News

रणजी ट्रॉफी २०२४ मध्ये एमआय: मुंबई ४२ व्या वेळी अजिंक्य, शम्स दि ऑल राऊंडरची तूफानी खेळी

By Mumbai Indians

देशांतर्गत स्पर्धांमध्ये आपले लाडके खेळाडू फलंदाजी, गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षणात कमाल दाखवून आपल्या डोळ्यांचे पारणे फेडतात. या पेक्षा नववर्षाची आणखी सुंदर सुरूवात असू शकत नाही. रणजी ट्रॉफी २०२४ ला सुरूवात झाली आहे आणि एक वार्षिक परंपरा म्हणून तुम्हाला प्रत्येक फेरीच्या शेवटी आपले एमआय सुपरस्टार कशी कामगिरी करत आहेत हे पाहायला मदत मिळेल. वाचत राहा.

अंतिम सामना| १०-१४ मार्च २०२४

शम्स मुलाणी (मुंबई): ३५ विकेट्स, ३५३ धावा आणि नंतर भरपूर स्माइल्स. शम्स मुलाणी रणजी ट्रॉफी विजेता आहे. आपल्या १२ ओव्हर्समध्ये ३२ धावांवर तीन विकेट्स घेण्यासाठी विदर्भाच्या फलंदाजीला भगदाड पाडताना या मुंबईच्या अष्टपैलू खेळाडूने नाबाद अर्धशतक फटकावून ४१८ चा स्कोअर करण्यासाठी मदत केली. विदर्भासमोर ५३८ धावांचे भलेमोठे लक्ष्य ठेवण्यात आले. तेव्हा शम्सने एक विकेट घेतली (१/७५) आणि एक खेळाडू बाद करून मुंबईला ४२ व्या ट्रॉफीपर्यंत नेले.

**********

उपांत्य फेरी| २- ६ मार्च २०२४

शम्स मुलाणी (मुंबई): मुंबईचा संघ रणजी ट्रॉफी २०२४ च्या अंतिम फेरीसाठी निवडला गेल्यानंतर आता शम्सला २०२१-२२ च्या रणजी अंतिम सामन्यातील पराभवाला मागे टाकण्याची संधी मिळेल. पहिल्या इनिंगमध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही. पण या स्टार स्पिनरने आपल्या जादूच्या छडीचा वापर करून ४/५३ (१३.५ ओव्हर्स) अशी प्रभावी कामगिरी करून तामिळनाडूवर दणदणीत विजय मिळवण्यासाठी मुंबईला मदत केली.

कुमार कार्तिकेय (एमपी): नऊ सामन्यांमध्ये ४१ विकेट्स घेऊन (रणजी ट्रॉफी २०२४ चा मध्य प्रदेशचा सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू) केकेचा उत्कृष्ट खेळ एमपीचा संघ विदर्भासमोर ६२ धावांनी पराभूत झाल्यामुळे थांबला. पहिल्या इनिंगमध्ये फक्त दोन धावा देऊन एक विकेट घेतल्यानंतर त्याने दुसऱ्या इनिंगमध्ये ३० ओव्हर्समध्ये २/७६ अशा विकेट्स घेतल्या. चालू रणजी सीझनमध्ये केकेच्या गोलंदाजीमुळे विदर्भाने दुसऱ्या इनिंगमध्ये केलेल्या आक्रमणाविरूद्ध मध्य प्रदेशला थोडासा दिलासा मिळाला. या सामन्यात त्याने २.५० ची सरासरी नोंदवली.

**********

उपउपांत्य फेरी |२३- २७ फेब्रुवारी २०२४

शम्स मुलाणी (मुंबई): शम्सने मुंबईच्या बडोद्याविरूद्ध मनोरंजक सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजीतही चमकदार कामगिरी केली. सर्वप्रथम त्याने पहिल्या इनिंगमध्ये चार विकेट्स घेतल्या (४/१२१) आणि त्यानंतर त्याने एक महत्त्वाचे अर्धशतक फटकावले (१०३ चेंडूंमध्ये) कारण ४१ वेळा विजयी झालेल्या संघाला दुसऱ्या इनिंगमध्ये ५६९ धावांची बरोबरी करायची होती. हा सामना बरोबरीत सुटला असला तरी मुंबईचा संघ आपल्या पहिल्या इनिंगमधल्या आघाडीमुळे उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला.

कुमार कार्तिकेय (एमपी): केकेने मध्य प्रदेशसाठी अत्यंत महत्त्वाची कामगिरी केली. त्याच्या टीमने आंध्र प्रदेशविरूद्ध लढाऊ बाण्याने रोमांचक सामना खेळून विजय मिळवला. कार्तिकेयने दोन्ही इनिंग्समध्ये विकेट घेतल्या (३/४१ आणि १/३४) व प्रतिस्पर्धी फलंदाजांना आटोक्यात ठेवले. त्याने पहिल्या इनिंगमध्ये २९ धावादेखील केल्या.

