News

आयपीएल २०२३ एफएक्यूजः नवीन काय, जुने काय आणि बरेच काही

By Mumbai Indians

स्टेज सज्ज आहे. आपले टॅलेंटेड खेळाडूही तयार आहेत. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सुरू झालंय यावर विश्वास बसत नसेल तर स्वतःला चिमटा काढून बघा. आपल्या ओळखीच्या स्थानांवर स्पर्धा सुरू होत असताना मुंबई इंडियन्सच्या कॅम्प्समध्ये नवीन हिरो आले आहेत. म्हणजे काय? सांगतो तुम्हाला लगेचच.

आयपीएलच्या प्रत्येक नवीन आवृत्तीसोबत नवनवीन सरप्राइज असतात. कधीकधी खेळाडूंची उत्तुंग कामगिरी असते, मैदानावरचा ड्रामा असतो किंवा खेळायचे काही नवीन नियमसुद्धा असू शकतात. आणखी प्रतीक्षा न करता आयपीएल २०२३ आपल्यासाठी काय घेऊन आले आहे ते आपण पाहूया.

आपले पहिले आयपीएल २०२३ आव्हान- घरी आणि लांब

आयपीएल २०२३ च्या आपल्या पहिल्या सामन्यात रोहित आणि संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना करण्यासाठी बंगळुरूला जाणार आहेत. हिटमॅन विरूद्ध किंग कोहली. तुम्ही तयार आहात ना?

काय: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध मुंबई इंडियन्स

कधी: रविवार, १ एप्रिल

कुठे: एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू

काय अपेक्षा आहेः जोरदार फटकेबाजी, चौकार आणि षटकारांची आतषबाजी, आणि आरसीबी चाहत्यांच्या बालेकिल्ल्यात #MumbaiMeriJaan आणि सचिन... सचिन... चा जल्लोष, जोफ्रा विरूद्ध फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहली आणि बरेच काही...

मग आता सांगा वानखेडे स्टेडियमवर आपले पहिले प्रतिस्पर्धी कोण असतील? एमएस धोनीचा चेन्नई सुपर किंग्स. ‘थला’ आणि त्याची गँग, तीन वेळा आयपीएलचे चॅम्पियन्स आता शनिवार दिनांक ८ एप्रिल रोजी आयपीएलच्या एल क्लासिकोसाठी मुंबईला येणार आहेत. तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था, एमआय जर्सी, ऑफिसची सुट्टी, टीव्ही सेट्स आणि इंटरनेट कनेक्शन या सगळ्यांची वेळेत व्यवस्था करा.

मुंबई इंडियन्समध्ये नवीन काय आहे?

सीझन बदलतात तसे ड्रेसिंग रूमसुद्धा बदलते. फक्त खेळाडूच बदलत नाहीत. आमच्या टीमच्या थिंक टँकमध्ये काही नवीन खेळाडू आहेत. हॉट सीटवर महान दक्षिण आफ्रिकन खेळाडू मार्क बाऊचर आहे तर लॉर्ड कायरन पोलार्ड एक खेळाडू म्हणून न खेळता आता प्रशिक्षक असणार आहे.

खेळाडूंमध्ये कॅमेरॉन ग्रीन हा आपला सर्वांत महागडा खेळाडू ठरलाय आणि जेसन बेहरेनडॉर्फ (लिलावपूर्व खरेदी) आणि टिम डेव्हिड (कायम राखलेले) हे ऑस्ट्रेलियन जोडीदार त्याच्यासोबत असतील. परंतु प्रकाशझोतात असेल जोफ्रा आर्चर कारण पलटनला आता तो मुंबई इंडियन्सच्या ब्लू आणि गोल्डमध्ये गोलंदाजी करताना दिसणार आहे. अर्थात, सोने परिधान करायला आवडणारा खेळाडू मुंबई इंडियन्ससाठी सोने खणून काढेल अशी अपेक्षा करता येईल, हो की नाही पलटन?

आपल्याला बूम बूम बुमराची खूप आठवण येईल. परंतु महत्त्वाकांक्षी संदीप वॉरियर त्याच्या जागेवर कशा प्रकारे आव्हान पेलवतो हे पाहण्याची उत्सुकताही आहेच.

इम्पॅक्ट प्लेयर नियम

टीमची निवड फॉर्मवर आधारित राहून न करता परिस्थितीवर आधारित राहून करण्याची कल्पना अंमलात आणताना आयपीएलने ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम अंमलात आणला आहे.

याचा काय अर्थ आहे? नाणेफेकीनंतर प्रत्येक कर्णधाराला १५ खेळाडूंची यादी दिली जाईल. ११ खेळाडू मैदानात उतरतील तर चार राखीव असतील. त्यातला एक खेळाडू ‘इम्पॅक्ट प्लेयर’ ची भूमिका बजावेल. हा खेळाडू कोणत्याही भूमिकेत असू शकतोः फलंदाज, गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षक.

