“बूमला पहिली विकेट मिळाली तेव्हा आमचा विश्वास पुन्हा जागा झाला”: मिशेल सँटनर

“बूमला पहिली विकेट मिळाली तेव्हा आमचा विश्वास पुन्हा जागा झाला”: मिशेल सँटनर

By Mumbai Indians

पलटन, विजयाची भावना पुन्हा एकदा मनात जागी झाली आहे आणि चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध आपल्या बालेकिल्ल्यावर होणाऱ्या सामन्यासाठी सज्ज होण्याची वेळ आली आहे. वानखेडे सज्ज आहे, परिस्थिती गंभीर आहे आणि हा अल क्लासिको सामना कसा असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आता फोकस एकच आहे. एकमेकांना साथ द्या, दिलेली जबाबदारी पार पाडा आणि दिवस साजरा करा कारण इथून पुढे प्रत्येक गुण महत्त्वाचा ठरणार आहे. आपला फिरकी जादूगार, शांत संयमी आणि समजूतदार मिशेल सँटनर एमआय चर्चामध्ये सहभागी झाला आणि त्याने अत्यंत उत्साहाने, चेहऱ्यावर हास्य ठेवून संवाद साधला. 💙

जीटीविरूद्ध विजय मिळवल्यानंतर एमआयच्या ड्रेसिंग रूममधील एनर्जीबाबत बोलताना मिश म्हणाला, “आम्ही एका चांगल्या टीमविरूद्ध चांगली धावसंख्या उभारल्यामुळे प्रचंड उत्साह होता. आम्ही आता सीएसकेविरूद्ध खेळणार आहोत आणि बरीच मेहनत करावी लागेल याची आम्हाला कल्पना आहे. काही पराभव झाल्यानंतर ही एक चांगली सुरूवात ठरली. टीमचा उत्साह चांगला आहे आणि मागचा विजय एक चांगली टीम कामगिरी होती.”

“आम्ही प्रचंड विश्वास आणि उत्साह कायम ठेवला. सर्वांनीच एकमेकांना साथ दिली. प्रत्येकजण शेवटच्या सामन्यापर्यंत चांगला खेळला. आता सीएसकेविरूद्ध सगळेच आपापली जबाबदारी मनापासून पार पाडतील. मागील सामन्यांदरम्यान अश्विनी (कुमार) आणि क्रिश (भगत) यांनी उत्तम गोलंदाजी केली आणि आम्ही त्यांच्यावर प्रत्येक टप्प्यावर विश्वास ठेवून त्यांना पाठिंबा दिला.”

प्रशिक्षकांनी परिस्थिती आमच्या बाजूने नव्हती तेव्हा सर्वांचा उत्साह कसा वाढवला आणि सर्वांना एक चांगली कामगिरी करण्यासाठी कशा प्रकारे प्रोत्साहित केले याबाबत चर्चा केली. “ही टीम खूप अनुभवी आहे आणि खूपच चांगली आहे. संपूर्ण सामन्यात दिलेला संदेश एकच होता. टीमसाठी मेहनत करा आणि परिस्थिती बदलेल. टायटन्सविरूद्ध मागील सामन्यात बूमला पहिली विकेट मिळाल्यानंतर आमच्या मनात पुन्हा एकदा विश्वास जागृत झाला. आम्ही तिथून एक उत्तम कामगिरी केली आणि त्याचा आम्हाला खूप आनंद झाला,” तो म्हणाला.
आता सँटनर सोबत आहे, तो अत्यंत शांत आणि हुशार आहे. त्यामुळे खूप मजा येईल कारण त्याची कला वानखेडेवर सर्वांनाच दिसेल! 🌪️