News

कोहली अश्विनमुळे भारत विश्वचषक कसोटीच्या अंतिम फेरीत, चौथ्या INDvAUS कसोटीत बरोबरी

By Mumbai Indians

एक आणि एक दोनही होतात आणि अकराही. तसंच विराट कोहली आणि रवीचंद्रन अश्विन यांच्या जोडगोळीने दुर्दम्य इच्छाशक्ती दाखवत अहमदाबाद येथे झालेल्या बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटीत सामना बरोबरीत सोडवला.

उस्मान ख्वाजाचा १० तासांचा खेळ, रवी अश्विनच्या जोरदार सहा विकेट्स, किंग कोहलीचे दिमाखदार शतक आणि अक्झर पटेलच्या फलंदाजी आणि गोलंदाजीतील अप्रतिम प्रदर्शनामुळे अत्यंत संथ खेळपट्टीवर थकवणाऱ्या कसोटी सामन्याला त्यांनी खेचून बरोबरीत सोडवले.

ख्वाजा, ग्रीन यांचे ऑस्ट्रेलियन फलंदाजीमध्ये वर्चस्व

उस्मान ख्वाजाने नरेंद्र मोदी स्टेडियमवरील फलंदाजीच्या स्थितीचा वापर करून ४२२ चेंडूंमध्ये १८० धावा फटकावल्या. तो जवळपास १० तास मैदानावर टिकून होता. ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या भारतातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वोत्तम धावसंख्येला कॅमेरॉन ग्रीनच्या कसोटी सामन्यातील पहिल्यावहिल्या शतकाचे पाठबळ मिळाले. त्याने हे शतक आपल्या २८ व्या कसोटी सामन्यात आणि २८ व्या कसोटी इनिंगमध्ये फटकावले.

अश्विन- कसोटीमध्ये भारताचे प्रमुख हत्यार

रवीचंद्रन अश्विनच्या प्रत्येक चेंडूसोबत त्याने एक विक्रम नोंदवला जाईल याची काळजी घेतली. चौथ्या कसोटीतील पहिल्या इनिंगमध्ये अश्विनने सहा विकेट्स घेतल्या (६/९१). त्यामुळे तो अनिल कुंबळेला मागे टाकून (ऑस्ट्रेलियाविरूद्ध १११ विकेट्स) कसोटी मालिकेत कांगारूंविरूद्ध पहिल्या क्रमांकाचा विकेट घेणारा गोलंदाज ठरला.

गिल, कोहली- भारताच्या फलंदाजीचे भक्कम तंबू

शुभमन गिलने आपल्या बॅटने धावांचा अक्षरशः पाऊस पाडला. त्याने ६१.२ ओव्हर्समध्ये धमाकेदार शक फटकावले. त्याची ही खेळी खूप खास आहे कारण तो रोहित शर्मा, केएल राहुल आणि सुरेश रैना यांच्यानंतरचा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे.

त्यानंतर गिलने कोहलीच्या हातात धुरा सोपवली. त्याने आपले २८ वे कसोटी शतक आणि आपल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या करियरमधील ७५ वे शतक पूर्ण केले. रेड बॉल क्रिकेटमध्ये त्याच्यासाठी पडलेला १२०५ दिवसांचा दुष्काळ अखेरीस संपला.

अक्झरच्या कसोटीतील अष्टपैलू खेळाची कमाल

अक्झर पटेल हा भारतासाठी नशीबवान ठरू लागला आहे. त्याने पहिल्या इनिंगमध्ये विराट कोहलीसोबत केलेल्या ७९ आणि १६२ धावांच्या सहाव्या विकेटसाठीच्या भागीदारीमुळे चौथ्या कसोटीमध्ये भारताचे पारडे जड झाले.

त्याने प्रत्येक इनिंगमध्ये एकेक विकेट घेतली असली तरी त्याने गोलंदाजीमध्ये ५० कसोटी विकेट्स घेणारा सर्वाधिक वेगवान भारतीय खेळाडू अशी ख्याती मिळवली आहे.

अहमदाबादमध्ये हिसाब बरोबर

ट्रेव्हिस हेड (९०) आणि मार्नस लाबुसचेंज (६४३) यांनी पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाजीचा ताबा घेतला आणि सामना बरोबरीत सोडवायला मदत केली.

याचाच अर्थ असा की पाहुण्या संघाचा सलग चौथ्या वेळी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये पराभव झाला आहे. परंतु हे दोन्ही संघ ७ जून रोजी ओव्हलवर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भेटतील.

थोडक्यात धावसंख्या

ऑस्ट्रेलिया ४८० (उस्मान ख्वाजा १८०, कॅमेरॉन ग्रीन ११४, रवीचंद्रन अश्विन ६/९१) आणि २ विकेट्सवर १७५ धावा (ट्राव्हिस हेड ९०, मार्नस लाबुसचेंज ६३*) भारतीय संघासोबत सामना बरोबरीत सुटला. भारत ५७१ (विराट कोहली १८६, शुभमन गिल १२८, अक्झर पटेल ७०, टॉड मर्फी ३-११३, नॅथन लायन ३/१५१)