
ख्यातनाम लॉर्ड्सच्या ऑनर्स बोर्डवर महान खेळाडू जसप्रीत बुमराहचा समावेश
आपल्या बूम बूम मशीनने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून त्याने लॉर्ड्स ऑनर्स बोर्ड या क्रिकेटच्या सर्वाधिक ख्यातनाम हॉल ऑफ फेममध्ये एंट्री केली आहे. 🤩
अगदी बरोबर. विद्यमान मालिकेच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरूद्ध त्याने पाच विकेट्सची कामगिरी करून स्वतःचे नाव दिग्गज खेळाडूंच्या यादीत नोंदवले आहे. आनंदाची गोष्ट आहे, हो ना?
या कामगिरीसोबत जस्सीने देशाबाहेरच्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूकडून सर्वाधिक पाच विकेट्स घेण्याचा मान मिळवला आहे. 🥇 त्याच्या या खास विक्रमाबद्दल काय बोलावे हे आम्हाला आत्ता कळत नाहीये...
📰 जसप्रीत बुमराह ने रचा इतिहास! 🇮🇳#MumbaiIndians #ENGvIND pic.twitter.com/U927CZha7F
— Mumbai Indians (@mipaltan) July 11, 2025
या बोर्डवर नाव येणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. बुमराहसाठी तर ही आता रोजचीच गोष्ट झाल्याचे दिसते. त्याने अनेक जोड्या फोडल्या, स्टंप्स उखडले आणि फलंदाजांच्या जिवाचा थरकाप उडवला आहे. 🥵 नवीन चेंडू असो वा जुना चेंडू, सपाट पिच किंवा फिरकीची स्थिती- त्याने त्याला कसलाही फरक पडला नाही.
स्वतःवर कोणत्याही ताणाचा कसलाही परिणाम होऊ न देणारा हा खेळाडू आहे. उलट तणाव असताना तो जास्त कामगिरी करतो. टीमला विकेट हवी असते तेव्हा आपला स्किपर चेंडू बुमराहकडे सोपवतो आणि तो आपल्याला सोपवलेली कामगिरी फत्ते करून येतो. ✅
तर आता क्रिकेटच्या पंढरीत स्वतःच्या नावाचा जयघोष कोरणाऱ्या या खेळाडूची कामगिरी पाहूया!
खेळाडू |
आकडेवारी |
प्रतिस्पर्धी |
वर्ष |
जसप्रीत बुमराह |
५/७४ |
इंग्लंड |
२०२५ |
भुवनेश्वर कुमार |
६/८२ |
इंग्लंड |
२०१४ |
ईशांत शर्मा |
७/७४ |
इंग्लंड |
२०१४ |
प्रवीण कुमार |
५/१०६ |
इंग्लंड |
२०११ |
आरपी सिंग |
५/५९ |
इंग्लंड |
२००७ |
वेंकटेश प्रसाद |
५/७६ |
इंग्लंड |
१९९६ |
चेतन शर्मा |
५/६४ |
इंग्लंड |
१९८६ |
कपिल देव |
५/१२५ |
इंग्लंड |
१९८२ |
बीएस बेदी |
६/२२६ |
इंग्लंड |
१९७४ |
बीएस चंद्रशेखर |
५/१२७ |
इंग्लंड |
१९६७ |
रमाकांत देसाई |
५/८९ |
इंग्लंड |
१९५९ |
विनू मंकड |
५/१९६ |
इंग्लंड |
१९५२ |
लाला अमरनाथ |
५/११८ |
इंग्लंड |
१९४६ |
अमर सिंग |
६/३५ |
इंग्लंड |
१९३६ |
मो. निस्सार |
५/९३ |
इंग्लंड |
१९३२ |