आधीच भरल्या आहेत.

लिलावासाठी नोंदणी केलेल्या १४६ खेळाडूंची विभागणी पुढीलप्रमाणे आहे:

अ. क्र. खेळाडूंची श्रेणी खेळाडूंची संख्या
१ कॅप्ड भारतीय खेळाडू २२
२ कॅप्ड परदेशी खेळाडू १४
३ अनकॅप्ड भारतीय खेळाडू ९७
४ अनकॅप्ड परदेशी खेळाडू १३
एकूण   १४६

प्रत्येक बोलीसोबत एक नवी संधी निर्माण होणार आहे आणि प्रत्येक खेळाडूच्या निवडीमुळे संघासाठी नव्या शक्यतांचे दरवाजे उघडणार आहेत. WPL च्या नव्या पर्वाची उलटगणती आता सुरू झाली आहे!