शिवालीक शर्मा (बडोदा): एक टॅलेंटेड तरूण खेळाडू. दुर्दैवाने त्याला मुंबईविरूद्ध उपउपांत्य सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये एमआयचा सहकारी शम्स मुलाणी याने बाद करून घरी पाठवले. त्यानंतर तो दुसऱ्या इनिंगमध्ये दोन्ही संघ एकमेकांशी हस्तांदोलन करून सामना बरोबरीत सुटल्याची घोषणा झाली तेव्हा फलंदाजीला बाहेर पडला. परंतु रणजी ट्रॉफी २०२४ मध्ये शिवालीकने केलेला खेळ देखणा होता. तो सामन्यात बडोद्याचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने सहा सामन्यात ४८३ धावा केल्या. त्यात ६९ च्या सरासरीने दोन शतके आणि एक अर्धशतक समाविष्ट होते.

**********

ग्रुप टप्पा | सातवी फेरी: १६-२० फेब्रुवारी २०२४

तिलक वर्मा (हैदराबाद): कॅप्टन हैदराबाद. चेक. रणजी ग्रुप टप्प्यात विजय. डबल चेक. मेघालयविरूद्ध टीव्हीने पुन्हा एकदा आघाडी घेऊन संघाचे नेतृत्व केले. त्याने ४४ धावा (७३ चेंडू) आणि ६४ धावा (५० चेंडू) केल्या आणि १/३३ आणि १/४ अशी गोलंदाजी केली. याचसोबत तिलकने चार सामन्यांमध्ये ४१२ धावा (तीन शतके) आणि ५ विकेट्स घेऊन रणजी मोहिमेत विजय प्राप्त केला.

शम्स मुलाणी (मुंबई): मुंबईच्या आसामविरूद्धच्या एक इनिंग आणि ८० धावांनी विजयात शम्सचे योगदान थोडेसेच, आवश्यक आणि अर्थपूर्ण होते. त्याने खालच्या फळीत खेळताना अत्यंत संयमाने ४७ चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या आणि मुंबईच्या संघाला पहिल्या इनिंगमध्ये २७२ धावांचा टप्पा पार करून दिला. त्याने आपल्या ट्रिक्सनी २/८ आणि ०/२१ अशी कामगिरी केली.

कुमार कार्तिकेय (एमपी): मध्य प्रदेशने अगदी सहजपणे नॉकआऊट फेरीत प्रवेश केला. केकेने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याच्या १/७३ आणि ३/३१ अशा कामगिरीमुळे जम्मू आणि काश्मीरविरूद्ध दणदणीत २५६ धावांनी विजय मिळवण्यासाठी पाया रचला गेला.

शिवालिक शर्मा (बडोदा): शिवालिकच्या १०९ चेंडूंमध्ये ७५ धावांमुळे बडोद्याला उत्तराखंडविरूद्ध ४२४ धावांचे लक्ष्य पूर्ण करण्यास मदत झाली. वेळ हातातून निघून चालल्यामुळे बडोद्याला पराभव टाळून सामना बरोबरीत सोडवणे शक्य झाले. त्यामुळे त्यांना प्लेऑफ्समध्ये जायची संधी मिळाली असून त्यांचा पुढील सामना उपांत्य फेरीत मुंबईसोबत होईल.

नेहल वढेरा (पंजाब): नेहलला तामिळनाडूविरूद्ध विजय मिळवण्यासाठी पंजाबला फारशी मदत करता आली नाही. त्याने सालेम क्रिकेट फाऊंडेशन ग्राऊंडवर केलेल्या १०९ चेंडूंमधील ४३ धावा त्याच्या टीमच्या कामगिरीतल्या सकारात्मक ठरल्या.

अंशुल कंबोज (हरयाणा): हा हरयाणाचा अष्टपैलू खेळाडू विदर्भाविरूद्ध त्यांच्या टीमच्या सामन्यात अक्षरशः “छा गया!” त्याने ३१ आणि ४६ धावा करून पाहुण्या संघाला फलंदाजीत आघाडीवर ठेवले. परंतु अंशुलला फारशी चांगली गोलंदाजी करता आली नाही आणि (१/१०४ आणि २/६२) आणि विदर्भाच्या संघाने हरयाणाला ११५ धावांनी पराभूत केले.

अर्जुन तेंडुलकर (गोवा): अर्जुनने खूप प्रयत्न केले. परंतु त्याचा फायदा गोव्याला झाला नाही. रणजी ट्रॉफी २०२३/२४ च्या सातव्या सामन्यात गोव्याला गुजरातविरूद्ध पराभव पत्करावा लागला. या तरूण अष्टपैलू खेळाडूने ४५ (७०) आणि १४ (२३) अशा धावा आणि ४/४९ आणि १/१८ अशी गोलंदाजी केली. परंतु त्याचा दिवसच निराशाजनक गेला.

