News

“मुंबईने आकाश मधवालच्या रूपाने आणखी एक भारतीय खेळाडू दिलाय का?” – दिग्गज खेळाडूंची 3.3-0-5-5 बाबत प्रतिक्रिया.

By Mumbai Indians

२४ मे २०२३ हा दिवस सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. माफ करा, निळ्या आणि सोनेरी अक्षरांनी कोरला गेला आहे. अवघ्या ३० मिनिटांत उत्तराखंडच्या टेनिस बॉलच्या पार्श्वभूमीवरून आलेला एक फारसा ज्ञात नसलेला जलदगती गोलंदाज घराघरात पोहोचला. त्याने आयपीएल एलिमिनेटरमध्ये फक्त ५ धावा देऊन ५ विकेट्स घेतल्यात. त्याचे नाव आहे आकाश मधवाल.

लखनौ सुपर जायंट्सच्या धुंवाधार फलंदाजीतून आपला चेंडू अगदी सरळ आणि नीट टाकताना त्याने आपल्या संघाला चेन्नईवरून अहमदाबादला अक्षरशः खांद्यावर उचलून नेले. बाद फेरीतून पात्रता फेरीत. सोशल मीडियावर तर लोक त्याचे दिवाणे झाले आहेत.

क्रिकेट जगतातील दिग्गजांनी आणि आपल्या फॅ-एमआय-लीने आपल्या लाडक्या मिस्टर इंजिनियरचे कौतुक कसे केले ते पाहा.

ओजी ५/५ खेळाडूने त्याच्यासाठी त्यांच्या खास क्लबचे दरवाजे उघडले आहेत

त्याच्या उत्तराखंडमधील माजी प्रशिक्षकांनीही त्याचे भरभरून कौतुक केले आहे आणि आपल्याला त्याचा किती अभिमान वाटतोय हे सांगितले आहे

तुम्ही आयपीएलमधल्या दिग्गजांना प्रभावित करता तेव्हा तुमचा खेळ नक्कीच प्रतिम असतो

 

आपला बूम बूम बुमरासुद्धा या वेळी शांत बसला नाही. त्याने तर त्याचे तोंडभरून कौतुक करून त्याच्या कौशल्यावर शिक्कामोर्तब केले आहे

त्याने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. मोठे व्यासपीठ, मोठा ताण आणि मोठ्ठे जिगर!

बोटे, हात पाय जोडून प्रार्थना!