News

‘आशुतोषची विकेट मोठी होती. त्याने सामना पालटला’: गेराल्ड कोत्झी

By Mumbai Indians

शिगेला पोहोचलेला उत्साह, टिपेला पोहोचलेला सूर, विश्वास आणि मेंटॅलिटी या सर्व गोष्टी महाराजा मुल्लानपूर येथील यादविंद्र सिंग इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर गुरूवारी १८ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सच्या ९ धावांनी विजयासाठी कारणीभूत ठरला.

या विजयाचा एक प्रमुख आधारस्तंभ गेराल्ड कोत्झी होता. त्याने पीबीकेएसच्या फलंदाजीला पॉवर प्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये आळा घातला. त्याने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला.

त्याने आशुतोष शर्माच्या लढाऊ खेळीदरम्यान डेथ ओव्हर्सपूर्वी झालेल्या मध्यांतरातील टीमच्या चर्चेबद्दल माहिती दिली. “त्याने (आशुतोष) शर्माने उत्तम फलंदाजी केली. त्यामुळे आम्हाला काही विचार करावा लागला जेणेकरून पुढे काय करायचे ते ठरवता आले असते,” कोत्झीने पत्रकारांना सांगितले.

“माझ्या मते आम्ही त्याच्याबाबत आमच्या निर्णयाची उत्तम अंमलबजावणी केली. आम्ही त्याला थांबवून सामना जिंकलो. परंतु, आमच्यासाठी तणावपूर्ण परिस्थिती होती. हे सर्वांनाच दिसत होते. परंतु आम्ही फक्त टॅक्टिकल चर्चा केली,” त्याने पुढे सांगितले.

आमची योजना यशस्वी झाली. कराटे किडने आशुतोष शर्माच्या २८ चेंडूंमधल्या ६१ धावांच्या धुंवाधार इनिंगचा खेळ समाप्त केला. ही विकेट तुमच्यासाठी आणि टीमसाठी किती मोठी होती? खूपच.

“ती (आशुतोष शर्माची विकेट) खूप मोठी होती. आम्ही त्याबद्दल खूप खूश झालो होतो. तो त्यांच्यासाठी सामना पालटत होता. त्यामुळे ही विकेट पडल्यावर आम्हाला आनंद झाला यात नवल नाही.”

कोत्झीने त्याला कसे बाद केले याची माहिती दिली. त्याचा चेंडू नेहमीपेक्षा संथपणे आल्याचे मैदानावर दिसत होते.

“त्यांच्या इनिंग्स आणि आम्ही आमच्या इनिंग्समध्ये केलेल्या चुकांवरून एक गोष्ट आमच्या लक्षात आली. ती म्हणजे तुम्ही मोठ्या सीमारेषेचा वापर करणे गरजेचे आहे. ते जलदगती गोलंदाजीला चांगले खेळत होते आणि आम्हाला त्यांना रोखणे कठीण जात होते. त्यामुळे आम्ही त्यांच्या इनिंगमधून शिकलो असे म्हणता येईल. आम्ही आमच्या योजनांमध्ये बदल केला आणि त्याचा फायदाच झाला.

“या मैदानाच्या सीमा मोठ्या आहेत. त्याने खूप वाईट पद्धतीने चेंडू मारला नाही. परंतु मोठ्या मैदानावर त्याचा वेग कमी झाला.”

या प्रोटीआज स्टारने ७ इनिंग्समध्ये १२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आपल्याला कोणत्या टप्प्यात गोलंदाजी करायला आवडते याबाबत उत्तर दिले.

कोत्झी म्हणाला, “मी मधल्या ओव्हर्समध्ये बऱ्याचदा गोलंदाजी केली आहे. मी तरूणपणी पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी केली होती.”

“त्यामुळे एक आधुनिक काळातील क्रिकेटपटू म्हणून तुम्हाला जी भूमिका दिली जाते त्याच्याशी जुळवून घेणे महत्त्वाचे असते.”

“मी पॉवर प्लेमध्ये फार गोलंदाजी केलेली नाही. परंतु मला त्याची मजा येते. मला मधल्या ओव्हर्स आवडतात. शिवाय मला डेथ ओव्हर्समध्ये तर फारच मजा येते. विकेट्स घ्यायला आवडणाऱ्या खेळाडूसाठी त्या याच टप्प्यात चांगल्या पडतात” तो शेवटी म्हणाला.

गेराल्ड कोत्झी हा मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल २०२४ मध्ये एक उत्तम गोलंदाज ठरला आहे. तो कर्णधार हार्दिक पांड्यासाठी आमच्या गोलंदाजी युनिटमधला एक महत्त्वाचा खेळाडू ठरू लागला आहे. जसप्रीत बुमरासोबतचे त्याचे नाते ड्रेसिंग रूम आणि पलटनच्या हृदयात जागा बनवू लागले आहे.

हा कराटे किड आपल्या मिशन आयपीएल २०२४ साठी एक महत्त्वाचा भाग ठरेल. त्याला आता जयपूरमधल्या सामन्यात मोठ्या मैदानात गोलंदाजी करताना मजा येईल. आता आपण सोमवार दिनांक २२ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरूद्ध खेळणार आहोत. पलटन, त्याचा हेडबँड तुमचा स्टाइल स्टेटमेंट झालाय की नाही अजूनपर्यंत?