**********

ग्रुप टप्पा| सहावी फेरीः ९-१२ फेब्रुवारी २०२४

तिलक वर्मा (हैदराबाद): रणजी ट्रॉफी २०२४ प्लेट लीगमध्ये त्याने तिसरे शतक फटकावून बॅटने ड्रीम रन काढण्याचे स्वप्न कायम ठेवले. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना, १३५ चेंडूंत (६ चौकार, ५ षटकार) मारून १०१ धावा केल्या आणि आणि हैदराबादला पहिला डाव ४६२/८ दिवस अशी सामना जिंकणारी कामगिरी करून दिली. त्याने थोडी बॉलिंगदेखील केली आणि दोन्ही सत्रांमध्ये ०/६ आणि ३/३० कामगिरी केली.

कुमार कार्तिकेय (मध्य प्रदेश): रणजी ट्रॉफी २०२४ ने आपल्याला कुमार कार्तिकेयचे नवीन रूप दाखवले आहे. केके हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने बचाव करणाऱ्या चॅम्पियन संघ मध्य प्रदेशसाठी ६३ चेंडूमध्ये आत्मविश्वासाने ४५ धावा करून ४५४ धावांची आघाडी घ्यायला मदत केली. त्याच्या हातात चेंडू आल्यावर कार्तिकेयने मध्य प्रदेशला एक इनिंग आणि २५ धावांनी विजय मिळवून देण्यासाठी १/२१ आणि ३/७७ अशी कामगिरी करायला मदत केली.

श्रेयस गोपाळ (केरळ): या अष्टपैलू खेळाडूने केरळला बंगलविरूद्ध १०९ धावांनी विजय मिळवायला मदत केली. त्याने उत्तम फलंदाजी केली (५६ चेंडूंमध्ये ५० धावा नाबाद) आणि दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी (२/९६) केली. त्याच्या कामगिरीमुळे केरळला रणजी ट्रॉफी २०२४मध्ये पाच सामन्यांमध्ये ही धावसंख्या पूर्ण करायला मदत झाली पण विजय मिळाला नाही.

शम्स मुलाणी (मुंबई): सुपर शम्सने रणजी एक्शनमध्ये ३० ओव्हर्समध्ये २/६१ अशी कामगिरी करून आपला प्रभाव पाडला. त्याने पहिल्या इनिंगमध्ये सहा मेडन ओव्हर्स टाकल्या. या सामन्यात छत्तीसगढचा संघ ३५० वर बाद झाला आणि एका धावेने हरला.

अंशुल कंबोज (हरयाणा): हरयाणाने झारखंडला एक इनिंग आणि २०५ धावांनी बाद केले आणि हा विजय अंशुल कंबोजच्या छोट्या पण महत्त्वाच्या योगदानामुळे (१/३६ आणि १/१८) महत्त्वाचा ठरला. त्याचबरोबर या सामन्यात माजी एमआय स्टार सौरभ तिवारीनेदेखील निवृत्ती जाहीर केली.

नेहल वधेरा (पंजाब): नेहलला गुजरातच्या गोलंदाजांनी या वेळी शांत केले. तो रणजी ट्रॉफी २०२४ च्या सहाव्या सामन्यात १६ आणि १७ वर बाद झाला. फील्डिंगच्या बाबतीत प्रिन्स ऑफ लुधियानाने दोन कॅच घेऊन महत्त्वाची भूमिका बजावली.

नमन धीर (पंजाब): आपल्या जोडीदार नेहल वधेराप्रमाणेच नमन धीरचाही आजचा दिवस निराशाजनक होता. नमनने दोन ओव्हर्समध्ये अत्यंत अचूक गोलंदाजी (१/१९) केली.

शिवालिक शर्मा (बडोदा): शिवालिक शर्माच्या टॅलेंटमुळे प्रतिस्पर्धी संघ जरा वचकूनच असतो. परंतु मध्य प्रदेशच्या बॉलर्सनी त्याला रणजी ट्रॉफी २०२४ च्या सामन्यात दोन्ही इनिंग्समध्ये शांत बसवले. या मधल्या फळीतल्या फलंदाजाने २६ चेंडूंमध्ये १५ धावा आणि ५४ चेंडूंमध्ये १९ धावा केल्या.

**********

ग्रुप टप्पा | पाचवी फेऱी: २-५ फेब्रुवारी २०२४

नमन धीर (पंजाब): पंजाब विरूद्ध चंदीगढ हा सामना सतत पडणाऱ्या पावसामुळे अनिर्णित राहिला परंतु नमन धीरने आपल्या संघासाठी महत्त्वाच्या धावांचा पाऊस पाडण्यात कोणतीही कसर सोडली नाही. त्याने केलेल्या ९५ चेंडूंमधील ८६ धावांमुळे अनमोलप्रीत सिंग आणि प्रभसिमरन सिंग यांना १५० पेक्षा जास्त धावसंख्या उभारणे शक्य झाले.

