News

धावांचा बादशहा, फायनल्सचा राजा: जॅक्सीची धमाकेदार कामगिरी

By Mumbai Indians

अगदी स्टाइलमध्ये कामगिरी करायची असते तेव्हा विल जॅक्सकडे पाहावे!

…या वेळी त्याने पुन्हा एकदा करून दाखवले आहे! आपल्या या तडाखेबाज फलंदाजाने इंग्लंडमध्ये आपल्या टीमला सलग तिसरा विजय मिळवून दिला. या विजयात त्याची कामगिरी खूप मोलाची ठरली. ⚡

या मोहिमेत झालेल्या नऊ सामन्यांपैकी जॅक्सने ३०.५५ च्या सरासरीने २७५ धावा कुटल्या आणि पहिल्या फळीत आपण दणकट आणि सर्वोत्तम खेळाडू आहोत हे सिद्ध केले.

संघाला स्थिर ठेवण्याची गरज असो वा संपूर्ण वर्चस्व गाजवायचे असो. गरज असते तेव्हा तो खंबीर असतो. त्याचे चाहते त्याचा उत्साह वाढवण्यात कुठेही कमी पडत नाहीत. जॅक्सला आपल्या फुल फॉर्ममध्ये खेळताना पाहणे सर्वांनाच आवडते, नाही का?

आता त्या अंतिम सामन्याची आठवण. त्याने या सामन्यात ४१ चेंडूत ७२ धावांची धमाकेदार खेळी केली. नुसती लुटालूट. चौकारांचा पाऊस, गोलंदाजांना धापा टाकण्यास भाग पाडणे, गर्दीचा प्रचंड जल्लोष. त्याच्या खेळाने रंगत तर आणलीच पण त्याचबरोबर २६ धावांनी विजयही मिळवून दिला. निस्ता राडा!

जॅक्सी तुझं अभिनंदन! 🥳 आगामी वर्षांमध्ये तुला आणखी यश मिळो अशा शुभेच्छा.