News

“जिंकलो तरी टीम म्हणून आणि हरलो तरी टीम म्हणूनच”: नेहल वढेरा

By Mumbai Indians

पिंक सिटीचा आमचा प्रवास ठरल्याप्रमाणे झाला नाही. सोमवारी (२२ एप्रिल) रोजी राजस्थान रॉयल्सची कामगिरी आमच्यापेक्षा नऊ विकेट्सनी जास्त चांगली झाली. परंतु, तुम्हाला पलटनची मेंटॅलिटी माहीत आहेः आपण उभे राहतो, पुढे जातो आणि उत्साह आणि अभिमानाने मान ताठ ठेवतो. 

या सामन्यात २४ चेंडूंमध्ये ४९ धावांची महत्त्वाची कामगिरी केलेल्या नेहल वढेराने सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला.

“टी२०मध्ये वैयक्तिक स्कोअर्स माझ्यासाठी आणि इतर खेळाडूंसाठी फार महत्त्वाचे नसतात. निकाल एकच असला पाहिजे, तो म्हणजे मुंबई इंडियन्सचा विजय व्हायला हवा” नेहल म्हणाला.

“आता सध्या समोर असलेल्या सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास आता पात्र ठरण्यासाठी सर्वच सामने जिंकणे आवश्यक आहे. आम्ही यापूर्वीच्याही सीझन्समध्ये अशा परिस्थितीत होतो. आम्ही तिथून आमचा खेळ उंचावला आणि पात्र ठरलो. त्यामुळे आम्ही आत्तादेखील आशावादी आहोत. आम्ही सध्या सुरू असलेली प्रक्रिया पुढे कायम ठेवून संघासाठी सामने जिंकू,” तो म्हणाला.

लीग टप्प्याच्या दुसऱ्या सत्राची आमची सुरूवात थोडी अडखळत झाली आहे. परंतु टीम कोणत्याही परिस्थितीत सोबत राहील हे सर्वांत जास्त महत्त्वाचे आहे.

“आम्ही जिंकतो तेही टीम म्हणून आणि हरतो तेही टीम म्हणूनच,” तो म्हणाला.

“आम्हाला आमचा खेळ सुधारून कुठे चुका होत आहेत किंवा कुठे बरोबर चाललो आहे हे सर्व पाहावे लागेल जेणेकरून आम्ही परतू तेव्हा आमच्या चुकांवर मार्ग निघू शकेल.”

पलटन, आम्ही ड्रॉइंग बोर्डकडे परततोय, पुन्हा रिसेट करतोय आणि पुढचा सामना नव्याने सुरू करतोय. आम्ही उसळी मारून परतण्यासाठी ओळखले जातो आणि तुमच्या सातत्यपूर्ण सहकार्याने आम्ही हे शक्य करू.