अंशुल कंबोज (हरयाणा): हरयाणाच्या संघाला सर्व्हिसेसविरूद्ध थोडक्यात एक धावेने पराभव पत्करावा लागला असला तरी अंशुल कंबोजने आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवली. त्याने संपूर्ण सामन्यात ६/५६ अशा विकेट्स घेताना दोन्ही इनिंगमध्ये प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.

शिवालीक शर्मा (बडोदा): रणजी ट्रॉफी २०२४ मध्ये एकामागून एक शतके फटकावल्यानंतर शिवालीक शर्माला आणखी एकदा अर्धशतकी कामगिरी करण्यात अपयश आले. त्याने ९२ चेंडूंमध्ये ४५ धावा केल्या आणि आणखी एक जोरदार ओव्हर टाकली. त्याने बडोदाच्या दिल्लीविरूद्ध बरोबरीत सुटलेल्या सामन्यात फक्त सात धावा दिल्या. त्याने अतीत शेठला पहिल्या इनिंगमध्ये आयुष बदोनीला (४४) बाद करण्यासाठी मदत करून उत्तम क्षेत्ररक्षणदेखील केले.

विष्णू विनोद (केरळ): विष्णू विनोदने मैदानात या वेळी असे काहीतरी केले जे आपल्याला नियमितपणे पाहायला मिळत नाही. आपण त्याला एक फलंदाज आणि विकेटकीपर म्हणून ओळखतो. हा केरळी स्टार मैदानात उतरला. त्याने अप्रतिम गोलंदाजी केली आणि दोन ओव्हर्समध्ये ०/१२ धावा दिल्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ०/१ (एक ओव्हर मेडन) अशी कामगिरी केली. यापूर्वी छत्तीसगढविरूद्ध बरोबरीत सुटलेल्या सामन्यात एजंट विनोदने ४० (८६) आणि २४ (२२) अशा धावा केल्या.

श्रेयस गोपाळ (केरळ): आपल्या सहकारी विष्णू विनोदच्या तुलनेत श्रेयस गोपाळसाठी छत्तीसगडविरूद्धचा सामना फार चांगला ठरला नाही. त्याने पाच धावा केल्या आणि १/२६ आणि ०/२३ अशी गोलंदाजी केली.

कुमार कार्तिकेय (मध्य प्रदेश): मध्य प्रदेशसाठी आणखी एका सामन्यात केकेने पुन्हा एकदा धमाल केली. सर्वप्रथम त्याने १/३६ अशा विकेट्स घेतल्या- त्यात पहिल्या इनिंगमधल्या १४ ओव्हर्सपैकी तीन ओव्हर्समध्ये त्याने शून्य धावा दिल्या. त्यानंतर तो हिमाचल प्रदेशविरूद्ध दोन्ही ओव्हर्समध्ये शून्य धावा दिला. हा सामना बरोबरीत सुटला.

अर्जुन तेंडुलकर (गोवा): तामिळनाडूच्या फलंदाजांविरूद्ध आमच्या डावखुऱ्या सिमरची कामगिरी थोडी फिकी पडली. त्याला सामन्यात एकही विकेट मिळाली नाही. त्याने दोन्ही इनिंगमध्ये प्रत्येकी ५२ आणि ५ धावा दिल्या.

**********

ग्रुप टप्पा| फेरी ४: २६-२९ जानेवारी २०२४

शिवालिक शर्मा (बडोदा): संयमी माणसाच्या रागाची तुम्ही भीती बाळगायला हवी हे वाक्य रणजी ट्रॉफी २०२४ मध्ये शिवालिकच्या सध्याच्या फॉर्मशी जोडता येईल. शेवटच्या फेरीत एक शतक पूर्ण केल्यानंतर या बडोद्याच्या खेळाडूने आपल्या टीमच्या जम्मू आणि काश्मीरविरूद्ध सामन्यातील ३८३ धावांपैकी २३८ चेंडूंमध्ये निर्णायक १२८ धावा केल्या. चौथ्या दिवसाच्या शेवटी हा सामना अनिर्णित राहिला.

श्रेयस गोपाळ (केरळ): अष्टपैलू श्रेयस गोपाळचा बॅट आणि बॉलसह खेळ केरळच्या बिहारविरुद्ध बरोबरीत सुटलेल्या सामन्यात महत्त्वाचा ठरला. सर्वप्रथम त्याने आपल्या कारकिर्दीतील पाचवे फर्स्ट क्लास शतक (२२९ चेंडूत १३७ धावा) झळकावून केरळला पहिल्या डावात ८४/५ वरून २२७ धावांवर नेले. त्यानंतर त्याने 3/94 अशी कामगिरी केली. सामना बरोबरी सुटला तेव्हा गोपाळ अजूनही 12 धावांवर फलंदाजी करत होता.

