News

MI vs CSK: मुंबईसमोर असेल चेन्नईचे आव्हान

By Mumbai Indians

टाटा आयपीएल 2022 मध्ये रोहित शर्माच्या कॅप्टनशिपखालील मुंबई इंडियन्सचा सामना २१ एप्रिलला डी वाय पाटील स्टेडियम, नवी मुंबईमध्ये रवींद्र जाडेजाच्या कॅप्टनशिपखालील चेन्नई सुपर किंग्ससोबत होईल. सध्याच्या टूर्नामेंटमध्ये या दोन्ही टीम्स संघर्ष करताना दिसत आहेत. म्हणून हा सामना या दोन्ही टीम्ससाठी खूप महत्त्वाचा ठरेल.

एमआयची टीम अंकतालिकेत सध्या १० व्या क्रमांकावर आहे तर सीएसके ९ व्या क्रमांकावर आहे. मुंबईच्या टीमला सध्या पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे आणि ही टीम चेन्नईविरूद्ध विजय नोंदवून आपलं खातं उघडेल अशी आशा आहे. सीएसकेच्या नावावर सहापैकी २ सामने आहेत.

सामन्याची माहिती

सामना: एमआय विरूद्ध सीएसके, ३३ वा सामना, इंडियन प्रीमियर लीग २०२२
दिनांक: गुरुवार, २१ एप्रिल २०२२
वेळ: संध्याकाळी ७.३० वाजता. भारतीय वेळेनुसार.
स्थान: डॉ डी वाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमी, मुंबई

आमने-सामने

टाटा आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सच्या टीम्स ३२ वेळा समोरासमोर आल्या आहेत. त्यातल्या १९ वेळा मुंबईने विजय मिळवला आहे तर १३ वेळा चेन्नईच्या टीमने विजय प्राप्त केला आहे. चेन्नईविरूद्ध मुंबईचा सर्वोच्च स्कोअर २१९ धावा आहे तर सर्वांत कमी स्कोअर १३६ आहे. मुंबईविरूद्ध चेन्नईचा सर्वाधिक स्कोअर २१८ आहे तर सर्वांत कमी स्कोअर ७९ आहे.

एमआय आणि सीएसकेच्या टाटा आयपीएलच्या शेवटच्या पाच सामन्यांबद्दल बोलायचे तर एमआयएने तीन वेळा आणि सीएसकेने दोन वेळा विजय मिळवला आहे.

या खेळाडूंवर सर्वांचे लक्ष असेल

मुंबई इंडियन्सचा फॉर्ममध्ये असलेला फलंदाज सूर्यकुमार यादव याने आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध टाटा आयपीएलमध्ये १३ सामन्यांमध्ये ११४.६९ च्या स्ट्राइक रेटने २८१ धावा काढल्या आहेत. या दरम्यान त्याने ३३ चौकार आणि ३ षटकार फटकावले आहेत. त्याचवेळी एमआयचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराने सीएसकेविरूद्ध १२ सामने खेळले असून ११ विकेट्स काढल्या आहेत.

मुंबईविरूद्ध चेन्नईचा सलामीचा फलंदाज रॉबिन उथप्पाने आतापर्यंत २५ सामने खेळले आहेत. त्यात त्याने १२४.९४ च्या स्ट्राइक रेटने ५६१ धावा काढल्या आहेत. या सामन्यात एमआयच्या गोलंदाजांच्या निशाण्यावर उथप्पा असेल.

सीएसकेचा कर्णधार रवींद्र जाडेजाने आयपीएलमध्ये एमआयविरूद्ध १६ विकेट्स काढल्यात. त्यामुळे टीमच्या उजव्या हाताच्या फलंदाजांना त्याच्यापासून सावध राहावे लागेल.

सामन्यात हे रेकॉर्ड्स होऊ शकतात.

मुंबईचा सलामी फलंदाज ईशान किशन आयपीएलमध्ये १५० चौकार काढणाऱ्या गोलंदाजांच्या लिस्टमध्ये येण्यासाठी फक्त ७ चौकार दूर आहे.

चेन्नईचा रॉबिन उथप्पा ८१ धावा काढल्यावर टाटा आयपीएमध्ये ५००० धावा पूर्ण करणारा फलंदाज होील आणि तो हे करणारा आयपीएलचा सहावा खेळाडू असेल.

या मोठ्या सामन्यात अनेक रेकॉर्ड्स बनतील आणि तुटतीलही. आम्ही हा सामना जिंकून स्पर्धेतील आमचे स्थान मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहोत.

आम्ही तुमच्या प्रोत्साहनासाठी उत्सुक आहोत,पलटन.