रोहित शर्माच्या उत्साहवर्धक भाषणामुळे नाबाद १०१ धावा काढणे शक्य झाल्याचे तिलक वर्माचे मत

रोहित शर्माच्या उत्साहवर्धक भाषणामुळे नाबाद १०१ धावा काढणे शक्य झाल्याचे तिलक वर्माचे मत

By Mumbai Indians

पहिल्या पाच सामन्यांमध्ये ४३ धावा आणि नंतरच्या सामन्यात नाबाद १०१ धावा. तिलक वर्मा सध्या जोरदार चर्चेत आहे आणि त्याने कर्णधार, हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांच्यासोबत झालेल्या चर्चेला गुजरात टायटन्सविरूद्ध सामन्यातील कामगिरीचे संपूर्ण श्रेय दिले आहे. 🙏

“रोहित भाईने मला १५ चेंडू खेळायला सांगितले. मी १५ चेंडू खेळलो तर मी काय करू शकतो हे सर्वांना माहीत आहे असे त्याने मला सांगितले. तो म्हणाला की परिस्थिती बघू नकोस, फक्त १५ चेंडू खेळ. माझ्या डोक्यात फक्त हाच विचार होता. मी ते १५ चेंडू खेळलो तेव्हा अधिक चांगली फटकेबाजी करण्याची इच्छाशक्ती आपोआप निर्माण झाली,” सीएसकेविरूद्ध सामन्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत त्याने सांगितले.

त्याची या खेळादरम्यान आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हार्दिकसोबतची भागीदारी आणि तिलकला आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी त्याने दिलेला पाठिंबा. “हार्दिक भाई कायम खेळाडूंना पाठिंबा देतो. तो मला सांगत राहिला की तू करशील. तू करून दाखवशील. तो याच उत्साहाने खेळाडूंना प्रोत्साहन देत राहतो. हीच ऊर्जा घेऊन तो कर्णधार झाला आहे,” तो म्हणाला.

तुम्ही तिलकच्या मेंदूत शिरू शकलात तर तुम्हाला स्पष्टता दिसेल. कधी फटका मारायचा, कधी शांत राहायचे, कधी सोडून द्यायचा आणि कधी आतषबाजी करायची हे त्याला माहीत असते. तो याला देवाची इच्छा म्हणत असला तरी त्याच्या १०१* धावांच्या खेळात हा दृष्टीकोन पुरेपूर दिसला. 💪

“मला माहीत आहे की मी संपूर्ण मैदानात चेंडू टोलवू शकतो. माझ्याकडे फॅन्सी शॉट्स आहेत. मी हार मानत नाही. टीमला मी विकेटवर राहायची गरज असते तेव्हा किंवा धावा करायची गरज असते तेव्हा मी माझा दृष्टीकोन बदलतो आणि कोणत्या कोणाच्या चेंडूवर हल्ला चढवायचा याचा विचार करतो. कधीकधी तुम्हाला गोलंदाजांना आदर दाखवावा लागतो आणि कधीकधी तुम्हाला हल्ला करावा लागतो. मी सुरूवातीला सर्व गोलंदाजांना आदर दाखवला.

“राशीद खान सुरूवातीला मला गोलंदाजी करत होता तेव्हा चेंडू माझ्या टप्प्यात होता असे मला वाटत असतानाही मी फक्त एकेक धाव काढायचा निर्णय घेतला कारण मी मधल्या फळीत टिकून राहावे असा टीमचा निर्णय होता. मी त्याला देवाची इच्छा म्हणतो. मला फटकेबाजी करायची होती तेव्हा चांगले फटके भात्यातून निघाले आणि अंतिमतः माझ्याकडून चांगली कामगिरी झाली.” 💙