शम्स मुलाणी (मुंबई): मुंबईसाठी शम्सची जादू सुरूच आहे! रणजी ट्रॉफी 2021-22 मधील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूसाठी लाला अमरनाथ पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर काही दिवसांनी शम्स मुलाणीने उत्तर प्रदेशविरुद्ध अर्धशतके (57 आणि 63) फटकावून हा पुरस्कार का दिले याचे कारण स्पष्ट केले. पण मुंबईला विजय मिळवून देण्यासाठी ते पुरेसे नव्हते, कारण 1/63 आणि 1/73 अशी गोलंदाजी करताना प्रतिस्पर्धी फलंदाजांनी त्याला धुवून काढले.

कुमार कार्तिकेय (एमपी): मध्य प्रदेशसाठी केकेने सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने आपल्या फर्स्ट क्लास करियरमध्ये दुसऱ्या वेळी १० विकेट्सची कामगिरी केली होती. सर्वप्रथम त्याने ४/३२ सोबत पुद्दुचेरीच्या फलंदाजीचा धुव्वा उडवला आणि त्यांना फक्त १०० धावांमध्ये गुंडाळून टाकले. दुसऱ्या इनिंगमध्ये पुदुच्चेरीसाठी ४२८ धावांचा पाठलाग खूप कठीण वाटत होता कारण या रेड हॉट कुमार कार्तिकेयने १३ ओव्हर्समध्ये सहा विकेट्स घेतल्या आणि प्रतिओव्हर फक्त ३.४६ धावा दिल्या. त्याने ६ आणि २३ नॉट आऊट धावांसह थोडा फलंदाजीचा सरावदेखील केला.

नेहल वढेरा (पंजाब): त्याच्या अर्धशतकासाठी फक्त एकच धाव कमी पडली. पण त्याने पंजाबच्या गोवाविरूद्ध कमी धावांच्या पाठलागामध्ये उत्तम कामगिरी केली. तो पहिल्या इनिंगमध्ये फक्त ० धावांवर बाद झाला. त्यानंतर या प्रिन्स ऑफ लुधियानाने दणदणीत २७ चेंडूंमध्ये नाबाद ४९ धावा केल्या. त्यात त्याने चार चौकार आणि तीन षटकार मारले आणि पंजाबला सहा विकेट्सनी विजय मिळवून दिला.

नमन धीर (पंजाब): एकीकडे वढेरा दणदणीत फलंदाजी करत होता तर दुसरीकडे नमन धीरच्या मैदानावरील प्रभावी कामगिरीने पंजाबला गोव्याविरूद्ध विजय मिळवणे शक्य झाले. त्याने पहिल्या सत्रात दोन विकेट्स घेतल्या तर त्याने टाकलेल्या एकमेव ओव्हरमध्ये शून्य धावा दिल्या. दुसऱ्या सत्रात नमनने तीन कॅच घेतल्या आणि एका ओव्हरमध्ये फक्त आठ धावा दिल्या.

अंशुल कंबोज (हरयाणा): प्रकाश कमी असल्यामुळे या सामन्यावर वाईट परिणाम झाला. परंतु अंशुल कंबोजने महाराष्ट्राविरूद्ध २/३५ अशी कामगिरी करून आपला ठसा उमटवला. हा सामना नंतर बरोबरीत सुटला. 

अर्जुन तेंडुलकर (गोवा): अर्जुनसाठी हा दिवस खूप निराशाजनक होता. त्याने पंजाबविरूद्ध आपल्या सात ओव्हर्समध्ये २३ आणि १८ आणि १/३० अशी कामगिरी केली.

विष्णू विनोद (केरळ): एजंट विनोदला केरळच्या बिहारविरूद्ध बरोबरीत सुटलेल्या सामन्यात फारसा सूर गवसला नाही. तो दोन्ही इनिंगमध्ये प्रत्येकी ० आणि ६ वर बाद झाला.

**********

ग्रुप टप्पा | फेरी ३: १९-२२ जानेवारी २०२४

शिवालिक शर्मा (बडोदा): हा २५ वर्षीय खेळाडू बडोद्यासाठी खूप सणसणीत खएळला. त्याने २८१ चेंडूंमध्ये १८८ धावा केल्या. त्याने या दरम्यान २६ चौकार मारले आणि त्याच्या टीममेट शाश्वत रावतच्या द्विशतकासाठी ते पूरक ठरले. बडोद्याने पहिल्या इनिंगमध्ये ४८२ धावा केल्या. शिवालिकनेदेखील दोन कॅच घेतल्या आणि हिमाचल प्रदेशविरूद्ध एक इनिंग आणि १८ धावांनी विजय मिळवणे बडोद्याला शक्य झाले. 

