News

INDvAUS तिसरा कसोटी सामनाः लॉयनच्या फिरकीमुळे कांगारू भारतीय भूमीवर विजयी

By Mumbai Indians

सध्या सुरू असलेल्या बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीने क्रिकेट चाहत्यांना भावनांच्या रोलर कोस्टर राइडवर नेण्याचे वचन दिले होते. या ट्रॉफीने अक्षरशः ते वचन पूर्ण केले आहे. इंदोरमधल्या तिसऱ्या कसोटीत तर कमालच झाली आहे.

नॅथन लॉयनची वादळी खेळी, मॅथ्यू कुन्हेमनच्या जबरदस्त पाच विकेट्स, भारताचे फलंदाजीत चाचपडणे, ऑस्ट्रेलियाच्या खालच्या फळीची पडझड आणि फक्त ७६ धावांचे आव्हान या काही अत्यंत आश्चर्यजनक गोष्टी घडल्या. शिवाय आपल्या संघाचा पराभव झाला ते वेगळेच.

पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांचा धुव्वा

आपल्या पहिल्या इनिंगमध्ये ३० पेक्षा जास्त धावा काढू न शकणे ही गोष्ट भारतीय क्रिकेटच्या इतिहासात फारच दुर्मिळ. विराट कोहलीने २२ म्हणजे सर्वाधिक धावा केल्या आणि यजमान संघ फक्त ३३.२ ओव्हर्समध्ये १०९ धावांवर बाद झाला.

कुन्हेमनची इंदोरच्या खेळपट्टीवर फटकेबाजी

"मी माझे उर्वरित आयुष्य इंदोरमध्ये घालवून बाकीचे संपूर्ण करियर इथे खेळू शकतो. इथले वातावरण फारच सुंदर आहे", असे मत मॅथ्यू कुन्हेमनने पहिल्याच दिवशी ५/१६ अशी कामगिरी केल्यानंतर व्यक्त केले. त्याला ऑस्ट्रेलियन जादू असे नाव पडले आहे. त्याने भारतीय फलंदाजांना पहिल्या इनिंगमध्ये घुमव घुमव घुमवले आणि रोहित शर्मा, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना हल्ला करण्याची संधीच दिली नाही.

ऑस्ट्रेलियाच्या खालच्या फळीची पडझड

कसोटीमध्ये पिछाडीवर असलेल्या भारताला विजयात रूपांतर करण्यासाठी संधी हवी होती. त्यांना ती मिळाली का? हो. कधी? ७०व्या ओव्हरच्या शेवटी.

ऑस्ट्रेलियन संघ ७०व्या ओव्हरमध्ये १८६/४ वर असताना रवी अश्विन आणि उमेश यादव यांनी निश्चय करून कांगारूंच्या शेवटच्या सहा फलंदाजांना ३४ चेंडूंमध्ये फक्त ११ धावांवर बाद केले. शर्मा आणि कंपनीसाठी पुन्हा लढण्याची संधी होती ही बहुतेक.

बीजीटीचा महान गोलंदाज म्हणून लॉयनचा सिंहासनावर ताबा

नॅथन लॉयनने भारतीयांच्या ढिसाळ फलंदाजीचा फायदा घेऊन चांगलीच धमाल उडवून दिली. बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीमध्ये एखाद्या इनिंगमध्ये त्याच्या ८/६४ कामगिरीमुळे त्याने अनिल कुंबळेचा (113*) मालिकेतील सर्वाधिक विकेट्सचा (एकूणच) विक्रम मागे टाकला आहे. थोडक्यात हा ३५ वर्षीय खेळाडू बीजीटीचा गोलंदाजी मास्टर ठरला आहे.

ऑस्ट्रेलियाने धावसंख्या सहज पूर्ण केली

INDvAUS कसोटी सामना कधीही एकतर्फी असत नाही हे प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याला माहीत आहे. दुर्दैवाने हा सामना एकतर्फी ठरला. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ७६ धावांचा पाठलाग सुरू केल्यानंतर अश्विनने उस्मान ख्वाजाची विकेट घेतली. परंतु ट्राविस हेडच्या नाबाद ४९ धावांमुळे पाहुण्या संघाने कसोटी सामना १८.५ ओव्हर्समध्ये संपवला आणि चार सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये विजय नोंदवला.

या निकालाचा अर्थ काय होतो? जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२३ मध्ये ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीतील पहिला संघ म्हणून पात्र ठरला आहे. मग भारत बाद झाला का? नाही. आपण श्रीलंकेच्या न्यूझीलंडविरोधातील सामन्यांच्या निकालांवर अवलंबून न राहता अंतिम फेरीत जाण्यासाठी तयार आहोत. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवरील चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यातील विजयाने हे साध्य होऊ शकते.

थोडक्यात धावसंख्या

ऑस्ट्रेलिया १९७ (उस्मान ख्वाजा ६०, रवींद्र जाडेजा ४-७८, उमेश यादव ३-१२) आणि १ वर ७८ (ट्राव्हिस हेड ४९*) कडून भारताचा १०९ धावांवर पराभव (मॅथ्यू कुन्हेमन ५-१६, नॅथन लॉयन ३-३५) आणि १६३ (चेतेश्वर पुजारा ५९, नॅथन लॉयन ८-६४) नऊ विकेट्सनी पराभव.