
BANvIND कसोटी पूर्वावलोकनः डब्ल्यूटीसीमध्ये जागा पटकावण्याचे भारतासमोर आव्हान
पांढरा बॉल आऊट, लाल चेंडू इन. रंगीत कपड्यांना बाय बाय. पांढरे कपडे तयार.
भारतासाठी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका फार काही चांगली गेली नाही. पहिले दोन सामने भारताने हरले पण शेवटच्या सामन्यात ईशान किशनने धमाकेदार दुहेरी शतक फटकावून पहिल्या दोन सामन्यांचा व्यवस्थित वचपा काढला.
हरकत नाही. आता स्वरूप बदलले आहे आणि दोन कसोटी सामने प्रतीक्षेत आहेत. इंग्लंडचा संघ सध्या जोरदार तयारीत असल्यामुळे भारताला येणारे सहाही कसोटी सामने जिंकणे आवश्यक आहे. तसे झाले तरच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या शेवटच्या फेरीत भारताला जागा मिळू शकेल. चट्टोग्रामपासूनच सुरूवात होईल आता.
सोबत एक वाईट बातमीही आहे. कर्णधार रोहित शर्माला दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत खेळता येणार नाहीये. तो सध्या भारतात परतलाय आणि डॉक्टर्स तो पुढच्या कसोटीत मैदानात उतरू शकेल याची पूर्ण काळजी घेत आहेत. आपला हिटमॅन पूर्णपणे फिट होईपर्यंत केएल राहुल त्याची जागा घेणार आहे.
आता या स्वरूपाबाबत सांगायचे झाल्यास बांग्ला टायगर्सनी भारताविरूद्ध एकही सामना जिंकलेला नाही. दोन्ही संघांदरम्यान झालेल्या ११ सामन्यांमध्ये टीम इंडियाने नऊ सामने जिंकलेत तर दोन सामने बरोबरीत सुटले आहेत. त्यामुळे आपले या स्वरूपाच्या सामन्यांमध्ये कायमच वर्चस्व राहिले आहे.
काय: बांग्लादेश विरूद्ध भारत, दोन सामन्यांची कसोटी मालिका
कधी: १४-१८ डिसेंबर, २२-२६ डिसेंबर
कुठे: चट्टोग्राम (पहिली कसोटी) आणि ढाका (दुसरी कसोटी)
ते काय म्हणतात:
“रोहित शर्मा हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. तो आपल्या टीमचा कर्णधारही आहे. त्यामुळे आम्हाला त्याची कमतरता नक्कीच जाणवेल. भारताला रोहितची कमतरता एक कर्णधार आणि फलंदाज म्हणून निश्चितच जाणवेल. आम्हाला आशा आहे की तो लवकर बरा होईल आणि दुसऱ्या कसोटीसाठी पुन्हा खेळायला उतरेल.” – भारताचा प्रभारी कर्णधार के एल राहुल.
काय अपेक्षित आहे: अभिमन्यू ईश्वरन आणि सौरभ कुमार यांच्यासारखे एक दोन नवीन चेहरे आणि आपले नेहमीचे यशस्वी खेळाडू यांच्यासोबत टीम इंडियाचा संघ संतुलित असेल अशी अपेक्षा आहे. याशिवाय विराट कोहलीचे ७२ वे शतक अगदी योग्य वेळी पूर्ण झाले आहे. त्यामुळे त्याचा आणि भारताचा निर्धार आणखी पक्का होईल.
आपण काय करायचे आहे: आरामात बसा, निवांतपणे कसोटी मालिकेचा आनंद घ्या. आपले मेन इन ब्लू अलीकडच्या काळात पहिल्यांदाच पांढरा वेश परिधान करणार आहेत. घड्याळ फिरू द्या आणि फटके, ब्लॉक्स, बचाव आणि चेंडू स्विंग होणे या सगळ्यांची मजा घेऊया!