तिलक वर्मा (हैदराबाद): तिलकने पुन्हा एकदा हैदराबादसाठी कॅप्टन फँटास्टिकची भूमिका बजावली. त्याने त्याने १११ चेंडूंमध्ये नाबाद १०३ धावा करून रणजी ट्रॉफीमध्ये आपले सलग दुसरे शतक झळकवले आणि आपल्या संघाला सिक्किमविरूद्ध एक इनिंग आणि १९८ धावांनी विजय मिळवून दिला. ही कामगिरी आणि सामन्यातला विजय (दोन दिवसांत) भारत विरूद्ध अफगाणिस्तान टी२०आय मालिकेतील विजयानंतर परतलेल्या उत्तम फॉर्ममधल्या तिलकसाठी महत्त्वाचा ठरला.

श्रेयस गोपाळ (केरळ): श्रेयस गोपाळचा संघ मुंबईविरूद्ध २३२ धावांनी हरला असला तरी त्याने प्रत्येक इनिंगमध्ये केरळसाठी ४१ वेळा विजयी ठरलेल्या संघाविरूद्ध (४/२८, ४/८२) अशा विकेट्स घेतल्या.

शम्स मुलाणी (मुंबई): शम्सचा दिवस दोन कारणांमुळे खूप चांगला ठरला: केरळवरचा विजय आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १५० विकेट्स पूर्ण करणे. या जादूगाराने बॅटने ८ आणि ३० धावांचे योगदान देत असतानाच १/६७ आणि ५/४४ अशी गोलंदाजी केली.

कुमार कार्तिकेय (एमपी): केकेने मध्य प्रदेशसाठी पहिल्या इनिंगमध्ये अत्यंत संयमी ३३ धावांचे योगदान दिले आणि तो खालच्या स्तरावर येऊन फलंदाजी करू शकतो हे सिद्ध केले. त्यानंतर त्याने दिल्लीविरूद्ध ३/४३ आणि १/३३ अशी कामगिरी करून आपल्या गोलंदाजीचा अंदाज दाखवला. 

अर्जुन तेंडुलकर (गोवा): या सामन्यात अर्जुनने उत्तम फलंदाजी केली. त्याने गोव्यासाठी ११२ चेंडूंमध्ये ५२ धावा केल्या आणि कर्नाटकविरूद्ध या संघाने पहिल्या इनिंगमध्ये ३२१ धावा कुटल्या. हा एक दुर्मिळ सामना होता- तो अनिर्णित राहिला. त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्याने १५ ओव्हर्समध्ये शून्य विकेट्सवर ७० धावा दिल्या. 

अंशुल कंबोज (हरयाणा): या हरयाणाच्या खेळाडूने मणिपूरविरूद्ध त्याच्या संघाने एक इनिंग आणि ३३८ धावांनी मिळवलेल्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अंशुलने या सामन्यात फक्त आठ ओव्हर्स टाकल्या. परंतु त्याने पहिल्या इनिंगमध्ये दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.

नेहल वढेरा (पंजाब): या प्रिन्स ऑफ पंजाबने त्रिपुराविरूद्ध पंजाबकडे उपलब्ध असलेल्या सर्व लहान संधींचा फायदा घेत पहिल्या इनिंगमध्ये अर्धशतक करत  ९४ चेंडूंमध्ये ५६ धावा केल्या. या सामन्यावर खराब प्रकाशाने वाईट प्रभाव टाकला. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला. 

नमन धीर (पंजाब): आपल्या सहखेळाडूच्या तुलनेत नमन धीर या वेळी फारसा प्रभाव टाकू शकला नाही. तो त्रिपुराविरूद्ध पहिल्या इनिंगच्या आठव्या ओव्हरमध्ये फक्त एक धाव काढून बाद झाला.

विष्णू विनोद (केरळ): या फेरीत एजंट विनोदला फार प्रभाव टाकला नाही. मुंबईविरूद्ध २३२ धावांनी पराभव झालेल्या सामन्यात त्याने प्रत्येक इनिंगमध्ये फक्त २९ आणि ६ धावा केल्या.

**********

ग्रुप टप्पा| फेरी २: १२-१५ जानेवारी २०२४

शम्स मुलाणी: मुंबईच्या आंध्रविरूद्ध १० विकेट्सनी विजयात या मॅजिक फिंगर्स असलेल्या खेळाडूचा मोठा हातभार होता. मुंबईच्या पहिल्या इनिंगमधल्या ३९५ धावसंख्येत १११ चेंडूंमध्ये त्याने अत्यंत संयमाने ३८ धावा केल्या. त्यानंतर शम्सने चेंडू हातात घेतला, सहा विकेट्स घेतल्या (६/६५) आणि दुसऱ्या इनिंगमध्येही ४/९६ ची कामगिरी कायम ठेवत त्याच्या संघाला २४४ धावांमध्ये विरोधी संघाला गुंडाळण्यासाठी मदत केली. मुंबईला ८.४ ओव्हर्समध्ये फक्त ३४ धावांचे लक्ष्य पूर्ण करायचे होते. शम्स मुलाणीला फलंदाजी आणि गोलंदाजीतही एका परिपूर्ण खेळासाठी सामनापटूचा किताब देऊन गौरवण्यात आले.

