
ऐतिहासिक लढाई, अटीतटीचा लढा... परंतु सामना थोडक्यात हातातून निसटला
लॉर्ड्सच्या मैदानात दोन मोठ्या क्रिकेटपटू देशांमध्ये एक ऐतिहासिक सामना खेळवला गेला. या सामन्यात यजमान संघ विजयी झाला आणि त्यांनी पाच सामन्यांच्या मालिकेत आपली आघाडी कायम ठेवली.
या सामन्यात टीम इंडियाने अटीतटीने आपली झुंज शेवटपर्यंत कायम ठेवली. परंतु दुर्दैवाने आपण हा सामना हरलो.
नमनाला घडाभर तेल न ओतता लंडनमध्ये नक्की काय काय घडले याचा आढावा घेऊया.
दिवस १ | एक ‘शेअर्ड’ दिवस
प्रथम गोलंदाजी करायला उतरलेल्या आपल्या गोलंदाजांनी पहिल्या दिवशी अत्यंत अचूक गोलंदाजी केली आणि ब्रिटिश फलंदाजांना हात मोकळा सोडू दिला नाही.
आपली पहिली विकेट १४ व्या ओव्हरमध्ये आली. नितीश कुमार रेड्डीचे दोन चेंडू दोन्ही ब्रिटिश सलामी फलंदाजांना आपल्यासोबत पॅव्हिलियनला परत घेऊन गेले. 👏
Nitish Kumar Reddy came out of syllabus 😎#MumbaiIndians #ENGvIND pic.twitter.com/WFBhamJfkf
— Mumbai Indians (@mipaltan) July 10, 2025
आपल्या नंबर १ कसोटी गोलंदाज असलेल्या जस्सीने नंबर १ कसोटी फलंदाज असलेल्या हॅरी ब्रूकला बाद केले. इंग्लंडचा दिवस २५१/४ वर संपला. जो रूट आणि बेन स्टोक्स यांनी अनुक्रमे नाबाद ९९ आणि ३९ धावा केल्या.
📝 स्टंप्स, दिवस १: इंग्लंड - २५१/४ (८३ ओव्हर्स)
दिवस २ | क्रिकेटच्या पंढरीत बुमराहची धमाल
आदल्या दिवशी फक्त एक विकेट घेऊन बूम शांत बसणार नव्हताच. त्याचा हेतू तर या वेळी अगदीच स्पष्ट होता!
पहिल्या सत्रात आपल्या या आघाडीच्या जलदगती गोलंदाजाने तीन विकेट्स घेतल्या. कसोटीमध्ये ११ व्या वेळी त्याने जो रूटला बाद केले. 💥
हा 𝐛𝐚𝐭𝐭𝐥𝐞 नाही, 𝐁𝐮𝐦𝐫𝐚𝐡 𝐜𝐡𝐚 𝐩𝐚𝐭𝐭𝐞𝐫𝐧 आहे!#MumbaiIndians #ENGvIND pic.twitter.com/3wxhndGIpQ
— Mumbai Indians (@mipaltan) July 11, 2025
त्याने जोफ्रा आर्चरची विकेट घेतली आणि एक खास विक्रम नोंदवताना महान खेळाडू कपिल देवला मागे टाकले. मोहम्मद सिराजने जेमी स्मिथ आणि ब्रायडन कार्सेच्या विकेट्स घेतल्या. या दोघांनीही अर्धशतके नोंदवली. संघ ३८७ वर बाद झाला.
📰 जसप्रीत बुमराह ने रचा इतिहास! 🇮🇳#MumbaiIndians #ENGvIND pic.twitter.com/U927CZha7F
— Mumbai Indians (@mipaltan) July 11, 2025
भारतीय फलंदाजांनी सुरूवातीचा ताण कमी करताना चांगली कामगिरी केली. ओपनर केएल राहुलने एकीकडे गड रोखून धरत नाबाद ५३ धावा केल्या.
📝 स्टंप्स, दिवस २: भारत - १४५/३ (८३ ओव्हर्स) २४२ धावांची पिछाडी
दिवस ३ | केएल- पंत- जड्डू यांची लॉर्ड्सवर पैसा वसूल दिनी चमकदार कामगिरी
केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी खेळाचा वेग आपल्या दिशेने फिरवण्यासाठी अत्यंत परिपक्वतेने काम केले.
