News

कर्णधार बुमराचे पुनरागमन!! आपल्या राष्ट्रीय संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या एमआयच्या खेळाडूंची यादी

By Mumbai Indians

भारतासाठी टी२० ची यात्रा २०२३ मध्ये एका शेवटच्या टप्प्यावर आली आहे- आयर्लंड. पण थांबा. या वेळी एक नवीनच कर्णधार हॉटसीटवर बसलाय. त्याचं नाव आहे, जसप्रीत जसबीरसिंग बुमरा.

ही बुमराची कर्णधारपदाची पहिली वेळ आहे का? नाही. आपण त्याला यापूर्वीही कर्णधारपदाची धुरा सांभाळताना पाहिले आहे. तो २०२२ मध्ये इंग्लंड विरूद्ध भारत या वेळापत्रक बदललेल्या सामन्यात रोहित शर्माच्या जागेवर आला आणि त्याने स्टुअर्ड बोर्ड ओव्हरमध्ये विक्रमी ३५ धावांची नोंदही केली.

या अनुभवामुळे बूम बूम चांगलाच अनुभवी झाला आणि तो एमआय खेळाडूंच्या खास क्लबमध्ये येऊन बसला. या क्लबचे नेतृत्व सचिन तेंडुलकरने केले आहे. त्यांनी आपल्या राष्ट्रीय टीमचे नेतृत्व एका किंवा विविध प्रकारच्या क्रिकेटमध्ये केले आहे.

पलटन, आपण अनेक सामन्यांच्या मालिकेत त्याला पहिल्यांदा कर्णधारपद भूषवताना पाहणार आहोत. त्यामुळे आता आपण एमआय स्टार्स आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय कर्णधार म्हणून अविस्मरणीय क्षण पाहूया.

सचिन तेंडुलकर

भारतीय कर्णधार: १९९६-९८, १९९९-२००० (कसोटी आणि ओडीआय)

कर्णधारपदाच्या कारकीर्दीतली सर्वाधिक अविस्मरणीय मालिका विजयः तत्कालीन २३ वर्षीय खेळाडूने पहिल्या वहिल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये (१९९६) प्रथमच भारताचे कर्णधारपद भूषवले होते. त्यानंतर भारतीय संघाला टायटन कप (१९९७) जिंकायला मदत करण्यासाठी त्याने ३२० धावांची नोंद केली.

सनथ जयसूर्या

श्रीलंका कर्णधार १९९९-२००२ (कसोटी), १९९८-२००३ (ओडीआय)

कर्णधारपदाच्या कारकीर्दीतील सर्वाधिक अविस्मरणीय मालिका विजयः तेंडुलकरच्या फॉलो दि लीडर भूमिकेत असातना जयसूर्याने २/३३ कामगिरी करून २६ धावाही केल्या. त्यामुळे श्रीलंकेने ऑसीजवर मात करून ऐयवा कर (१९९९ ओडीआय) जिंकला. त्यानंतर त्याने एशियन टेस्ट चॅम्पियनशिप (२००१/०२) अंतिम फेरीत इंग्लंडविरूद्ध ३-० अशी व्हाइटवॉश खेळी केली (ओडीआय- २००१) आणि पाकिस्तानला हरवण्यासाठी श्रीलंकेचे नेतृत्व केले.

शॉन पोलॉक

दक्षिण आफ्रिका कर्णधार: २०००-२००३ (कसोटी), २०००-२००५ (ओडीआय)

कर्णधारपदाच्या कारकीर्दीतले सर्वाधिक अविस्मरणीय क्षणः श्रीलंकेत श्रीलंकेविरूद्ध कसोटी मालिका जिंकणारा प्रोटीआजचा दुसरा कर्णधार (२०००) आणि त्याने घरच्या खेळपट्टीवर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध दक्षिण आफ्रिकेच्या विजयी ओडीआय मालिकेत १११ धावा आणि १३ विकेट्स नोंदवल्या. (२००१/०२)

रिकी पॉन्टिंग

ऑस्ट्रेलियन कर्णधार: २००४-२०१० (कसोटी), २००२-२०१२ (ओडीआय), २००५-२००९ (टी२०आय)

कर्णधारपदाच्या कारकीर्दीतील सर्वाधिक अविस्मरणीय मालिकाः ऑस्ट्रेलियाचा सर्वाधिक यशस्वी व्हाइट बॉल कर्णधार. त्याने ऑसीजचे नेतृत्व करताना २००६/०७ एशेस मालिका जिंकली, एकामागून एक आयसीसी वर्ल्ड कप जिंकले (२००३, २००७) आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीजही जिंकल्या (२००६ आणि २००९.)

