News

आयपीएल २०२४ चे पूर्ण वेळापत्रक आले- तारखा बघून ठेवा, सुट्ट्या घेऊन ठेवा

By Mumbai Indians

आमच्या आयपीएल २०२४ च्या पहिल्या सामन्यात उत्साह, आनंद, जल्लोष दुःख आणि प्रत्येक भावना आपल्याला पाहायला मिळाली. पण मग आता ब्लू अँड गोल्डसाठी आणखी असेच अनुभव मिळतील असे आम्ही तुम्हाला सांगितले तर? का? कारण आयपीएलचे पूर्ण वेळापत्रक आले आहे!

गुजरात टायटन्सविरूद्ध आयपीएल २०२३ क्वालिफायर २ च्या परत एकदा खेळासोबत आमच्या ट्रॉफी क्र. ६ ची सुरुवात झाली. पुढच्या आठवड्यात मुम्बॉइज आमच्या किल्ल्यात- वानखेडे स्टेडियमवर पुढचा सामना खेळणार आहेत. आमचे प्रतिस्पर्धी आहेत राजस्थान रॉयल्स.

होळीच्या सणानिमित्ताने लीगने आपल्या देशातील आणि जगभरातील क्रिकेट चाहत्यांना क्रिकेटच्या दुसऱ्या टप्प्याची माहिती द्यायचे ठरवले आहे. कॅलेंडरवर खुणा करून ठेवा.

पहिले वेळापत्रक ७ एप्रिलपर्यंत जाहीर झाले होते. आपला दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध घरच्या खेळपट्टीवरचा सामना ब्लू अँड गोल्डला पटकन एक्शनमध्ये आणेल.

दुसऱ्या टप्प्यातला आपला पहिला प्रतिस्पर्धी?

आपण ११ एप्रिल रोजी घरच्या खेळपट्टीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध खेळणार आहोत.

आपला सीझनचा शेवटचा लीग सामना कधी आहे?

लखनौ सुपर जायंट्स वानखेडेवर १७ मे रोजी खेळणार आहेत.

एल क्लासिकोच्या तारखा काय आहेत? ब्लू विरूद्ध यलो सामना?

१४ एप्रिल २०२४ | रविवार संध्याकाळ @ वानखेडे स्टेडियमवर. तुम्ही हा दिवस घालवण्यासाठी दुसरा चांगल्या पर्यायाचा विचार करूच शकत नाही. हे दोन्ही संघ या वेळी लीगच्या टप्प्यात फक्त एकदाच एकमेकांना भेटणार आहेत. तुमच्या कॅलेंडर्सवर खूण करा.

प्लेऑफ्सचे वेळापत्रक कसे असणार आहे?

आयपीएल प्लेऑफ्सची सुरूवात अहमदाबादमध्ये २१ मे २०२४ रोजी क्वालिफायर १ सामना खेळवून होईल आणि २२ मे २०२४ रोजी एलिमिनेटर सामना होईल. त्यानंतर सगळे संघ आपले पेनल्टीमेट आणि ग्रँड फिनालेसाठी चेन्नईला रवाना होतील.

क्वालिफायर २ सामना २४ मे २०२४ रोजी होईल तर आयपीएल २०२४ फायनल २६ मे रोजी एम. ए. चिन्नास्वामी स्टेडियमवर होईल.

मुंबई इंडियन्सचा आयपीएल २०२४ मधला प्रवास:-

दिनांक

वेळ (आयएसटी)

प्रतिस्पर्धी

स्थान

मार्च 24, 2024

7:30 PM

गुजरात टायटन्स

अहमदाबाद

मार्च 27, 2024

7:30 PM

सनरायझर्स हैदराबाद

हैदराबाद

एप्रिल 1, 2024

7:30 PM

राजस्थान रॉयल्स

मुंबई

एप्रिल 7, 2024

3:30 PM

दिल्ली कॅपिटल्स

मुंबई

एप्रिल 11, 2024

7:30 PM

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

मुंबई

एप्रिल 14, 2024

7:30 PM

चेन्नई सुपर किग्स

मुंबई

एप्रिल 18, 2024

7:30 PM

पंजाब किंग्स

मोहाली

एप्रिल 22, 2024

7:30 PM

राजस्थान रॉयल्स

जयपूर

एप्रिल 27, 2024

3:30 PM

दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली

एप्रिल 30, 2024

7:30 PM

लखनौ सुपर जायंट्स

लखनौ

मे 3, 2024

7:30 PM

कोलकाता नाइट रायडर्स

मुंबई

मे 6, 2024

7:30 PM

सनरायझर्स हैदराबाद

मुंबई

मे 11, 2024

7:30 PM

कोलकाता नाइट रायडर्स

कोलकाता

मे 17, 2024

7:30 PM

लखनौ सुपर जायंट्स

मुंबई

मे 21, 2024

7:30 PM

क्वालिफायर1

अहमदाबाद

मे 22, 2024

7:30 PM

एलिमिनेटर

अहमदाबाद

मे 24, 2024

7:30 PM

क्वालिफायर2

चेन्नई

मे 26, 2024

7:30 PM

फायनल

चेन्नई

हार्दिक कुंग फू पांड्याच्या नेतृत्वाखाली आणि रोहित हिटमॅन शर्मा, आपला दादा सूर्या आणि जसप्रीत बुम बुम बुमरा सज्ज असताना आमची मुंबई तुम्हाला अत्यंत धमाल क्रिकेट आणि मनोरंजन द्यायला सज्ज आहे.

चला पलटन, आमच्यावर तुमच्या प्रेम आणि उत्साहाचा वर्षाव कमेंट्समध्ये करा आणि तुम्ही तुमची आवडती जर्सी घालून तुमच्या आवडत्या टीमला कुठे पाहणार आहात हे सांगा!