ते कधी येऊ शकतील? इम्पॅक्ट प्लेयरला या गोष्टी लक्षात घेऊन सामन्यात आणता येईल: (a) इनिंग सुरू करताना, (b) एखादी ओव्हर संपल्यावर, (c) विकेट पडल्यावर, (d) एखादा फलंदाज निवृत्त होतो तेव्हा (e) ओव्हरच्या मध्ये.

राष्ट्रीयत्वाच्या मर्यादा? खेळणाऱ्या ११ च्या संघात तीन किंवा कमी परदेशी खेळाडू असतील तेव्हाच परदेशी खेळाडू इम्पॅक्ट प्लेयर ठरू शकेल. एखाद्या टीमला चार परदेशी खेळाडूंची नावे खेळणाऱ्या ११ च्या संघात द्यायची असल्यास त्यांना इम्पॅक्ट प्लेयर म्हणून फक्त भारतीय खेळाडूला आणता येईल.

इम्पॅक्ट प्लेयर कसा आणायचा? अर्थात, ही काही नृत्याची स्टेप नाहीये. अंपायर आपले दोन्ही हात घट्ट जुळवतील आणि त्यांच्या डोक्यावर त्यांचे हात क्रॉस सारखे करतील. तेव्हा त्याला आणता येईल.

आपण हे समजून घेऊया. इम्पॅक्ट प्लेयरचा नियम वापरण्यासाठी काही उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत.

  • मोठी धावसंख्या पहिल्यापासूनच उभारायला सुरूवात झालीय आणि एमआय आधी गोलंदाजीला उतरले आहेत. आपल्या विरोधकांनी पॉवर प्लेमध्ये ७०-८० धावा केल्या आहेत आणि तेव्हा रोहित शर्मा फलंदाजासाठी अतिरिक्त गोलंदाज आणू शकतो.
  • बरं, एमआय पाठलाग करत आहेत. ४५ चेंडूंमध्ये ५० धावांची गरज आहे असा विचार केल्यास रोहितला ११ च्या संघात मोठी फटकेबाजी करणाऱ्या खेळाडूऐवजी अधिक शास्त्रशुद्ध फलंदाजी करणाऱ्या खेळाडूला आणता येईल.

नाणेफेकीनंतर खेळणाऱ्या ११ चा संघ आणणे

एकही चेंडू टाकला जाण्यापूर्वी किंवा षटकार ठोकला जाण्यापूर्वी सामना बदलणारा नियम. आधीच्या सीझन्सपेक्षा वेगळी गोष्ट अशी की आयपीएल २०२३ मध्ये कर्णधार खेळाडूंच्या नावांच्या दोन शीट्स घेऊन जातील. टॉसच्या निर्णयामुळे त्यांना सर्वोत्तम ११ मध्ये कोण क्षेत्ररण करेल हे ठरवण्यासाठी मदत मिळेल. पलटन, या नियमाची अंमलबजावणी पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का? चला कमेंट्समध्ये सांगा पटापट.

वाइड्स आणि नो बॉल्स पुनर्पाहणी करण्याचा हक्क

नो बॉल्स आणि वाइड्समुळे अनेकदा एखाद्या टीमचा विशिष्ट सामना जिंकण्याच्या डावपेचांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. हे किती त्रासदायक आहे हे तुम्हाला जलदगती गोलंदाज सांगू शकतात. परंतु आता असे होणार नाही कारण गोलंदाजांसह इतर खेळाडूंना मैदानावरील अंपायर्सनी दिलेल्या निर्णयाला आव्हान देण्याची संधी मिळेल.

अयोग्य हालचालीसाठी दंड

तुमच्या चेंडूंना दूरवर टोलवले जात असताना, तुमच्या गोलंदाजीला खिंडार पाडले जात असताना मैदानावरच्या खेळाडूंची कधीकधी फार चिडचिड होते. मग ते दोन शॉट्सच्या मध्ये फलंदाजांना टोमण्यांचे चेंडू टाकतात किंवा विकेट कीपर फलंदाज फटका मारण्यापूर्वी आपली जागा बदलतात. नवीन नियमानुसार त्यांच्या टीमच्या गोलंदाजाने केलेली गोलंदाजी डेड बॉल असेल आणि तुम्हाला दंड म्हणून फलंदाजी करणाऱ्या टीमला पाच धावा बहाल केल्या जातील.

तुमच्यासाठी जाणून घेण्यासाठी बरेच काही आहे. चला तर मग पलटन. विचार करायला लागूया आणि कॅल्क्युलेटर्स, स्ट्रॅटेजी आणि कल्पना विचारात आणायला सुरूवात करूया.