News

एमआयच्या सहा नवीन खेळाडूंनी ठसा उमटवला

By Mumbai Indians

आमच्या टाटा आयपीएल २०२२ सीझनच्या प्रारंभी दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध २७ मार्चला झालेल्या सामन्यात एमआयच्या वतीने सहा खेळाडूंनी प्रथमच निळी आणि सोनेरी जर्सी परिधान केली.

फलंदाज तिलक वर्मा आणि टिम डेव्हिड, ऑल राऊंडर डॅनियम सॅम्स आणि गोलंदाज टायमल मिल्स, बसिल थम्पी आणि मुरूगन अशअविन या सर्वांनी एमआयसाठी आपला पहिला सामना खेळला आहे.

चला बघूया त्यांची कामगिरी

तिलक वर्मा

१९ वर्षीय तिलक वर्मा टाटा आयपीएल आणि एमआयच्या पहिल्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर आला. त्याला पहिल्यापासूनच विश्वास होता की आपण चांगली कामगिरी करू. त्याने कमलेश नागरकोटीच्या चेंडूवर सलग चौकारांसह काही सॉलिड शॉट्स मारले आणि १५ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या.

२०२० च्या यू १९ वर्ल्ड कप स्टारकडून आगमनाच्या सामन्यातच ही उत्तम कामगिरी झाली आहे. त्याने सुरूवातीला थोडे डळमळल्यानंतर ईशान किशनसोबत हळूहळू इनिंग मजबूत केली.

टिम डेव्हिड

टिम डेव्हिडने आपल्या एमआयच्या पहिल्या सामन्यात १२ धावा काढल्या. त्यातील एक षटकार होता. त्याने शार्दुल ठाकूरच्या डोक्यावरून थेट षटकार मारून सर्वांच्याच नजरा त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन वळल्या होत्या.

तो पॉलीसोबत इनिंग पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे आणि आपल्याला त्याच्या क्षमतेची चुणूक पहिल्याच सामन्यात दिसली आहे.

डॅनियल सॅम्स

या अष्टपैलू खेळाडूला प्रथमच फलंदाजी करावी लागली. त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये एक मोठा षटकार खेचून एमआयला १७० चा धावफलक आणण्यास मदत केली.

सॅम्सने सर्वप्रथम गोलंदाजी केली आणि खेळाच्या विविध टप्प्यांवरही चांगली गोलंदाजी केली. एमआयच्या पहिल्या गेममध्ये या डावखुऱ्या खेळाडूच्या उत्तम खेळाची झलक आपल्याला दिसली आहे.

तो टीमच्या संतुलनात खूप महत्त्वाचा आहे आणि पुढे जाताना आणखी चांगला खेळ करू शकेल यात शंकाच नाही.

मुरूगन अश्विन

आज रात्रीच्या सर्वांत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक म्हणजे लेगी मुरून अश्विन किंवा मॅशने आपल्या एमआयसाठीच्या पहिल्या ओव्हरमध्ये विरोधी टीमला दोन महत्त्वाचे झटके दिले.

पॉवर प्लेमध्ये गोलंदाजीसाठी आणण्यात आलेल्या मॅशने धोकादायक टिम सेफर्टला गुगलीने चकवले आणि त्यानंतर फुल टॉस टाकून मनदीप सिंगचाही बळी घेतला. त्याने पृथ्वी शॉची विकेटही जवळजवळ काढलीच होती.

मॅशने दोन बळी घेऊन १४ धावा दिल्या. हा एमआयचा गोलंदाजांपैकी त्या दिवसाचा सर्वोत्तम स्कोअर होता.

बसिल थम्पी

आपल्या एमआयमधल्या पहिल्याच सामन्यात तीन विकेट घेणं ही एक मोठी गोष्ट आहे.

मॅशप्रमाणेच थम्पीने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेतल्या. त्याने पृथ्वी शॉ आणि रोवमन पॉवेलच्या विकेट्स घेतल्या आणि त्यानंतर धोकादायक ठरू शकणाऱ्या शार्दुल ठाकूरलाही घरी पाठवले.

थम्पीने ३ विकेट घेऊन ३५ धावा दिल्या आणि जेव्हा जेव्हा त्याला बोलावण्यात आले तेव्हा त्याने उत्तम कामगिरी केली.

टायमल मिल्स

टायमल मिल्सनेही एमआयमधल्या करियरची उत्तम सुरूवात केली. त्याने कर्णधार रिषभ पंतला आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये उचलले.

मिल्सने मॅश आणि थम्पीसोबत डीसीच्या मधल्या ओव्हर्समधल्या धावांना आळा घातला. त्याने तीन ओव्हर्समध्ये १ विकेट घेऊन २६ धावा दिल्या.

या सहाही नवीन खेळाडूंनी चांगली सुरूवात केली असून सीझन जसजसा पुढे जाईल तसतसे त्यांचा खेळ बहरेल याची आम्हाला खात्री आहे. ते आता काय काय करू शकतात हे पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

आमच्या पहिल्या सामन्यात तुम्हाला सर्वांत जास्त कोण आवडले, पलटन?