News

“तिलकसोबत खास मैत्री, दिवसेंदिवस वाढते आहे": डेवाल्ड ब्रेविस

By Mumbai Indians

मुंबई इंडियन्स पुढे जात असताना राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम, हैदराबादमध्ये सीझनचा पहिला विजय मिळवण्यासाठी सज्ज आणि आतुर आहे. 

आपली मिशन २०२४ ची सुरूवात ठरवल्याप्रमाणे झालेली नाही. परंतु क्लास ऑफ २०२४ ने आपल्याला पुढील तीन महिन्यांसाठी उत्सुक राहण्याच्या दृष्टीने वचन आणि उत्साह दिला आहे. असाच एक स्टार परफॉर्मर होता डेवाल्ड ब्रेविस. त्याने गुजरात टायटन्सविरूद्ध इम्पॅक्ट प्लेयर म्हणून सकारात्मक भावना दिली.

तरूण प्रोटीआ स्टारने सामन्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. एमआयला आयपीएल मोहिमेतील पहिला सामना अगदी २०१३ पासून जिंकण्यात यश मिळालेले नाही. परंतु या तरूण फलंदाजाने आपल्या फटकेबाजीने सर्वांचे मन जिंकून घेतले आहे.

“मी खूप कृतज्ञ आहे. धावा करताना मजा येते. परंतु दुर्दैवाने आम्ही जिंकू शकलो नाही. टीम खूप छान काम करते आहे, आमच्यासमोर जे काही आहे त्याबद्दल मी खूप उत्सुक आहे," तो म्हणाला.

एमआयच्या इनिंग्सदरम्यान डीबी आपला बेस्ट फ्रेंड तिलक वर्मासोबत खेळला तेव्हा क्रिकेट चाहत्यांनाही मेजवानी मिळाली. एका उत्सुक पत्रकाराने त्यांच्या मैत्रीबद्दल विचारले. या २० वर्षीय तरूणाने अत्यंत आनंदाने मत व्यक्त केले.

“मैत्री दिवसेंदिवस अधिक गहिरी होत चालली आहे. आम्ही भेटलेल्या तारखेपासूनच ही एक खास मैत्री ठरली आहे. तो दक्षिण आफ्रिकेला येतो तेव्हा आम्ही एकत्र वेळ घालवतो आणि त्याला इथे भेटून, त्याच्यासोबत इथे वेळ घालवताना खूप आनंद वाटतोय.” ब्रेविस म्हणाला.

हैदराबादमध्ये असल्यामुळे एमआयच्या पोरांचे टीव्हीने अत्यंत प्रेमाने स्वागतदेखील केले.

“तिलकने सर्वांना जेवायला बोलावले. आम्हाला खूप मज्जा आली. आम्ही इथे त्याच्या घरी आहोत. त्यामुळे त्याने आमचे स्वागत केले. ही खूप सुंदर गोष्ट आहे. तो सर्वांवर प्रेम करणारा आणि काळजी घेणारा एक चांगला माणूस आहे.”

अत्यंत महान क्रिकेट टीम्सना विजयासाठी फेव्हरिट होण्याचा मान मिळाला परंतु प्रत्यक्षात पराभव पत्करावा लागला. एमआयने गुजरात टायटन्सविरूद्ध धावांचा पाठलाग करताना खूप काही शिकले आहे. त्यामुळे आता एसआरएचविरूद्ध हेच धडे वापरताना खूप मजा येईल. एखाद्या टीमला पुन्हा उसळी मारून वर येणे किती आव्हानात्मक ठरू शकते? ब्रेविसने अत्यंत सरळपणे उत्तर दिले.

“क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत असतात आणि त्या नियंत्रणात नसतात. आम्ही चांगल्या स्थितीत होतो. सामना जिंकूही शकलो असतो. परंतु पुढे काय घडणार आहे हे आम्हाला माहीत नव्हते. त्यामुळे आम्ही फक्त सकारात्मक राहू शकतो. माझा या टीमवर प्रचंड विश्वास आहे. पुढे जे काही घडेल त्याबद्दल मी उत्सुक आहे.”

डेवाल्ड ब्रेविसची सातत्याने महान दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटू एबी डे विलियर्ससोबत तुलना केली जाते. परंतु, डीबीने त्याबद्दल फार चर्चा न करता क्रिकेटवरच चर्चा करायचे ठरवले.

“एबी डे विलियर्स अजूनही माझा आदर्श आहे आणि राहील. मी त्याच्याकडून खूप काही शिकलो आहे. आमची मैत्रीसुद्धा खूप खास आहे. परंतु पुढे जे काही आहे त्याबद्दल इतरांची नक्कल न करता मला स्वतःलाच साध्य करायचे आहे. मला स्वतःबद्दल खरेपणा ठेवून डेवाल्ड ब्रेविसने जे काही विक्रम मोडीत काढायला हवे आहेत ते मोडीत काढायचे आहेत.”