News

सामन्याचे पूर्वावलोकनः GT vs MI- आमच्या दुसऱ्या विजयासाठी प्रयत्न

By Mumbai Indians

काही दिवस मध्ये गेले असले तरी टाटा आयपीएल २०२२ च्या १० व्या सामन्यात आम्ही गुजरात टायटन्सचा सामना ६ मे रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर करणार असल्यामुळे आमचा हा नवीन मॅच डे आहे.

आम्ही आरआरविरूद्धच्या आमच्या मागील सामन्यात पहिला विजय मिळवला आहे. आमच्या टीमचा आत्मविश्वास प्रचंड वाढला असून आम्ही याच विजयाच्या आशेत मैदानावर जाण्यासाठी उत्सुक आहोत.

जीटी हा एक नवीन संघ आहे. त्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत खेळण्याचा पूर्वीचा अनुभव नाही. त्यांचा कर्णधार हार्दिक पंड्या हा आमच्यासाठीचा एक ओळखीचा चेहरा असेल.

या सलग दुसऱ्या विजयामुळे आमचा थिंक टॅंक ज्या वेगावर लक्ष केंद्रित करत आहे तो वेगही आम्हाला मिळू शकेल.

या खेळाडूंवर लक्ष ठेवा

जीटीचा कर्णधार हार्दिक पंड्या सध्या फॉर्ममध्ये आहे. त्याने खेळलेल्या नऊ सामन्यात त्याने ३०९ धावा काढल्या  आहेत आणि तो त्यांचा सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू आहे.

लेग स्पिनर राशीद खानने आपल्या गोलंदाजीत कमी धावा दिल्या आहेत तर जलदगती गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने सातत्याने १५० किमीच्या वेगाने गोलंदाजी केली आहे.

आमच्यासाठी आमचे तरूण खेळाडू तिलक वर्मा आणि हृतिक शौकीन हे चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. तिलकने मधल्या ओव्हर्समध्ये महत्त्वाच्या धावा काढल्या आहेत तर हृतिकने मागील सामन्यात म्हणजे टाटा आयपीएलच्या त्याच्या पहिल्या सामन्यात खूप कमी धावा देऊन जोस बटलरची पहिली विकेट घेतली आहे.

सूर्याने आरआरविरूद्धच्या विजयी सामन्यात आपले तिसरे अर्धशतक झळकवले आहे. तो आमच्या मधल्या ओव्हर्समधील वेगासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे.

बूम जोरदार गोलंदाजी करतोय आणि टिम डेव्हिडने मागील सामन्यात आम्हाला विजयी सीमापार नेऊन पोहोचवले. कुमार कार्तिकेयने आपल्या पहिल्याच सामन्यात आरआरच्या फलंदाजांवर आपले जाळे टाकले होते.

आगामी टप्पे

बिग मॅन टिम डेव्हिड आपल्या टी२०च्या धावा पूर्ण करण्यापासून फक्त २ धावा दूर आहे.

जलदगती गोलंदाज डॅन सॅम्सला टी२०मध्ये १०० विकेट्स पूर्ण करण्यासाठी फक्त सहा विकेट्स हव्यात.

जीटीविरूद्ध हा मोठा सामना आहे आणि आम्हाला खात्री आहे की हा सामना रोमहर्षक होईल. चला तर चिअर अप करूया!