News

५१ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मास्टर! २००८-२०१३ पासून सचिननन.... सचिनन.. च्या क्षणांची उजळणी

By Mumbai Indians

क्रिकेटचा देव असलेला सचिन रमेश तेंडुलकर आज ५१ वर्षांचा झाला. क्रिकेटच्या कॅलेंडरमध्ये २४ एप्रिल हा खूप खास दिवस आहे. तुम्हाला माहीत नसेल तर त्याच्या जन्माचा दिवस आणि महिना यांची बेरीज केल्यास (२+४+४), तुम्हाला १० हा आकडा मिळतो. त्याने आपल्याला ३०,००० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय धावांची मेजवानी दिली  आहे, १०० आंतरराष्ट्रीय क्रिकेटची शतके आणि एक आयसीसी ओडीआय वर्ल्ड कपदेखील दिला आहे. 

एक कर्णधार, केळाडू आणि आयकॉन म्हणून एसआरटीचे हे महान व्यक्तिमत्व मुंबई इंडियन्स आज ज्या ठिकाणी आहे त्याचा महत्त्वाचा पाया आहे. मास्टर ब्लास्टरला ५१ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण आज इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मधल्या अप्रतिम सामना जिंकून देणाऱ्या कामगिरीची माहिती घेणार आहोत.

आयपीएल २००८, सामना #५५: ४०* रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध

एमआयने सलग तीन सामने हरले होते आणि सीझन चांगल्या उत्साहात संपवायचा होता. सचिनने नाबाद ४० धावा केल्या. त्या १८ ओव्हर्समध्ये १२३ धावांच्या एमआयच्या पाठलागासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या. त्याने सुरूवातीला सनथ जयसूर्यासोबत ९६ धावांची भागीदारी केली (३७ चेंडूंमध्ये ५४ धावा) आणि त्यानंतर रॉबिन उत्थपासोबत खेळून १६ ओव्हर्समध्ये (१६ चेंडूंमध्ये १९ धावा) नऊ विकेट्स हातात ठेवून विजय मिळवला.

आयपीएल २००९, सामना #: चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध ५९*

सीझनच्या पहिल्याच सामन्यात अर्धशतक, विजयासाठी अर्धशतक, सीएसकेविरूद्ध अर्धशतक आणि सचिन तेंडुलकरचे अर्धशतक ही एमआय पलटनसाठी एक उत्तम मेजवानी ठरली. सामन्यापूर्वी पाऊस पडल्यामुळे खेळपट्टी ओलसर झाली. त्यानंतर सचिनच्या मोजून मापून केलेल्या इनिंग्समुळे एमआयला १६५/७ पर्यंत पोहोचता आले आणि मग गोलंदाजांनी एमएस धोनीच्या यलो ब्रिगेडविरूद्ध त्याचा बचाव करून १९ धावांनी विजय मिळवला.

आयपीएल २०१०, सामना #४५: राजस्थान रॉयल्सविरूद्ध ८९*

तो काय सामना होता म्हणता! एमआयने प्रथम फलंदाजी करून तीन एकामागून एक विकेट्स घालवल्या, परंतु एसआरटीने केलेल्या कर्णधाराच्या खेळीदरम्यान त्याने तीन भागीदारी केल्या- जेपी दुमीनेसोबत ६३ (५२ चेंडू), कायरन पोलार्डसोबत ५० (३३ चेंडू) आणि आर सतीशसोबत ३१* (१२ चेंडू) यांच्यामुळे मुंबईचा संघ २० ओव्हर्समध्ये १७४/५ वर पोहोचला. त्याने एमआय बॉइजना आयपीएल २०१० च्या सेमी फायनल्समध्ये तर पोहोचवलेच पण त्याचबरोबर मास्टर ब्लास्टरने त्याच्या ५९ चेंडूंमधल्या नाबाद ८९ धावांसोबत सामनावीर पुरस्काराने हा सामना संपवला.

आयपीएल २०११ सामना #: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध ५५*

सचिन तेंडुलकरला या वेळी पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी गोलंदाजांसोबत खेळताना आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवताना पाहिले. मास्टर ४६ चेंडूंमध्ये ५५ धावांवर पुन्हा एकदा नाबाद राहिला. त्याने अभिमन्यू मिथुन आणि तिलरत्ने दिलशानच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी केली. त्याच्या अंबाती रायाडूसोबतच्या (५० चेंडूंमध्ये ६३* धावाच्या) इनिंगमुळे एमआयने कठीण पाठलाग सहजपणे पार केला.

आयपीएल २०१२ सामना #४९: चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध ७४

तुम्हाला ड्वायने स्मिथच्या शेवटच्या ओव्हरमध्ये १७४ धावांच्या पाठलागात केलेली लुटालूट आठवते का? तर सचिनने ७४ धावा करून पाया रचून दिला आणि हा अत्यंत सुंदर खेळ पाहायला मिळाला. त्याच्या ४४ चेंडूंधल्या इनिंगमध्ये त्याने ११ चौकार आणि एक षटकार मारला. त्याने रोहित शर्मासोबत (४६ चेंडूंमध्ये ६० धावा) एक मास्टर अँड अप्रेंटिस शो करताना १२६ धावांची भागीदारी केली.

आयपीएल २०१३ सामना #५३: कोलकाता नाइट रायडर्सविरूद्ध ४८ धावा

प्लेऑफ्ससाठीची रेस शिगेला पोहोचली होती. परंतु एसआरटीच्या २८ चेंडूंमधल्या ४८ धावांच्या धमाकेदार खेळामुळे केकेआरच्या गोलंदाजांना वानखेडेवर एमआयच्या धावांच्या मशीनला रोखणे आणखी कठीण झाले. त्याने रायन मॅकलॅरनच्या गोलंदाजीवर चौथ्या ओव्हरमध्ये पाच सलग चौकार ठोकले. त्यानंतर मुंबईने एकूण १७०/६ धावा नोंदवल्या आणि कोलकात्याला १८.२ ओव्हर्समध्ये १०५ धावांवर बाद केले.