News

२०२१ मध्ये #OnThisDay: गब्बाचे गर्वहरण!

By Mumbai Indians

 “गब्बात भेटू,” ते म्हणाले.

काही सामन्यांत विजय मिळतो. काही सामन्यांमध्ये अद्वितीय विजय मिळतो. आणि मग गब्बाचा विजय मिळतो. 🔥

पाच वर्षांपूर्वी #OnThisDay भारतीय क्रिकेटने अशा ठिकाणी इतिहास रचला जिथे इतिहास कधी बदलेल याची शक्यताच नव्हती.

मालिका १-१ अशी बरोबरीत होती. एक कसोटी सामना होता. ऑस्ट्रेलिया आणि तेही गब्बावर. ३२ वर्षांत हा बालेकिल्ला अभेद्य राहिला होता. 🏟

आणि भारतीय संघ? कोहली नाही. जडेजा नाही. बुमराह नाही. शामी नाही. अश्विन नाही. त्यांनी केलेली कामगिरी काळजावर कोरलेली आहे. 💙

अकराच्या संघात दोन खेळाडू जे प्रथमच खेळणार होते. वॉशिंग्टन सुंदर. टी. नटराजन. मैदानाबाहेर प्रचंड आवाज होता. सर्वांच्या मनात शंका. लोकांना पराभवाची खात्रीही होती.

भारताला कोणीही शक्यता दिली नव्हती. पण ड्रेसिंग रूममध्ये दृष्टीकोन वेगळाच होता. 💪

शार्दुल ठाकूर, नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. प्रत्येकाने तीन विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाला जराही सुट्टी न देता त्यांना ३६९ वर पहिल्या इनिंगमध्ये रोखण्यात आले.

भारतीय संघ फक्त १८६/६ करू शकला! 😥 संघ अडचणीत असताना शार्दुल आणि वशी एकत्र आले. 🤝

त्यानंतर जे घडले ते अविश्वसनीय होते. सातव्या विकेटसाठी १२३ धावांची भागीदारी. शांत. संयम. धीर. हळूहळू भारताच्या दिशेने सामना पलटू लागला.

त्यानंतर गोलंदाजांनी चांगलीच भट्टी तापवली. 🔥 शार्दुलने ४/६१ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजने अत्यंत अटीतटीने हल्ल्याचे नेतृत्व केले आणि ५/७३ अशा विकेट्स घेतल्या.  

भारतासमोर ३२८ धावांचे लक्ष्य होते. तेही गब्बावर. 😮

पाठलाग पुढच्या पिढीच्या हातात होता. शुभमन गिलने अतिशय दुर्दम्य इच्छाशक्तीने ९१ धावा फटकावल्या. दुसऱ्या बाजूने चेतेश्वर पुजारा होता. एकामागून एक फटकेबाजी करून त्यांनी ५६ धावा केल्या. वेळ वाढत होता. ताण कमी झाला.

त्यानंतर आला विजयाचा क्षण. ऋषभ पंतच्या बॅटमधून त्या दिवशी ८९ धावांचे फटाके फुटले. ही फक्त एक इनिंग नव्हती तर जिगरबाज खेळ होता. हा एक विश्वास होता. इतिहास रचला जात होता. प्रत्येक चौकार षट्कारासोबत हा बालेकिल्ला ढासळत होता.

अविस्मरणीय पाठलाग. भारताने ३ विकेट्सनी विजय मिळवला. 🙌

गब्बाचा बालेकिल्ला ताब्यात घेतला.. ३२ वर्षांचा दुष्काळ संपला आणि एक नवीन सुवर्णपान लिहिले गेले.

आजही हा विजय अंगावर रोमांच उठवून जातो. 🌟 हा विजय फक्त नसलेले खेळाडू किंवा अशक्य गोष्टींवर नव्हता तर तो विश्वास, खोली आणि धाडसाचा होता.

ते म्हणाले की गब्बात भेटू. भारतीय संघ भेटला आणि त्यांनी इतिहासही रचला. 💙🇮🇳🔥