अर्जुन तेंडुलकर: गोव्याने चंदीगढविरूद्ध आपल्या पहिल्या इनिंगमध्ये धमाकेदार फलंदाजी केली (६१८/७ दिवस). त्यात अर्जुन तेंडुलकरने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना ११६.६६ च्या स्ट्राइक रेटने ६० चेंडूंमध्ये ७० धावा दणकावल्या. त्यानंतर त्याने एक विकेटदेखील घेतली (१/७०) आणि चंदीगढचा संघ फक्त ४७९ धावांमध्ये बाद झाला. हा सामना अनिर्णित राहिला.

कुमार कार्तिकेय: आधीच्या फेरीत आपल्या देखण्या खेळानंतर केकेने मध्य प्रदेशच्या ओदिशाविरूद्ध सामन्यात थोडी संथ कामगिरी केली. त्याने पहिल्या इनिंगमध्ये २/१०९ अशी थोडी महागडी गोलंदाजी केली आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ओदिशा चॅम्पियन्सविरूद्ध ११५ चा पाठलाग करत असताना १/१५ अशी कामगिरी केली.

अंशुल कंबोज: पलटनला सौराष्ट्र विरूद्ध हरयाणाच्या सामन्यात अंशुल कंबोजची अष्टपैलू कामगिरी प्रथमच पाहता आली. अंशुलने अगदी शेवटच्या क्रमाला फलंदाजी करताना सात धावा केल्या. त्याचवेळी त्याने पहिल्या (१/३०) आणि दुसऱ्या (१/३५) इनिंगमध्ये एकेक विकेट घेतली. अंतिमतः हरयाणाने हा सामना चार विकेट्सनी जिंकला.

नमन धीर: हा अष्टपैलू खेळाडू पंजाबसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. त्याने वेगाने फलंदाजी करणाऱ्या रेल्वेच्या संघाविरूद्ध पहिल्या इनिंगमध्ये २/२१ ची कामगिरी केली आणि दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद २६ धावा केल्या त्यामुळे पंजाबला सुरुवातीच्या डळमळीत खेळातून (४/१) सावरून सामना अनिर्णित ठेवायला मदत झाली.

विष्णू विनोद: केरळच्या आसामविरूद्ध झालेल्या अनिर्णित सामन्याच्या सर्व भागांमध्ये विनोद सहभागी होता. तो रन आऊट झाल्यामुळे फलंदाजीमध्ये (१९) त्याला थांबावे लागले. पण त्याच्यामधला विकेटकीपर स्टंप्समागे उत्तम खेळ घेऊन आला. त्याने पहिल्या इनिंगमध्ये एक कॅच आणि स्टंपिंग केले तर दुसऱ्या इनिंगमध्ये दोन कॅच घेतल्या.

श्रेयस गोपाळ: श्रेयस गोपाळला आपल्या संघाला विजयापर्यंत नेता आले नाही. त्यामुळे केरळचा आसामविरूद्धचा सामना अनिर्णित राहिला. गोपाळने केरळच्या ४१९ धावांच्या पहिल्या इनिंगमधल्या धावसंख्येत गोलंदाजीत ०/१७ आणि ०/४३ अशी कामगिरी केली तर १८ धावांचे योगदान दिले.

आकाश मधवाल: या उत्तराखंड एक्स्प्रेसला हिमाचल प्रदेशविरूद्ध फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. तो १६ धावांवर फलंदाजी करताना दुखापतग्रस्त होऊन निवृत्त झाला. परंतु आपल्या दुखापतीवर उपचार करत असातना मधवालच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद असणार कारण त्याच्या बदली खेळाडूने जगमोहन नागरकोटीने (५*; १/७२ आणि २/२३) उत्तराखंडला हिमाचल प्रदेशविरूद्ध ८८ धावांनी विजय मिळवायला मदत केली.

नेहल वढेरा: नेहल वढेरासाठी हा थोडासा कठीण काळ होता कारण त्याने रेल्वेविरूद्ध बरोबरीत सुटलेल्या सामन्यात फक्त तीन धावा केल्या. परंतु, त्याने क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी केल्यामुळे सगळेच काही वाईट ठरले नाही. त्याने आपल्या पहिल्या इनिंगमध्ये आपला सहकारी आणि एमआयचा नवीन खेळाडू नमन धीरसोबत एक विकेट घेतली.

