
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५: ब्लू अँड गोल्डमधली पोरं सज्ज आहेत
पलटन, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये तुमच्या आवडत्या स्टार्सना चिअर अप करण्यासाठी तुम्ही तयार आहात ना?! 🤩
चला तर मग, बहुप्रतीक्षित आयसीसी सामने आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर परत सुरू होत आहेत आणि आपले ब्लू अँड गोल्डमधले चार खेळाडू या वेळी आपापल्या टीम्समध्ये खेळणार आहेत.
आता फार प्रतीक्षा न करता आपले खेळाडू स्पर्धेसाठी कशी तयारी करत आहेत ते पाहूया.
रोहित शर्मा (भारत)
भारतीय कर्णधार त्याला सर्वाधिक जमणारी गोष्ट करतोय. त्याने इंग्लंडविरूद्ध अलीकडेच झालेल्या ओडीआय मालिकेत दुसऱ्या सामन्यात दणदणीत शतक फटकावले आहे. 💪
𝗧𝗛𝗜𝗥𝗧𝗬 𝗧𝗪𝗢 𝗢𝗗𝗜 𝗖𝗘𝗡𝗧𝗨𝗥𝗜𝗘𝗦 ✅#INDvENG #MumbaiMeriJaan #MumbaiIndians pic.twitter.com/xZt7B7ciOo
— Mumbai Indians (@mipaltan) February 9, 2025
हा सलामी फलंदाज यूएईमध्ये दणादण फटकेबाजी करतो. त्याने तब्बल १०५.६६ च्या सरासरीने पाच ओडीआयमध्ये एक शतक व दोन अर्धशतकांच्या मदतीने ३१७ धावा पटकावल्या आहेत.
आपला हिटमॅन २०१७ मध्ये ज्या प्रकारे आक्रमक खेळला तसाच याही वेळी खेळेल अशी अपेक्षा करूया. त्याने पाच इनिंग्समध्ये ३०७ धावा पटकावत आपला माजी सहकारी खेळाडू शिखर धवनच्या पाठोपाठ सर्वाधिक धावांसाठी दुसरा क्रमांक पटकावला.
हार्दिक पांड्या (भारत)
आपला एचपी टीम इंडियासाठी अष्टपैलू जबाबदारी पेलणार आहे. या ३१ वर्षीय खेळाडूने २०१७ च्या स्पर्धेत १०५ धावा आणि चार विकेट्स घेतल्या. तो याही वेळी महत्त्वाचे योगदान देईल अशी अपेक्षा आहे.
हार्दिकने मर्यादित ओव्हर्सच्या खेळात मोठी कामगिरी केली. ती सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे तो बॉलने करत असलेल्या राड्यासोबतच इनिंग्सच्या शेवटीशेवटी त्याची आतषबाजी पाहायला मजा येईल.
रायन रिकेल्टन (दक्षिण आफ्रिका)
या प्रोटिआजच्या दणकेबाज खेळाडूसाठी मागचे काही महिने फारच सुंदर गेले आहेत.
मुंबई इंडियन्सकडून आयपीएल २०२५ साठी निवड झाल्यानंतर १० दिवसांनी कसोटीमध्ये त्याने पहिले शतक फटकावले. श्रीलंकेवर दक्षिण आफ्रिकेच्या १०९ धावांनी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
त्याशिवाय त्याने या वर्षाच्या सुरूवातीला दक्षिण आफ्रिकेच्या २०२४-२५ च्या पाकिस्तान दौऱ्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात २५९ धावांचा पाऊस पाडला. त्याचा संघ १० विकेट्सनी जिंकला हे सांगायला नकोच. 🙌
तो एवढ्यावरच थांबला नाही. अलीकडेच झालेल्या एसए२० लीगमध्ये एमआय केपटाऊनने पहिला चषक जिंकला. त्यात आपल्या रायन भाऊने ४८.०० च्या सरासरीने आठ सामन्यांमध्ये ३३६ धावा कमावून आघाडीचा फलंदाज ठरला.
🚨𝐌𝐢𝐥𝐞𝐬𝐭𝐨𝐧𝐞 𝐚𝐥𝐞𝐫𝐭🚨
— MI Cape Town (@MICapeTown) February 9, 2025
Ryan Rickelton is the second ever player to join the 1️⃣0️⃣0️⃣0️⃣ run club 🔥#MICapeTown #OneFamily #BetwaySA20 pic.twitter.com/Xqo2rQtSWZ
हा २८ वर्षीय खेळाडू सीटी२५ मध्ये आपला फॉर्म कायम ठेवेल अशी खात्री आहे! <आणि नंतर आयपीएल २०२५ साठी ब्लू अँड गोल्डमध्येही😉>
मिशेल संतनर (न्यूझीलंड)
डिसेंबर २०२४ मध्ये न्यूझीलंडचा व्हाइट बॉल कॅप्टन म्हणून ख्याती मिळाल्यानंतर संतनरने किवीजना काही सामन्यांमध्ये विजय मिळवून दिले आणि अद्याप एकही मालिका हरलेला नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पूर्वी मिच अँड कंपनीने पाकिस्तान त्रिराष्ट्रीय मालिका खिशात टाकली. त्यांनी यजमान संघाला शेवटच्या सामन्यात पाच विकेट्सनी पराभूत केले. शेवटच्या सामन्यात या अष्टपैलू खेळाडूने १० ओव्हर्समध्ये २/२० अशी सुंदर कामगिरी केली, ज्यात तब्बल ४० डॉट बॉल्स होते.
𝗙𝗢𝗨𝗥𝗧𝗬 𝗗𝗢𝗧 𝗕𝗔𝗟𝗟𝗦‼️
— Mumbai Indians (@mipaltan) February 15, 2025
A 🤯 spell that won Mitch & Co. the 🏆 in the tri-series! 🇳🇿#PAKvNZ #MumbaiMeriJaan #MumbaiIndians pic.twitter.com/Ay0XWjTorx
खूप खूप शुभेच्छा, मिशेल मित्रा! तुला आणि तुझ्या टीमला ही स्पर्धा खूप चांगली जावो! 🏏