“एमआयने मला पाठबळ दिले, माझ्यावर विश्वास दाखवला”: रघू शर्मा
मुंबई इंडियन्सचे टॅलेंट्स मोठमोठ्या स्टोरीज लिहित आहेत. हीच गोष्ट ४ मे २०२६ रोजी वानखेडेवर घडली. तिथे आपल्या लाडक्या रघू शर्माने मनापासून स्पिनचा वापर करून एक नवीन यशोगाथा लिहिली. त्याने आयपीएलमधली आपली पहिली विकेट घेतली. ही घटना अनेक वर्षे चाहत्यांच्या मनात रूजलेली असेल.
चार ओव्हर्स, ३६ धावा, एक विकेट. ही फक्त एक विकेट नव्हती. तर या एका विकेटने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आणि रघूच्या खेळाची नोंद घ्यायला भाग पाडले. त्याने आपल्या आगमनाची घोषणा अशी दणदणीत केली. फलंदाज फटकेबाजी करत असताना आपल्या या लाडक्या रघूने स्वतःला सावरले आणि अक्षत रघुवंशीची महत्त्वाची विकेट नावावर केली. त्याचा शॉट फारसा चालला नाही आणि पापणी लवायच्या आत रघूने त्याचा कॅच पकडला. या विकेटचा जोरदार जल्लोष झाला नसेल तरच नवल. 🫶😁
सामन्यानंतर आयपीएलटी२० सोबत बोलताना रघूने आपला पूर्ण प्रवास सांगितला आणि मुंबई इंडियन्सचे त्यांचा सातत्यपूर्ण पाठिंबा आणि विश्वासाबाबत आभार मानले. आपली पहिली आयपीएल क्रिकेट हे त्याच्यासाठी सत्यात उतरलेले स्वप्न होते.
सर्वप्रथम त्याने पहिली विकेट घेतल्यानंतर संपूर्ण स्टेडियमला दाखवलेल्या पांढऱ्या चिठ्ठीबाबत चर्चा झाली. तो म्हणाला, “माझ्या मनात होते की आज मला विकेट मिळाली तर मी ती नक्की दाखवेन. मुंबई इंडियन्सचे खूप आभार कारण मागची १५ वर्षे माझ्यासाठी खूप त्रासदायक होती. मी क्रिकेट खेळायला कशा रितीने सुरूवात केली आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या. आज देवाच्या दयेने मी इथे पोहोचलो आहे. एमआयने मला पाठबळ दिले आणि माझ्यावर विश्वास ठेवला. त्यांनी मला त्यांच्याकडे ठेवून घेतले. आता, मी त्यांना हा विश्वास देऊ इच्छितो की मीही त्यांच्यासाठी उत्तम कामगिरी करेन.”
Patience is the quiet engine behind every success🫡#MIvLSG pic.twitter.com/KavxudTkXR
— Mumbai Indians (@mipaltan) May 5, 2026
रघूने आपण २०११ मध्ये कसे होतो त्याबाबत चर्चा केली. “आमच्या घरात सर्व इंजिनिअर्स आणि डॉक्टर्स आहेत. मीही एक इलेक्ट्रिकल इंजिनीअर आहे. तेव्हा मी फिट नव्हतो. माझे वजन १०२ किलो होते. पण मी मेहनत केली. तेव्हा मी धोनी सरांना तो शेवटचा षट्कार ठोकताना पाहिले. त्याने मला प्रोत्साहन मिळाले की मीही हे करू शकतो. पण माझे वडील म्हणाले की, क्रिकेट तुझ्यासाठी नाहीये कारण तुला खूप मेहनत करावी लागेल. मी वयाच्या २१ व्या वर्षी सुरूवात केली. परंतु तोपर्यंत मी वयोगटातील क्रिकेटचा टप्पा पार केला होता. तरीही मी ठरवले होते आणि माझ्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित केले. मला आज ना उद्या नक्कीच काही साध्य करता येईल असा विश्वास होता.”
रघू म्हणाला, “मी हळूहळू चिकाटीने आणि स्थिर राहून खेळत राहिलो आणि संपूर्ण अनुभव घेतला. मी श्रीलंका आणि इंग्लिश काऊंटीदेखील खेळलो आहे. वय फक्त एक आकडा नाही तर तुम्हाला आयपीएलसारख्या ठिकाणी खेळायचे असेल तर प्रचंड मेहनत करावी लागेल आणि मनाने सशक्त राहावे लागेल कारण इथे कौशल्यापेक्षा मॅच्युरिटीला जास्त महत्त्व आहे. मॅच्युरिटीने एक चांगला गोलंदाज तयार होतो, विशेषतः या प्लॅटफॉर्मवर.” 💙
त्याने आपल्या देवावरच्या अतूट विश्वासाबाबत आणि सातत्यपूर्ण सरावाने त्याला या प्रवासात कशी मदत झाली हे सांगितले,“भगवान जगन्नाथांनी मला खूप पाठबळ दिले. मी पुरीला गेलो. तिथे किनाऱ्यावर सराव केला आणि महाप्रसाद घेतला. त्या वेळी मला माहीत होते की, देव असेल तर माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट शक्य आहे. सुमारे १५ वर्षांसाठी मी आठवड्याचे सहाही दिवस लेग स्पिनचा सराव करत होतो. आता मी सुमारे १० ओव्हर्समध्ये गोलंदाजी करू शकतो. तुम्हाला सतत गोलंदाजी करत राहावी लागते, तेव्हा कुठे तुमचे मनगट फिरू लागते. प्रत्येक सामन्यापूर्वी माझ्या डोक्यात एक योजना असतेच. मी विशिष्ट टप्प्यांमध्ये गोलंदाजी करेन असा विचार करतो. या सगळ्या गोष्टींनी मला मागच्या १५ वर्षांत फायदा झाला आहे आणि त्याचे निकाल तुम्हाला दिसलेच आहेत.”