**********

ग्रुप टप्पा | फेरी १: ५-९ जानेवारी २०२४

तिलक वर्ममा: एखादा मनोरंजक शो पाहण्यासाठी तुम्ही टीव्ही सुरू करत असाल. पण तिलक वर्माचा शो बघायला मजा येईल ना? या हैदराबादच्या कर्णधाराने अत्यंत संयम आणि अचूकतेसह नागालँडच्या गोलंदाजांविरूद्ध फलंदाजी केली आणि एक नाबाद शतक (फर्स्ट क्लास करियरमधले दुसरे) फटकावून त्याने आपल्या संघाला अशक्यप्राय वाटणारी ४७४/५ दिवस अशी धावसंख्या पूर्ण करायला मदत केली.

कुमार कार्तिकेय: मध्य प्रदेशच्या उत्तराखंडविरूद्ध सामन्यात दोन्ही इनिंग्समध्ये या स्पिनच्या जादूगाराने आपली जादू दाखवली. केकेने आपल्या खास ट्विट्स आणि टर्न्ससोबत जादू केली आणि चेंडूने पहिल्या इनिंगमध्ये ४/५९ अशी कामगिरी करत प्रति ओव्हर फक्त १.६८ धावा दिल्या. उत्तराखंडला दुसऱ्या इनिंगमध्ये जिंकण्यासाठी ३७५ धावा आवश्यक होत्या. पण कार्तिकेयने वेळोवेळी त्यांच्या धावसंख्येला आळा घालून सामना पलटवत अनिर्णित ठेवला.

विष्णू विनोद: एजंट विनोदने पुन्हा एकदा अत्यंत कठीण परिस्थितीत आपण केरळचे हिरो आहोत हे सिद्ध केले आहे. त्याचा संघ १३ व्या ओव्हरमध्ये ३२/३ असा पिछाडीवर होता. त्याचवेळी विष्णू विनोद अलापुझ्झा येथील मैदानावर प्रवेश करून ९४ चेंडूंमध्ये ७४ धावा केल्या आणि केरळची उत्तर प्रदेशविरूद्धची पहिल्या इनिंगमधली धावसंख्या २४३ वर नेऊन ठेवली. त्यापूर्वी त्याने विकेट कीपर म्हणून दोन कॅचदेखील घेतल्या होत्या.

श्रेयस गोपाळ: एक अष्टपैलू दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोपाळने केरळच्या उत्तर प्रदेशविरूद्ध अनिर्णित राहिलेल्या सामन्यात जिगरबाज खेळ केला. त्याने आपल्या नऊ ओव्हर्समध्ये १/३३ अशी कामगिरी केली. त्यानंतर गोपाळने अत्यंत शांतपणे ८८ चेंडूंमध्ये ३६ धावा करत विष्णू विनोद आणि कर्णधार संजू सॅम्सनसोबत चांगली भागीदारी होईल याची काळजी घेतली. दुसऱ्या इनिंगमध्ये उत्तरप्रदेशविरूद्ध केरळ अटीतटीने झुंजत असताना आणखी एक विकेट घेतली.

नेहल वढेरा: या प्रिन्स ऑफ लुधियानाने पंजाबला कर्नाटकविरूद्ध विजय मिळवून देण्यासाठी पहिल्या इनिंगमध्ये ७९ चेंडूंमध्ये ४४ धावा आणि दुसऱ्या इनिंगमध्ये २६ धावा केल्या. दुर्दैवाने तेवढ्या धावा पुरेशा ठरल्या नाहीत.

नमन धीर: अष्टपैलून नमन धीरने पलटनला आयपीएल २०२४ मध्ये त्यांना काय बघायला मिळेल याची चुणूक दिली. त्याने कर्नाटकविरूद्ध खेळताना ४ (७) आणि २० (४४) धावा तर २/४६ आणि ०/२० विकेट्स घेतल्या.

शम्स मुलाणी: कर्णधारपद आणि २०२४ च्या पहिल्या सामन्यात विजय- शम्ससाठी ही एक चांगलीच सुरूवात ठरली. या अनुभवी स्पिनरने दुसऱ्या इनिंगमध्ये एक विकेट घेतली आणि त्याच्या मैदानावरच्या कॉल्समुळे मुंबईला रणजी ट्रॉफी २०२४ च्या पहिल्या सामन्यात बिहारला एक इनिंग आणि ५१ धावांनी हरवता आले.

अर्जुन तेंडुलकर: गोलंदाजीसाठी परिस्थिती कठीण असताना अर्जुनने त्रिपुराविरूद्ध ९४ धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या. त्याने दुसऱ्या इनिंगमध्ये अत्यंत भेदक गोलंदाजी केली. (पाच ओव्हर्समध्ये ०/१४) परंतु त्याला विकेट्स मिळाल्या नाहीत. त्यांनी चांगली फलंदाजी करताना अनुक्रमे ११ आणि १० धावा केल्या.