News

Ind vs SI: चौथ्या T20 I मध्ये भारताला बरोबरीची संधी

By Mumbai Indians

विशाखापट्टण येथे आयोजित तिसऱ्या टी२०आय सामन्यात ४८ धावांनी दिमाखदार विजय मिळवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ शुक्रवारी १७ जून रोजी राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर चौथ्या टी२०आय सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध बरोबरी करण्यासाठी उत्सुक असेल.

सुरूवातीला ०-२ ने पिछाडीवर असलेल्या भारताकडून पाच सामन्यांच्या टी२०आय मालिकेत सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड (५७) आणि ईशान किशन (५४) यांनी दुहेरी अर्धशतक झळकवले. त्यापाठोपाठ जलदगती गोलंदाज हर्षल पटेलच्या चार विकेट्सची खेळी आणि लेगस्पिनर युजवेंद्र चहलच्या ३/२० खेळीमुळे विजग येथे फॉर्ममध्ये असलेल्या प्रोटीआजवर उत्तम प्रकारे विजय मिळवता आला. त्यापूर्वी ऋषभ पंतच्या मेन इन ब्लूना दिल्ली येथे सात विकेटनी तर कटक येथे चार विकेटनी हार पत्करावी लागली.

भारताला बंगळुरू येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्यात विजयाचे हक्कदार निश्चित करण्यासाठी राजकोटमध्ये एक अचूक खेळ करावा लागेल. यजमान संघाचा सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर एक चांगला रेकॉर्ड आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या तीन टी२०आय सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत. भारताने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाला तर २०१९ मध्ये बांग्लादेशला हरवले असून त्यांना २०१७ मध्ये न्यूझीलंडविरूद्ध हार पत्करावी लागली.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या चौथ्या टी२०आय सामन्यातील काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेतः

ईशान किशनची प्रभावशाली खेळी

मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज ईशान किशन हा आतापर्यंत पाच सामन्यांच्या टी२०आय मालिकेत भारतासाठी एक यशस्वी खेळाडू ठरला आहे. या २३ वर्षीय डावखुऱ्या खेळाडूने तीन सामन्यांमध्ये १६४ धावा १५७.६९ या स्ट्राइक रेटने काढल्या असून त्यांनी ५४.६७ ची सरासरीही राखली आहे. त्याने आतापर्यंत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा पटकावणारा हेन्रिच क्लासेनपेक्षा ५४ धावा काढल्या आहेत. किशन शुक्रवारी चौथ्या टी२०आय सामन्यातही आपली हीच कामगिरी कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे.

भारतीय स्पिनर्स फॉर्ममध्ये

पहिल्या दोन टी२०आय सामन्यात फक्त दोन विकेट्स घेतल्यानंतर भारतीय स्पिनर्स युजवेंद्र चहल आणि अक्सर पटेल यांनी विशाखापट्टणम येथे तिसऱ्या टी२०आय सामन्यात एकत्रितरित्या चार विकेट्स काढल्या आहेत आणि विजयात त्यांनी एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लेग स्पिनर युजवेंद्र चहलने आपल्या चार ओव्हर्सच्या कोटामध्ये फक्त २० धावा देऊन तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या आणि प्रतिस्पर्धी संघाचे कंबरडे मोडले. मधल्या ओव्हर्समध्ये आपल्या स्पिनर्सवर जास्त भर देत असल्याची बाब विचारात घेता चहल आणि अक्सर यांचे फॉर्म हे राजकोटमध्ये आणखी एका महत्त्वाच्या सामन्यासाठी सकारात्मक बाब ठरेल.

कर्णधार ऋषभ पंतवर तणाव

भारतीय कर्णधार ऋषभ पंत हा या टी२०आय मालिकेत फलंदाजीत थोडा मागे पडतो आहे. या खेळाडूने १३.३३ च्या सरासरीने तीन सामन्यांमध्ये फक्त ४० धावा फटकावल्या आहेत. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि टीम व्यवस्थापनाला आशा आहे की यजमानांसाठी जिंकलेच पाहिजे अशा आणखी एका सामन्यात पंत उत्तम खेळी करू शकेल.

पंत आणि त्याचे खेळाडू शुक्रवारी राजकोट येथे आयोजित आणखी एक चांगला खेळ करून दक्षिण आफ्रिकेसोबत बरोबरी करण्याची आशा ठेवून आहेत.