News

SRH vs MI: सीझनच्या पहिल्या विजयावर हार्दिक अँड कंपनीची नजर

By Mumbai Indians

आपली टीम IPL 2024 चा दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. हा सामना सनरायझर्स हैदराबादविरूद्ध हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल. हा सामना बुधवार दिनांक २७ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता सुरू होईल.

सीझनच्या पहिल्या सामन्यात आपल्या संघाला अगदी निसटून पराभवाचा सामना करावा लागला. परंतु, आपल्याला पुढील सामन्यात अधिक चांगला खेळ करण्याची प्रेरणा मिळाली आणि आता आपली टीम आणखी चांगले खेळण्यासाठी उत्सुक आहे.

गुजरात जायंट्सविरूद्ध सामन्यात जसप्रीत 'बूम बूम' बुमराने आपल्या धारदार गोलंदाजीने (3/14) सर्वांचे मन जिंकले. रोहित 'हिटमैन' शर्माने जोरदार ४३ धावा करून चाहत्यांना प्रभावित केले.

आता टीमची नजर सनरायझर्स हैदराबादविरूद्ध आपल्या पहिल्या विजयावर असेल. आपले प्रतिस्पर्धी एसआरएचला आपल्या पहिल्या सामन्यात केकेआरकडून ४ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्या सामन्यात हैदराबादच्या टीमकडून हेन्रिक क्लासेन २९ चेंडूंवर ६३ धावा करून टीमला जवळपास विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन गेला होता. परंतु टीमला तरीही पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे दोन्ही संघांना विजयाची आशा नक्कीच असेल.

हेड-टू-हेड आकडेवारी

मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ २१ सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आलेले आहेत. यातील एमआयने १२ सामन्यांमध्ये विजय प्राप्त केला आहे तर एसआरएचने ९ सामने आपल्या नावावर केले आहेत. या दोन्ही संघांमध्ये झालेल्या मागच्या पाच सामन्यांमध्ये मुंबईच्या टीमने चार वेळा विजय मिळवला आहे. मागच्या सीझनमध्ये आपल्या टीमने दोन्ही सामन्यांमध्ये हैदराबादला माती चाखवली होती. त्यामुळे ही आकडेवारी मुंबई इंडियन्सच्या बाजूने आहे असे म्हणता येईल.

काय: आयपीएल २०२४ चा ८ वा सामना, मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद

कधी: बुधवार, २७ मार्च २०२४. सायंकाळी ७.३० वाजता

कुठे: राजीव गांधी अंतरराष्‍ट्रीय स्‍टेडियम, हैदराबाद

काय अपेक्षा आहे: आपल्या टीमला या सीझनचा पहिला विजय नोंदवताना पाहणे. प्रतिस्पर्धी टीमचे मैदान आपल्या खेळाडूंचा स्फोटक खेळ पाहण्यासाठी उत्सुक आहे.

आपण काय करायला हवे: तर पलटन, तुम्ही स्टेडियममध्ये असाल किंवा टीव्हीच्या पडद्यासमोर. तुम्ही आतापर्यंत तुमच्या टीमला जितक्या उत्साह आणि आनंदाने चियर करत आला आहात तसेच करत राहा.