News

‘एमआय केपटाऊन’ कडून क्रिकेट साऊथ आफ्रिका टी२० लीगसाठी संघातील खेळाडूंच्या पहिल्या संचाची घोषणा

By Mumbai Indians

एमआय केपटाऊनने आज क्रिकेट साऊथ आफ्रिकेच्या टी२० लीग प्रथमावृत्तीच्या निमित्ताने ५ खेळाडूंना साइन केल्याची घोषणा केली आहे. हे खेळाडू वन फॅमिली टीमचा भाग होतील आणि एमआय फ्रँचाइझी ज्या रंगांसाठी ओळखली जाते त्या प्रतिष्ठित निळ्या आणि सोनेरी रंगांमध्ये रंगतील. एमआय केपटाऊनच्या पहिल्या आवृत्तीमध्ये ३ परदेशी खेळाडू, १ दक्षिण आफ्रिकेचा अधिकृत खेळाडू तर १ दक्षिण आफ्रिकेचा अद्याप अधिकृत न झालेला खेळाडू यांचा समावेश आहे.

रिलायन्स जिओचे अध्यक्ष श्री. आकाश अंबानी म्हणाले की, “आम्ही एमआय केपटाऊन”साठी संघ बांधण्यास सुरूवात केली आहे आणि त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. आम्ही खेळाडूंना थेट साइन करून एमआयच्या मजबूत केंद्रस्थान राखण्याच्या तत्वांनुसार काम करण्यास सुरूवात केली आहे. मी राशीद, कागिसो, लियाम, सॅम यांचे #वनफॅमिलीमध्ये स्वागत करतो आणि डेवाल्ड आमच्यासोबत या नवीन प्रवासातही असेल याबद्दल आनंद व्यक्त करतो. आम्हाला खात्री आहे की एमआय केपटाऊन इतर दोन टीमप्रमाणेच क्रिकेट एमआयचे निडर खेळ खेळण्याचे तत्व पुढे नेईल आणि दक्षिण आफ्रिकेतील तसेच संपूर्ण जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये आमचा गौरव वाढवेल."

निवड करण्यात आलेले खेळाडू मागील अनेक वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करणारे आहेत आणि डेवाल्ड ब्रेविसने मुंबई इंडियन्ससोबत २०२२ मध्ये सुंदर कामगिरी केली आहे. टी२० लीगचे प्रशासन करणाऱ्या नियमांनुसार लिलावापूर्वी या खेळाडूंना साइन करण्यात आले आहे.

अनु क्र.

खेळाडूचे नाव

राष्ट्रीयत्व

1

कासिगो रबाडा

दक्षिण आफ्रिका

2

डेवाल्ड ब्रेविस (अनकॅप्ड)

दक्षिण आफ्रिका

3

राशिद खान

अफगाणिस्तान

4

सॅम कॅरन

इंग्लंड

5

लियाम लिव्हिंग्स्टन

इंग्लंड

या आठवड्याच्या सुरूवातीला एमआयने केपटाऊनच्या चाहत्यांना अर्पण केलेली टीम म्हणून ‘एमआय केपटाऊन’ किंवा फोनेटिक स्वरूपात “माय केपटाऊन” या नावाची आणि ब्रँडची घोषणा केली होती.