News

INDvNZ, दुसरा ओडीआय: राहुलचे झकास शतक वाया, राजकोटमध्ये न्यूझीलंडची मालिकेत बरोबरी

By Mumbai Indians

आता पुन्हा त्याच ठिकाणी. दोन्ही संघ १-१ वर. आता भेटणार इंदोरमध्ये. 

या दिवशी भारताने अटीतटीने प्रयत्न केले. परंतु न्यूझीलंडने चांगला खेळ केला. उत्तम पाठलाग करून राजकोटमध्ये मालिका बरोबरीत आणली.

ओडीआय क्र. २ मध्ये काय घडले ते पाहा👇

वेगवान सुरूवात, मध्येच अडखळले

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या रो आणि शुभमन यांनी सकारात्मक विचाराने खेळ सुरू केला आणि भारताला लवकरच आघाडीवर आणले. 

चेंडू सीमापार टोलवले गेले. टायमिंग उत्तम होते. त्यानंतर एक असा टप्पा आला जो भारतीय चाहत्यांना चांगलाच माहीत आहे. भारतीय संघ ७०/० वरून ११८/४ पर्यंत कोसळला. त्यामुळे सामन्याचा तराजू पाहुण्या संघाच्या दिशेने गेले. मधल्या ओव्हर्समध्ये शांतता होती.

केएल राहुल सुटकेसाठी आला

मग आला शांत राहुल. 😮💨 

राहुलने तणावाखाली उत्तम खेळ केला. त्याने फक्त ९२ चेंडूंमध्ये झकास ११२ धावा करून इनिंग हातात ठेवली. अप्रतिम टायमिंग, सुंदर फटेकाबाजी आणि संयम त्याने दाखवला.

त्याला वेळेत मदतही मिळाली. रवींद्र जडेजा आणि नितिश कुमार रेड्डी यांनी वेळेत कामगिरी केली. त्यांनी भारतीय संघाला २८४/७ वर नेऊन ठेवले.

न्यूझीलंडचा देखणा खेळ! 👏

न्यूझीलंडचा खेळ फारच सुंदर होता. त्यांना श्रेय द्यावेच लागेल. 

भारताने चांगली गोलंदाजी केली. परंतु त्यापुढे जाऊन पाहुण्या संघाने इनिंगमध्ये बाजी मारली. डेरिल मिशेल सुंदर खेळत होता. त्याने अत्यंत अचूकपणे दिमाखदार १०० धावा केल्या.

विल यंग आणि ग्लेन फिलिप्स यांनी मदत केल्यामुळे न्यूझीलंडच्या संघाने पाठलाग नियंत्रणात ठेवला आणि कोणताही तणाव येऊ न देता यश पदरात पाडून घेतले.
 या निकालामुळे मालिका १-१ अशी बरोबरीत आली आहे. त्यामुळे रविवारी इंदोरमध्ये होणाऱ्या सामन्यात निकाल लागेल. 👊

शेवटचा सामना. शेवटची संधी.