News

#ENGvIND बेस्टम बेस्ट क्षण–एखादी मालिका चाहत्यांसाठी (आणि खेळाडूंसाठी) इतकी महत्त्वाची ठरू शकते का? होय!

By Mumbai Indians

यार, एकच प्रश्न पडलाय. मालिका इतक्या लगेच का संपली?!! 😫

भारताचा इंग्लंड दौरा २०२५ फक्त मालिकेसाठीच नव्हता. त्यात धमाल, फेस ऑफ्स, स्टंप माइकमधल्या गप्पा, स्मितहास्य, हिरोगिरी आणि मध्ये वेळ मिळाला तर क्रिकेट असे सगळे होते. 😉

अलीकडच्या क्रिकेटच्या इतिहासात सर्वांत महान मालिकेपैकी एक ठरलेली ही मालिका का ठरली याची १० कारणे पाहूया…

पंतचा हाच तो क्षण, हीच ती वेळ

हेडिंग्लेमध्ये झालेल्या सामन्यात सात शतके नोंदवली गेली. फलंदाजांनी या इंग्लिश उन्हाळ्याचा पुरेपूर आनंद घेतला.

पण, एक फलंदाज ज्याने खऱ्या स्वरूपात उत्तम कामगिरी केली तो होता ऋषभ पंत. त्याने द्विशतके फटकावून ही कामगिरी करणारा पहिला भारतीय असा किताब जिंकला.

**********

बूमचे आगमन...

लीड्सवर गोलंदाजांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. परंतु जस्सी आला आणि त्याने एका भारतीयाने केलेल्या परदेशातील कसोटी सामन्यांमधील सर्वाधिक पाच विकेट्सची कामगिरी most five-fers in overseas Tests by an Indian करताना कपिल देव यांच्या विक्रमाची बरोबरी केली. त्याने हे अनेकदा केले आणि त्यामुळे तो खऱ्या अर्थाने वेगळा ठरला. 🤙

**********

गिलोरियस मॅरेथॉन फलंदाजी

आपल्या कसोटीमधील कर्णधारपदाची धुरा सांभाळताना शुभमनने २६९ आणि १६१ धावा नोंदवून स्वतःला एका वेगळ्याच रूपात सादर केले. त्याने आपल्या संघाला कसोटीत एज्डबास्टनवर पहिलाच विजय मिळवून द्यायला मदत केली.

**********

सिराज, आकाशदीपची लूट

आपले जलदगती गोलंदाज मो. सिराज आणि आकाश दीप यांनी संपूर्ण प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजीला चुरडून टाकले. त्यांनी २० पैकी १७ विकेट्स घेतल्या. शाब्बास रे लेकरांनो! 👏

**********

बूमचे बुम(पुन)रागमन

लॉर्ड्सची कसोटी- अत्यंत ख्यातनाम ठिकाणी तेवढीच ख्यातनाम मॅच.

…आणि बुमराह ही संधी कशी सोडून देईल? आधीचा सामना चुकल्यानंतर त्याने क्रिकेटच्या पंढरीत आपल्या पहिल्या पाच विकेट्सची कामगिरी केली. त्याने आपले नाव लॉर्ड्सच्या ऑनरबोर्डवर कोरले! 😎

**********

मसाला सिनेमाचा खरा अर्थ

कधीकधी क्षण आठवण्यासाठी एक फोटोच पुरेसा असतो …

**********

मियाँभाईची कमाल

लॉर्ड्सवर शोएब बशीरच्या गोलंदाजीवर सिराज दुर्दैवीरित्या बाद नसता झाला तर आपल्याला विजयाची संधी नक्कीच होती. आपण दुःखात बुडालो, काळ थांबला आणि आपल्या डोळ्यांसमोर ते एक ट्विट चमकले.

पण, पण सिनेमा अजून संपलेला नाही दोस्तांनो!

**********

पॅन्टास्टिक हिरोगिरी

ओल्ड ट्रॅफोर्डवर सगळे छान चालले होते. पण ख्रिस वोकर्सचा तो धमाकेदार चेंडू ऋषभ पंतच्या घोट्यावर आदळला आणि आपल्या सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यानंतर त्याला तात्काळ मैदानाबाहेर नेण्यात आले.

परंतु २०२२ च्या अपघातानंतर क्रिकेटमध्ये पुन्हा येणाऱ्या या ऋषभ पंतला भीती नव्हती. 🙌 आपल्या टीमला त्याची गरज होती तेव्हा त्याने जराही विचार केला नाही आणि मधल्या फळीत पुन्हा लंगडत आला. त्याने ५४ धावा फटकावल्या.

**********

जड्डू वशीची कामगिरी

या दोघांनी मैदानात होऊ दे खर्च म्हटलं आणि पाच सत्रे सलग फलंदाजी केली. मँचेस्टरमध्ये या दोघांनी सामना वाचवला.

 

पाचव्या दिवशी शेवटी सामना अनिर्णित राहण्यासाठी ते हात मिळवायला तयार नव्हते. बेन स्टोक्स आणि कंपनीने त्यांना चांगलेच हलवायचा प्रयत्न केला. पंतच्या कामगिरीसमोर त्यांच्या १०७*, १०१* धावा झाकोळल्या गेल्या असतील. परंतु या हिरोंच्या मालिका जिवंत ठेवण्यातील प्रयत्नांना आपण विसरू शकत नाही.

**********

कडक क्लायमॅक्स, डीएसपी सिराजच्या नावाने

ही पाच एपिसोड्सची मालिका आणखी चांगल्या प्रकारे संपू शकली नसती. खरंच 🤌

नाइट वॉचमन आकाश दीप उत्तम ६६ धावा फटकावेल याची कल्पना आपण केली होती का? नाही. आपण इंग्लंडचा संघ १/९२ वरून २४७ वर ऑल आऊट होईल असं मनात आणलं होतं का? हो. ब्रूक- रूटच्या फटकेबाजीनंतर विजयाची शक्यता होती हा? कदाचित.

परिस्थिती गंभीर होती तेव्हा सिराजदादा खंबीर होता. 🎥 हॅरी ब्रूक १९ वर फलंदाजी करत असताना त्याला आऊट करण्यात अपयश आल्यानंतर त्याने परफेक्ट कामगिरी केली. प्रसिद्ध कृष्णाने त्याला साथ दिली.

म्हणतात ना... हार के जीतनेवाले को बाजीगर कहते हैं

**********

प्री प्रॉडक्शन, प्रॉडक्शन, पोस्ट प्रॉडक्शन हे सर्व या अप्रतिम मालिकेतल्या या संघाने पार पाडले. सगळे अगदी अचूक होते आणि चाहत्यांना खूपच मजा आली. 🥳 या ब्लॉकबस्टरला ५/५ स्टार्स देणारच.

पलटन, तुमचा आवडता क्षण कोणता होता? खाली कमेंट करून आम्हाला कळवा! ✍️⏬