ड्वायने ब्रावो

वेस्ट इंडिज कर्णधार: २००७-२०१४ (ओडीआय आणि टी२०आय)

कर्णधारपदाच्या कारकीर्दीतील सर्वाधिक अविस्मरणीय मालिकाः त्याच्या १/१२ आणि २८ नाबाद खेळीमुळे विंडीजला २००८ सालच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील एकमेव टी२०आय सामना जिंकण्यासाठी अत्यंत मोलाची मदत झाली.

मोहम्मद अश्रफउल

बांग्लादेश कर्णधार: २००७-२००९ (कसोटी/ओडीआय/T२०Is)

कर्णधारपदाच्या कारकीर्दीतील अविस्मरणीय मालिका विजयः अश्रफुलने मालिकेत १२४ धावा केलाय आणि अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षण केल्यामुळे टायगर्सना २००८ आयर्लंडविरूद्ध घरच्या खेळपट्टीवर ओडीआय (३-०) जिंकणे शक्य झाले.

कायरन पोलार्ड

वेस्ट इंडिज कर्णधार: २०१३-२०२२ (ओडीआय), २०१९-२०२२ (टी२०आय)

कर्णधारपदाच्या कारकीर्दीतील अविस्मरणीय मालिका विजयः श्रीलंकेविरूद्ध घरच्या खेळपट्टीवर ३-०ने विजय (ओडीआय - २०२१).

कायली मिल्स

न्यूझीलंड कर्णधारः २०१३ (ओडीआय आणि टी२०आय)

कर्णधारपदाच्या कारकीर्दीतील अविस्मरणीय मालिका विजयः किवीजचा कर्णधार म्हणून एक लहान पण प्रभावी कारकीर्द. त्याने २०१३ साली न्यूझीलंडने बांग्लादेशविरूद्ध एकमेव टी२०आय जिंकली तेव्हा एक विकेट घेतली आणि किवीजना मोलाचे सहकार्य केले.

जेपी दुमिने

दक्षिण आफ्रिकन कर्णधार: २०१८ (ओडीआय), २०१४-२०१९ (टी२०आय)

कर्णधारपदाच्या कारकीर्दीतील अविस्मरणीय मालिका विजयः त्याने झिम्बाब्वेविरूद्ध तीनपैकी दोन ओडीआयमध्ये नेतृत्व केले आणि विजय मिळवला (२०१८). त्याने मैदानावरही अप्रतिम खेळ करून घरच्या खेळपट्टीवर २-० टी२०आय मालिका व्हाइटवॉश करायला मदत केली. (बांग्लादेशविरूद्ध - २०१७; श्रीलंकेविरूद्ध - २०१९).

लसिथ मलिंगा

श्रीलंकन कर्णधार: २०१७-२०१९ (ओडीआय), २०१४-२०२० (T२०Is)

कर्णधारपदाच्या कारकीर्दीतील अविस्मरणीय मालिका विजयः अंतिम सामन्यात त्याने विकेट घेतली नाही. परंतु तरीही स्लिंगा मलिंगाने एसएलला प्रोत्साहन देऊन २०१४ चा आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कप मिळवून दिला. १९९६ सीडब्ल्यूसी टायटलनंतरची ही देशाची पहिली आयसीसी ट्रॉफी ठरली.

अजिंक्य रहाणे

भारतीय कर्णधार: २०१५ (ओडीआय आणि टी२०आय), २०१७-२०२१ (कसोटी)

कर्णधारपदाच्या कारकीर्दीतील अविस्मरणीय मालिका विजयः झिम्बाब्वेविरूद्ध ओडीआय मालिका (३-०) धुवून काढली आणि बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (२०२०/२१) मधला तो अभूतपूर्व विजय कोण विसरू शकेल.

जो बटलर

इंग्लंडचा कर्णधार: २०१६-आतापर्यंत (ओडीआय), २०१५-आतापर्यंत (टी२०आय)

कर्णधारपदाच्या कारकीर्दीतील अविस्मरणीय मालिका विजयः भारत आणि पाकिस्तानविरूद्ध महत्त्वाच्या सामन्यांमध्ये त्याने केलेली फलंदाजी असो (सहा सामन्यांमध्ये २२५ धावा) किंवा त्याने घेतलेले महत्त्वाचे निर्णय असोत. बटलर इंग्लंडसाठी पहिल्या आयसीसी मेन्स टी२० वर्ल्ड कप २०२२ जिंकण्यासाठी कायम लक्षात राहील.

एरॉन फिंच

ऑस्ट्रेलियन कर्णधार: २०१७-२०२२ (ओडीआय), २०१४-२०२२ (T२०Is)

कर्णधारपदाच्या कारकीर्दीतील अविस्मरणीय मालिका विजयः २०१९ ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीतील निराशा मोडून काढत, फिन्चीने २०२१ मधील ICC पुरुषांच्या T२० विश्वचषक स्पर्धेसाठी ऑसीजची प्रतीक्षा संपवण्याचा मार्ग तयार केला. अॅरॉन फिंचने सात सामन्यांतून १३५ धावांचे योगदान दिले.

