
स्कायच्या भारताचा ऑसीजवर 4-1 ने दणदणीत विजय- एमआयच्या पोरांना फॉलो करा
विश्वचषकाचं दुःख विसरायलाच हवं आता आणि पुढे जाण्यासाठी सर्वोत्तम आणि वेगवान पद्धत म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांची टी२० मालिका. आपले मुंबई इंडियन्सचे तीन स्टार- ईशान किशन, तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव हे आपल्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य परत आणण्यासाठी मैदानात उतरले आहेत. आपला दादा सूर्या या वेळी कर्णधार आहे, आपला पॉकेट डायनॅमो ईशान त्याच्या दणदणीत खेळासाठी सज्ज आहे आणि तिलक हा उगवता तारा मधल्या फळीत आपली जागा बनवण्यासाठी तयार आहे.
या ब्लॉगमध्ये आपल्याला एमआयच्या खेळाडूंचा इंडियन ब्लू जर्सीमधला प्रत्येक खेळ पाहता येईल..
पाचवा टी20आय| बंगळुरू [भारताचा 6 धावांनी विजय]
सूर्यकुमार यादव: हातात बॅट नसेल तर काय झालं, डोक्यावर कॅप्टनची कॅप आहे ना! आपला दादा सूर्याच्या चपखल व्यवस्थापन कौशल्यामुळे भारताला पुन्हा एकदा ऑसीजना हरवता आलंय. सामना हातातून सुटत असतानाही आपल्या डोक्यावर बर्फ ठेवून काम करणाऱ्या स्कायमुळे आपल्याला 160 धावांचा बचाव करता आला आणि अटीतटीच्या खेळानंतर सामना आपल्या हातात आला.
चौथा टी२०आय | रायपूर [भारताचा २० धावांनी विजय]
सूर्यकुमार यादव: ऑसी गोलंदाजांनी स्कायच्या बॅटमधून निघणाऱ्या आतषबाजीला आळा घातला. पण आपला दादा सूर्या त्यांचाही वस्ताद निघाला. त्याने धोरणीपणा अंगीकारून अक्झर पटेल (३/१६) चा उत्तम वापर केला आणि रिंकू सिंगची उत्तम सुरूवात (२९ चेंडूंमध्ये ४६ धावा) यांच्यामुळे एक सामना अजून शिल्लक असताना कर्णधार म्हणून त्याच्या नावावर पहिलीच मालिका झाली आहे.
तिसरा टी२०आय - गुवाहाटी (ऑस्ट्रेलियाचा पाच विकेट्सनी विजय)
सूर्यकुमार यादर: पाच ओव्हर्स, दोन षटकार आणि २९ चेंडूंमध्ये ३९ धावा. एकामागून एक दोन विकेट्स गेल्यानंतर संघ काळजीत पडलेला असताना स्काय आपल्या नेहमीच्या आक्रमक आणि सातत्यपूर्ण रूपात खेळत होता. परंतु, त्याने आपल्या संघाचे नेतृत्व करण्याचा आटोकाट प्रयत्न केल्यानंतरदेखील गोलंदाजांना ग्लेन मॅक्सवेलचा हल्ला रोखता आला नाही.
तिलक वर्मा: एकीकडे ऋतुराज गायकवाडने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्ला चढवलेला असताना वर्माने अगदी आनंदाने इनिंग संपवताना दणादण धावा केल्या. त्याच्या २४ चेंडूंमध्ये ३१ धावांमुळे भारताला आपल्या २० ओव्हर्समध्ये २२२ धावा उभारता आल्या.
ईशान किशनः आपल्या पॉकेट डायनॅमोचा दिवस बॅट आणि विकेट कीपर म्हणून देखील आज काही खास नव्हता. त्याला आज चांगली फलंदाजी करता आली नाही. त्याने एक चुकीचा कट मारला आणि तो कव्हर्सवर शून्यावर बाद झाला.
******
दुसरा टी२०आय | तिरूवनंतपुरम (भारताचा ४४ धावांनी विजय)
ईशान किशन: ईशानची टिपिकल धुंवाधार खेली. एक मोजून मापून सुरूवात आणि मग स्फोटक स्टाइल. तीन चौकार, चार षटकार, एक अर्धशतक आणि यशस्वी जैस्वालच्या पहिल्या आतषबाजीनंतर धुरा सांभाळून संघाला मजबूत स्थितीत नेले.
सूर्यकुमार यादव: तो चार ओव्हर्स शिल्लक असताना उतरला. त्याने आपल्या १० चेंडूंमध्ये १९ धावांदरम्यान दोन षटकार ठोकले आणि मग आपल्या संघाचे नेतृत्व करून १०० टक्के विजयाचे रेकॉर्ड कायम ठेवले.
तिलक वर्मा: छोटी, सुंदर मजबूत इनिंग. त्याला फक्त दोनच चेंडू खेळायला मिळाले आणि त्याचे त्याने सोने केले. त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला आणि मग दुसऱ्या चेंडूवर एक धाव काढून जबाबदारी रिंकू सिंगवर दिली कारण दुसऱ्या बाजूला रिंकू जोरदार फटकेबाजी करत होता.
********
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी२०आय | विजग [भारताचा २ विकेट्सनी विजय]
सूर्यकुमार यादव (४२ चेंडूंमध्ये ८० धावा): विश्वचषक अंतिम सामन्यातली निराशा मागे टाकायला हा चांगला मार्ग आहे. स्कायने नेमके हेच केले आहे. तो बॉस असलेल्या स्वरूपात परतलाय आणि टीमसोबत अत्यंत कठीण परिस्थितीत पुढे गेला. दणदणीत २०९ धावांचा पाठलाग करण्यासाठी तो २२/२ वर संघ असताना मैदानात उतरला. परंतु स्कायला वेळ लागत नाही. त्याने तात्काळ भाता उघडला आणि सपासप धावा करायला सुरूवात केली. त्याने नऊ चौकार आणि चार षटकारांसोबत भारताला विजयाच्या दारात नेऊन ठेवले. संपूर्ण देशाला आनंद झाला नसेल तरच नवल!
ईशान किशन (३९ चेंडूंमध्ये ५८ धावा): तिसऱ्या क्रमांकावर खेळत असताना त्याने सूर्यादादाच्या दणक्याला चांगलीच साथ दिली. त्याने तन्वीर संघाच्या लेग ब्रेक्सचा सामना केला आणि सामन्याला आवश्यक असलेला वेगदेखील दिला. हा एक स्मार्ट खेळ होता. त्याने सुरूवातीला पुरेसा वेळ घेतला, आपली नजर स्थिर केली आणि सुरूवातीला दोन धक्के बसल्यानंतर संघाची नौका सावरली आणि मग दणादण खेळायला सुरूवात केली.
तिलक वर्मा (१० चेंडूंमध्ये १२ धावा): ईशान बाद झाल्यानंतर तो खेळायला उतरला. त्यानंतर त्याने एक दोन शॉट्स असेच फटकावले. मग संघाच्या चेंडूंवर त्याने एकामागून एक चौकार लगावले आणि मग एक चेंडू त्याच्या बॅटच्या बाहेरच्या कडेला लागला आणि भारताचा रन रेट वाढवल्यानंतर तो बाद झाला.