News

आपल्या पहिल्याच सीझनमध्ये लक्षवेधी खेळी करणाऱ्या तरूण तडफदार तोफा

By Mumbai Indians

तरूण आणि तडफदार खेळाडूंनी सळसळत्या संघात काही खेळाडूंना आपला खेळ दाखवण्याची संधी मिळाली.

कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने आणि उर्वरित सहाय्यक कर्मचारी आणि खेळाडू यांनी कायमच आपल्याला नवीन खेळाडूंचा दृष्टीकोन कसा आवडला आहे आणि त्यांनी संघाला एक स्थैर्य आणून दिल्याबद्दल चर्चा केली आहे.

या सीझनमध्ये आपल्या खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेणारे काही खेळाडू पाहा.

तिलक वर्मा

सीझनपूर्वी लक्ष ठेवण्यात आलेल्या तरूण टॅलेंटपैकी एक असलेल्या तिलकने सर्वांच्याच अपेक्षा पूर्ण करून दाखवल्यात.

तो आमच्यासाठी सर्वही १४ सामने खेळला. त्याने या सामन्यांमध्ये ३९७ धावा काढल्या. ही धावसंख्या टीममध्ये ईशान किशनने काढलेल्या धावांच्या मागोमागची दुसऱ्या क्रमांकाची ठरली. टाटा आयपीएल सीझनमध्ये किशोरवयीन खेळाडूने काढलेल्या या सर्वाधिक धावा ठरल्या.

त्याचा स्ट्राइक रेट १३१.०२ होता आणि सर्वोत्तम भाग म्हणजे विविध जबाबदाऱ्या आणि परिस्थितींमध्ये त्याची कार्यपद्धती या गोष्टी होत्या.

तिलकने क्र. ३, क्र. ४ आणि क्र. ४ वर फलंदाजी केली. तो अनेकदा संघाची खेळी कोसळण्याच्या बेतात असताना खेळायला आला आणि आपली परिपक्वता आणि कामगिरी यांतून त्याने टीमचा विश्वास वाढवलाय.

डेवाल्ड ब्रेविस

डेवाल्ड ब्रेविस हा थेट यू१९ वर्ल्ड कपमधून खेळायला आला होता. त्याच्या नावावर सर्वाधिक धावांचा विक्रम नोंदवलेला होता. त्यामुळे या सीझनमध्ये त्याला जास्त प्रेक्षकांसमोर आपला खेळ दाखवण्याची आणि चमकण्याची संधी मिळाली.

पहिल्या फळीत मुख्यत्वे खेळायला आलेल्या डीबीने त्याने खेळलेल्या सात सामन्यांत १६१ धावा काढल्या आणि त्याने आपल्या फटकेबाजीने खेळाला गती मिळवून दिली.

सीझनमधली डीबीची प्रत्येक इनिंग त्याच्या शॉट्सचे टायमिंग आणि बॅटचे सुंदर वळण यांनी परिपूर्ण होती. पंजाब किंग्सविरूद्ध त्याने फटकावलेले चार सिक्सर हे प्रेक्षकांना भरपूर आनंद देणारे होते.

कुमार कार्तिकेय सिंग

सीझन सुरू होण्यापूर्वी आपले आयुष्य बदलणार आहे याची कल्पनाही कार्तिकेयने देखील केली नसेल. एक सहाय्यक गोलंदाज म्हणून खेळ सुरू केलेल्या कार्तिकेयला दुखापतग्रस्त अर्शद खानच्या बदली खेळाडू म्हणून संघात आणले गेले आणि त्याने आपला पहिला सामना आरआरविरूद्ध खेळला.

त्याने आपल्या टाटा आयपीएल करियरच्या दुसऱ्याच बॉलवर विरोधी कर्णधार संजू सॅम्सनची विकेट घेतली आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.

कार्तिकेयने खेळलेल्या चार सामन्यांमध्ये पाच विकेट्स ७.८४ इतक्या इकॉनॉमी रेटने घेतल्या. पण महत्त्वाचे म्हणजे त्याने आपल्या गोलंदाजीतल्या वैविध्यपूर्णतेने विरोधी खेळाडूंना आश्चर्याचे धक्के दिले.

क्लासिक डाव्या हाताच्या स्पिन, रिस्ट स्पिन आणि फ्लिपर गोलंदाजी करण्याची क्षमता असलेल्या कार्तिकेयने आपल्या या वैविध्यपूर्णतेचा उत्तम वापर केला आणि त्याच्यावर मात करणे कठीण गेले.

हृतिक शौकीन

प्रथमच टी२० खेळणाऱ्या क्रिकेटपटू असणारा हृतिक शौकीन अजिबात नवखा वाटत नव्हता.

या सीझनमध्ये पाच सामन्यांत हृतिकने ४३ महत्त्वाच्या धावा काढल्या आणि दोन विकेट्स घेतल्या. चेंडू कसा टोलवायचा आणि लाइन आणि लांबीचे त्याचे ज्ञान सर्वांना आश्चर्यात टाकणारे ठरले.

हृतिकने तीन इनिंग्समध्ये फलंदाजी केली आणि सीएसकेविरूद्ध दोन्ही सामन्यांत त्याने टीमची सुटका केली.

त्याला वरच्या फळीत पाठवण्यात आले आणि त्याने तिलक वर्मासोबत उत्तम भागीदारी करून टीमला कोसळण्यापासून सावरले. दुसऱ्या वेळी त्ये आम्हाला अत्यंत कठीण धावांचा पाठलाग करून विजय मिळवायला मदत केली.

आमच्या या तरूण तडफदार तोफा जगातल्या सर्वांत मोठ्या व्यासपीठांपैकी एकावर चमकू लागल्यात. त्यांचे भवितव्य उत्तम आहे यात शंकाच नाही. ते आम्हाला एक चांगली टीम बनवण्यासाठी मदत करतील आणि आगामी काळात त्यांचे आणि टीमचे भविष्य उज्ज्वल असेल.