टिम साऊथी

न्यूझीलंड कर्णधार: २०२२-आतापर्यंत (कसोटी), २०१८ (ओडीआय), २०१७-२०२२ (टी२०आय)

कर्णधारपदाच्या कारकीर्दीतील अविस्मरणीय बाबीः न्यूझीलंडने इंग्लंडला एका धावेने पराभूत केले आणि इतक्या कमी फरकाने कसोटी सामना जिंकणारा इतिहासातील फक्त दुसरा संघ ठरला.

क्विंटन डे कॉक

दक्षिण आफ्रिकन कर्णधार: २०२०-२०२१ (कसोटी), २०१८-२०२० (ओडीआय), २०१९-२०२० (टी२०आय)

कर्णधारपदाच्या कारकीर्दीतील अविस्मरणीय मालिका विजयः श्रीलंकेविरूद्ध घरच्या खेळपट्टीवर २-० ने विजय मिळवला (कसोटी - २०२०/२१) आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध घरच्या खेळपट्टीवर ३-० ने विजय मिळवला (ओडीआय - २०२०).

पॅट कमिन्स

ऑस्ट्रेलियन कर्णधार: २०२१-आतापर्यंत (कसोटी), २०२२-आतापर्यंत (ओडीआय)

कर्णधारपदाच्या कारकीर्दीतील अविस्मरणीय मालिका विजयः कमिन्सने ऑस्ट्रेलियासाठी एक नवीन युग आणले. त्याने गोलंदाजीतली सर्वोच्च कामगिरी करायचा प्रयत्न केला आणि आपल्या डावपेचांच्या मदतीने त्याने २०२१/२२ अॅशेस (२१ विकेट), ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल २०२३ (३/८३ आणि त्याच्या ५० व्या कसोटी सामन्यात १/५५) आणि २०२३ ऍशेस (१६२ धावा आणि १८ विकेट) मध्ये ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

शिखर धवन

भारतीय कर्णधार: २०२१-२०२२ (ओडीआय), २०२१ (टी२०आय)

कर्णधारपदाच्या कारकीर्दीतील अविस्मरणीय बाबीः वेस्ट इंडिजविरुद्ध (२०२२) त्यांच्या स्वतःच्या मैदानावर ओडीआय क्लीन स्वीप (३-०) करणारा पहिला भारतीय कर्णधार बनला.

निकोलस पूरण

वेस्ट इंडिज कर्णधार: २०२२ (ओडीआय), २०२१-२०२२ (टी२०आय)

कर्णधारपदाच्या कारकीर्दीतील अविस्मरणीय मालिका विजयः या धमाकेदार तोफखान्याने स्टंप्सच्या मागे उभे राहून सामना नियंत्रित करताना नेदरलँड्समध्ये (२०२२) मध्ये ओडीआयमध्ये (३-०)सुपडा साफ केला.

रोहित शर्मा

भारतीय कर्णधार: २०२२-आतापर्यंत (कसोटी), २०१७-आतापर्यंत (ओडीआय), २०१७-२०२२ (टी२०आय)

कर्णधारपदाच्या कारकीर्दीतील अविस्मरणीय मालिका विजयः भारताच्या या पूर्णवेळ नवीन कर्णधाराने आशिया कपमधल्या विजयासह (ओडीआय, २०१८) आणि निदाहाज टी२० तिहेरी मालिकेसह (२०१७/१८) आपली ओळख पटवली. त्याने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (२०२२) २-१ अशी मिळवून आपल्या कामगिरीवर शिक्कामोर्तब केले.

हार्दिक पंड्या

भारतीय कर्णधार: २०२३-पर्यंत (ओडीआय), २०२२-आतापर्यंत (टी२०आय)

कर्णधारपदाच्या कारकीर्दीतील अविस्मरणीय बाबीः हार्दिकच्या बुद्धिमान टॅक्टिक्समुळे त्याला सहापैकी पाच टी२०आय मालिका जिंकणे शक्य झाले आहे.

जसप्रीत बुमरा

भारतीय कर्णधार: २०२२ (कसोटी)

कर्णधारपदाच्या कारकीर्दीतील अविस्मरणीय बाबीः त्याने स्टुअर्ड ब्रॉडच्या ओव्हरमध्ये जबरदस्त फलंजाजी करून विक्रमी ३५ धावा नोंदवल्या (४-५वाइड-७नो बॉल-४-४-४-६-१) आणि गोलंदाजी करत असताना ३/६८ आणि २/७४ अशी धडाकेबाज कामगिरी करून तो बूम नाही बुंगाट सुटला आहे.