आला रे आला, वर्ल्ड कप विजेता सूर्यादादा आला!!
आकाशाला गवसणी घालणारा स्काय!
विकेटमागे चेंडू भिरकावणारा स्काय.
पलटनचा लाडका स्काय
त्याचा सुपला शॉट हाय फाय💪💙
जसजसा काळ पुढे सरकत जातोय तसतसे त्याचे, मुंबईचे आणि पलटनचे नाते आणखी बहरत चालले आहे. २०२६ मधला वर्ल्ड कप चॅम्पियन ते आता आपला गोल्ड अँड ब्लू परिधान करणारा स्काय... त्याची ग्रँड एंट्री आपल्या सर्वांना रोमांचित करून गेली आहे. तो आयपीएल २०२६ सीझनसाठी एमआय कॅम्पमध्ये अभिमानाने सहभागी झाला आहे. त्याचा फोकस आणखी शार्प, नवा दृष्टीकोन झाला आहे आणि चाहत्यांना सहावा चषक मिळवून देण्यासाठी तो उत्सुक आहे. 😎
𝗗𝗔𝗗𝗔’𝘀 𝗔𝗥𝗥𝗜𝗩𝗔𝗟 𝕄𝕌𝕊𝕀ℂ 𝗩𝗜𝗗𝗘𝗢 😎 pic.twitter.com/0qggshTrlC
— Mumbai Indians (@mipaltan) March 25, 2026
तो तणावाखाली शांत, संयमाने आणि उत्तम फलंदाजी करतो. तो वर्ल्ड कपमध्ये एक आघाडीचा खेळाडू ठरला आणि आता आपला मि. ३६० वानखेडेवर विजयासाठी उत्सुक आहे. तो आपल्या अवतारात उतरतो तेव्हा प्रेक्षकांना व्हिडिओ गेम सुरू असल्यारखे वाटते. 🎮 तुम्हाला सूर्यादादा फलंदाजी तर करताना दिसतोच पण त्याचबरोबर एड्रेनल रश आणि त्याची ऊर्जा जाणवते.
टीममधल्या तरूणांचा तो लाडका आहे आणि अनेकांची प्रेरणा आहे. प्रतिस्पर्धी संघाकडे त्याच्या खेळासाठी काहीही प्रत्युत्तर नाही. पलटन, तो आपला ध्रुव तारा आहे, जो कठीण परिस्थितीत आपले गलबत सावरण्यासाठी सज्ज असतो. आपला सूर्यवंशी... आला रे. 👊