वानखेडेवर हिटमॅन स्पेशल- वेग, जादू आणि शक्तीचा मिलाफ
आपल्या वानखेडेवर मेन इन ब्लू अँड गोल्ड आणि अर्थात पलटनचा सुपरहिरो रोहित शर्माने ४ मे २०२६ रोजी काय जबरदस्त “चुम्मा” कामगिरी केली! ढगात लायटिंग, डोळ्यांसमोर तारे आणणे वगैरे शब्दरचना त्या दिवशी चपखल लागू पडल्या. आपल्या टीममध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकताना त्याने फलंदाजीचा मास्टरक्लासच दिला. 💙
मुंबई इंडियन्सला त्याच ठिणगीची गरज होती आणि अचानक आपला सलामी फलंदाज रोच्या रूपाने वणवाच पेटला. तो दुखापतीतून बरा होऊन आला आणि फक्त ४४ चेंडूंमध्ये त्याने ८४ धावा फटकावल्या. त्याने या दरम्यान सहा चौकार आणि सात षट्कार ठोकले. मैदानात उत्साहाची लहर पसरली आणि पलटननेही जबरदस्त प्रतिसाद दिला. त्याची बॉडी लँग्वेज, धमाल, त्याला दिलेली सलामी, टाळ्यांचा कडकडाट. एका क्षणात सामन्याचा नूरच पालटला. हिटमॅनने ही टीम काय करू शकते याची जाणीव सर्वांना करून दिली. तो फक्त अचूक वेळेत चेंडू टोलवत नव्हता तर तो पलटनला आनंदाची मेजवानी देत होता. 🤌🫶
Rohit's return got Wankhede 𝘽𝙐𝙕𝙕𝙄𝙉𝙂! 💙 pic.twitter.com/8lIox5JyGL
— Mumbai Indians (@mipaltan) May 4, 2026
तो मैदानात आला आणि खेळू लागला तेव्हा त्याच्या फलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाला चोख उत्तर दिले. त्याने सुरूवातीला एकेक धाव काढली मग पटापट दोन धावा आणि त्यानंतर त्याच्या उत्साहाची लागण त्याचा जोडीदार रायन रिकल्टनलाही झाली. त्या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १४३ धावांची भागीदारी केली. मोठ्या स्पर्धेत विजयांसोबत आपण आनंदी क्षणांच्या आणि पारडे पलटण्याच्याही प्रतीक्षेत असतो. एमआयला रोहितने हे घडवून दिले.
रोहितने इनिंग फक्त स्थिरच केली नाही तर तिचा वेग वाढवला आणि दुसऱ्या मग तिसऱ्या गियरमध्ये तिला नेले. तो मधल्या टप्प्यात स्थिरावतो तेव्हा सामना त्याच्याभोवती फिरतो याची पुन्हा एकदा आठवण करून दिली. ही फक्त एक सुंदर फलंदाजी नव्हती तर एमआय पुन्हा एकदा रो फॅक्टरसोबत विजयी मार्गावर आली आहे याचा संदेश होता. त्याने आपल्या सर्वांना बिलिव्ह करायला भाग पाडले... हिटमॅन सुरू होतो तेव्हा कुठेच थांबत नाही. 👑💙