लॉर्ड्सवर अनेक शतके ठोकणारा केएल हा दुसराच भारतीय ठरला तर पंतने ७४ धावा करताना आपला सर्व कस पणाला लावला. 💪
Rahul gets to a big milestone at Lord’s! 😃
— Mumbai Indians (@mipaltan) July 12, 2025
But dismissed the very next ball 🙁#MumbaiIndians #ENGvIND pic.twitter.com/BvZ92q1gSw
त्यानंतर सर दि जाडेजा यांनी सलग तिसरे अर्धशतक (७२) नोंदवून धावांमधील अंतर कमी केले तर नितीश रेड्डी (३०) आणि वॉशिंग्टन सुंदर (२३) यांनी चांगले योगदान दिले. स्टंप्सच्या वेळी धावसंख्या ३८७ वर समसमान होती. ⚖️
अर्थात या रोमांचक दिवसाची आठवण काढायची झाल्यास ती शेवटची ओव्हर विसरून चालणार नाही. बुमराह गोलंदाजी करत होता. चाहते ब्रिटिश ओपनर्सचे कौतुक करत होते. शुभमनचा आक्रमक खेळ … लाँग लिव्ह टेस्ट क्रिकेट!
Last over of the Day 3️⃣#MumbaiIndians #ENGvIND pic.twitter.com/9TBQxNA1Wk
— Mumbai Indians (@mipaltan) July 12, 2025
📝 स्टंप्स, दिवस ३: इंग्लंड - २/० (१ ओव्हर) दोन धावांची आघाडी
दिवस ४ | दोन्ही टीम्सच्या गोलंदाजांनी केला कहर
या सीझनची ही जबरदस्त सुरूवात होती!
भारताच्या गोलंदाजांनी इंग्लंडला दुपारपर्यंत ९८/४ वर रोखले आणि त्यांना १९२ मध्ये गुंडाळून टाकले. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर या वेळी चांगलाच चमकला. त्याने फक्त २२ धावा देऊन ४ विकेट्स घेतल्या. 👌
आपल्यासमोर १९३ धावांचे लक्ष्य असताना इंग्लिश गोलंदाजांनी मार्ग सोपा नसेल याची काळजी घेतली. पाचव्या दिवशी चारही निकाल शक्य होते.
14 wickets on Day 4 🤯
— Mumbai Indians (@mipaltan) July 13, 2025
🇮🇳 135 runs away from a W ➡ 𝐁𝐎𝐗 𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐄 Day 5 awaits 🍿#MumbaiIndians #ENGvIND
📝 स्टंप्स, दिवस ४: भारत - ५८/४ (१७.४ ओव्हर्स) विजयासाठी १३५ धावांची गरज
दिवस ५ | खालच्या फळीचा प्रतिबंध, परंतु इंग्लंडचा विजय …
सलग तिसरा कसोटी सामना पाचव्या दिवसापर्यंत पोहोचला. परंतु हा सामना लॉर्ड्सवर खेळला जात असल्याने जास्त खास होता.
बूम- जड्डू या जोडीने अत्यंत प्रयत्नपूर्वक लढा दिला. त्यांनी धावफलक हलता ठेवला आणि २२ ओव्हर्स फलंदाजी करत आपल्याला लक्ष्याच्या जवळ आणले. जडेजाने नाबाद ६१ धावा केल्या. भारतीय संघ विजयाच्या अगदी जवळ येऊन पोहोचला.
𝐒𝚰𝐑 ℝ𝔸𝕍𝕀ℕ𝔻ℝ𝔸 𝕁𝔸𝔻𝔼𝕁𝔸 ⚔ fought like a stallion 🐎#MumbaiIndians #ENGvIND pic.twitter.com/se5Zug7eIg
— Mumbai Indians (@mipaltan) July 14, 2025
दुर्दैवाने आजचा दिवस आपला नव्हता. इंग्लंडच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे सामन्याच्या अंतिम टप्प्यात भारतीय फलंदाजांना गुंडाळून टाकले. सिराज शेवटी बाद झाला. शोएब बशीरच्या गोलंदाजीवर चेंडू त्याच्या स्टंप्सवर धावत गेला.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम आता येत्या २३ जुलै रोजी मँचेस्टरवर होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात पुनरामनासाठी प्रतीक्षेत असेल.
**********
थोडक्यात धावसंख्या: इंग्लंड ३८७/१० (जो रूट १०४, जसप्रीत बुमराह ५/७४) आणि १९२/१० (जो रूट ४०, वॉशिंग्टन सुंदर ४/२२) कडून भारताचा २२ धावांनी पराभव ४६५/१० (केएल राहुल १००, ख्रिस वोक्स ३/८४) आणि १७०/१० (रवींद्र जडेजा ६१*, बेन स्टोक्स ३/४८).