
एमआय ब्लू आणि गोल्डपासून इंडिया ब्लूपर्यंतः हॅलो, तिलक वर्मा, ओडीआयमध्ये स्वागत आहे
ऑगस्ट २०२३ मध्ये टी२०आयमध्ये पदार्पण. सप्टेंबर २०२३ मध्ये ओडीआयमध्ये पदार्पण. आपल्या तरूण खेळाडू तिलक वर्मासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची दारे खुली होत आहेत आणि त्या दारातून तो दिमाखदार प्रवेश करत असताना आम्हाला त्याचा अभिमान वाटतोय.
All set for his ODI debut! 👌👌
— BCCI (@BCCI) September 15, 2023
Congratulations to Tilak Varma as he receives his #TeamIndia ODI cap from captain Rohit Sharma 👏 👏#AsiaCup2023 | #INDvBAN pic.twitter.com/kTwSEevAtn
"थेट आशिया कपमध्येच मी पदार्पण करेन आणि तेही एकदिवसीय सामन्यात असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. मी ओडीआयमध्ये भारतासाठी पदार्पण करेन असे कायम स्वप्न पाहिले होते. पण ही खूपच मोठी गोष्ट आहे. एकाच वर्षात मला टी२०आयमध्ये खेळायची संधी मिळाली आणि लगेच पुढच्याच महिन्यात मला एशिया कपसाठी खेळायला सांगण्यात आले. मी नक्कीच स्वप्नात आहे. माझे स्वप्न सत्यात उतरले आहे, हे मात्र नक्की," असे तिलकने २०२३ आशिया कपसाठी १७ खेळाडूंच्या संघाची घोषणा झाल्यानंतर BCCI.tv वर बोलताना सांगितले.
१५ सप्टेंबर २०२३ रोजी हैदराबादचा तरूण खेळाडू आपले स्वप्न सत्यात उतरताना पाहणार आहे आणि सर्व स्वरूपातला खेळाडू म्हणून त्याच्या वाढीच्या प्रवासातला हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
Full speed ahead ⏩🇮🇳 pic.twitter.com/292dymmfD9
— Tilak Varma (@TilakV9) September 1, 2023
हा प्रवास पारंपरिक पद्धतीने सुरू झाला. डिसेंबर २०१८ मध्ये रणजी ट्रॉफी, फेब्रुवारी २०१९ मध्ये सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि सप्टेंबर २०१९ मध्ये विजय हजारे ट्रॉफी. भारतीय संघातल्या प्रवेशाची त्याची पहिली पावले २०२० मध्ये अंडर १९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पडली.
परंतु तिलकच्या क्रिकेटच्या साहसी प्रवासाला एक महत्त्वाचा आयाम २०२२ मध्ये मिळाला. मुंबई इंडियन्सने त्याला आयपीएल १५ मध्ये संधी दिली. त्याच्याकडचे अप्रतिम स्ट्रोक्स आणि जोरदार षटकार यांच्यामुळे त्याने आयपीएल २०२२ आणि आयपीएल २०२३ मध्ये ३०० पेक्षा अधिक धावा केल्या आणि भारतीय टीम निवडीसाठी त्याचे नाव चर्चेत आले.
तिलकच्या भारतीय संघातील प्रवेशासाठी ऑगस्ट २०२३ पहिला टप्पा ठरले. त्याने या संधीचे अगदी स्टाइलमध्ये सोने केले. त्याने सात टी२०आय सामन्यांमध्ये १७४ धावा केल्या, एक अर्धशतक आणि एक विकेट घेतली. त्यामुळे तो पुढील काही सीझन्स, महिन्यांमध्ये आणि वर्षांमध्ये लोकांचे लक्ष राहणारा खेळाडू ठरेल यात काहीच शंका नाही.
एक देशांतर्गत खेळाडू ते आयपीएल स्टार ते भारतीय क्रिकेट टीममधला उगवता तारा. हे परिकथेपेक्षा काही कमी नाही. अत्यंत कमी कालावधीत एवढे मोठे यश मिळाल्यानंतरही तो अत्यंत नम्र आहे आणि आपल्या या सातत्यपूर्ण पद्धतीने पुढे जाण्याचे श्रेय आपला कर्णधार, नेता आणि महान खेळाडू रोहित शर्माला देतो.
“सुरेश रैना आणि रोहित शर्मा हे माझे आदर्श आहे. मी रोहित भाईसोबत जास्त वेळ घालवतो. माझ्या पहिल्या आयपीएलमध्ये त्याने मला सांगितले होते की, तिलक तू सर्व स्वरूपातला क्रिकेटपटू आहेस. माझा आत्मविश्वास तेव्हा प्रचंड वाढला होता. त्याचे मार्गदर्शन माझ्यासाठी एका दीपस्तंभासारखे आहे.”
“तो कायम माझ्याशी संवाद साधतो आणि खेळाचा आनंद घे असे सांगतो.”
तिलक वर्मा हा एक उभरता खेळाडू आहे. त्याच्या या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर आपण त्याच्या सोबत आहोत. त्याचा हा प्रवास पाहणे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ओडीआय क्रिकेटमध्ये स्वागत आहे मित्रा.