News

एका खास गोलंदाजाची खास ओव्हरः बूमच्या जादूची मजा पुन्हा पुन्हा

By Mumbai Indians

जगाने जसप्रीत बुमराची जादुई, प्रेक्षकांना जागीच खिळवून ठेवणारी गोलंदाजी टाटा आयपीएलमध्ये मागच्या काही वर्षांत पाहिली असेल. पण त्यातली एकही ओव्हर ९ मे २०२२ ला त्याने केलेल्या गोलंदाजीच्या जवळपासही जाणारी नव्हती.

बूमने या सीझनमध्ये कोणत्याही गोलंदाजाने केलेल्या कामगिरीपैकी सर्वोत्तम म्हणजे 5/10 कामगिरी केली आणि टाटा आयपीएलच्या इतिहासत भारतीय गोलंदाजांची दुसरी सर्वोत्तम आकडेवारी साध्य केलीय.

यातील सगळ्यात अदभुत काय होते तर केकेआर इनिंगच्या १८ व्या ओव्हरमध्ये त्याने तीन विकेट्स घेतल्या आणि एकही धाव दिली नाही. या टप्प्यावर अनेक टीम्स जोरदार हल्ला करून धावसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नात असतात. त्याने इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव दिली.

ओह, बूमने १८ डॉट बॉल्सही टाकले. हे बॉल्स त्याने त्या रात्री टाकलेल्या चारपैकी तीन ओव्हर्सइतके आहेत.

त्यामुळे सामनावीर पुरस्कार मिळवण्यासाठी दुसरा कुठलाही उमेदवार नव्हता.

चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी पहिल्यांदाच आलेल्या बूमच्या पहिल्याच बॉलवर अजिंक्य राहणेने बॅकवर्ड पॉइंटवर एक चौकार फटकावला. त्या रात्री त्याने दिलेली ही एकमेव बाऊंड्री होती.

बूमने त्या ओव्हरमध्ये आणखी एकच धाव दिली आणि व्यंकटेश अय्यरला अत्यंत सुंदर गोलंदाजी करून बाद केले.

कर्णधार रोहित शर्माने त्याला नंतर मागे ठेवून स्लॉग ओव्हर्समध्ये शक्तिशाली आंद्रे रसेलचा सामना करण्यासाठी राखले. ही योजना उत्तम ठरली.

बूम १५ व्या ओव्हरमध्ये हल्ला करायला परत आला आणि दुसऱ्या चेंडूवर त्याने रसेलला लाँग रनवर पॉलीला कॅच द्यायला लावून बाद केले.

त्यानंतर बूमने हाच खेल अत्यंत धोकादायक नितीश राणासोबत खेळला. त्याने राणाच्या डोक्याजवळ जाईल असा जोरदार बाऊन्सर टाकला आणि फलंदाजाच्या ग्लोव्ह्जना लागून चेंडू ईशान किशनच्या हातात विसावला.

त्यानंतर त्याची अदभुत १८ वी ओव्हर आली.

बूम आपल्या धमाकेदार यॉर्कर्ससाठी ओळखला जातो. फलंदाज त्याच्यासाठी तयार असतील हे त्याला नक्कीच माहीत होते. त्यामुळे त्याऐवजी त्याने शांतपणे एक शॉर्ट चेंडू टाकून शेल्डन जॅक्सनला धक्का दिला. त्याचा अंदाज चुकला आणि चेंडू डीप स्क्वेअर लेगवर डॅन सॅम्सने अत्यंत सुंदर डायव्हिंग करून पकडला.

दोन चेंडूंनंतर बूमने पॅट कमिन्सला शॉर्ट चेंडू टाकला. त्याने तिलक वर्माकडे आपली विकेट दिली.

त्यानंतरच्या चेंडूवर बूमने आपला अँगल बदलून विकेट राऊंड केली आणि सुनिल नरिनेला वेगवान लेंथ चेंडू टाकून तो पुढे धावत गेला. त्याने कॅच पकडली आणि आपला पाच विकेट्सचा धुंवाधार कोटा पूर्ण केला.

टिम सूथीने हॅट ट्रिक बॉलचा साममना केला. या वेळी बूमने यॉर्कर टाकला. केकेआरच्या फलंदाजाने तो सोडून देणे पसंत केले.

बूमने त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी केली आणि रिंकू सिंगला सर्व प्रयत्न करूनही मोठी धावसंख्या बनवता आली नाही. शेवटच्या चेंडूवर त्याने फक्त एक धाव काढली.

या सामन्याचा निकाल आमच्या पक्षात लागला नसला तरी जसप्रीत बुमराची ही कामगिरी अनेक वर्षं स्मरणात राहील.