News

रोचा चाहत्यांना खास संदेश आणि डीसीविरूद्ध विजयाबाबत काही मते

By Mumbai Indians

आम्ही डीसीविरूद्ध १६० धावांचा पाठलाग करून टाटा आयपीएल २०२२ सीझन अत्यंत उत्साहात संपवल्यानंतर त्या रात्रीच्या सामनावीरांनी आपले विचार व्यक्त केले.

ड्रेसिंग रूम सामनावीर (पीओटीएम) पुरस्कार मिळवणारा खेळाडू होता लेगी मयंक मार्कंडे त्याने चार ओव्हर्समध्ये १/२६ अशी कामगिरी केली आणि त्यामुळे जलदगती गोलंदाजांनी सुरूवातीला खिंडार पाडल्यानंतर डीसीवर दबाव निर्माण करणे शक्य झाले.

“विजयाने सीझन समाप्त करणे ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आम्हाला अपेक्षित असा हा सीझन झाला नाही. पण आमहाला खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच आणखी चांगली कामगिरी करू,” असे मयंकने पुरस्कार स्वीकारल्यानंतर सांगितले.

त्याचा जवळचा मित्र ईशान किशनदेखील इनिंगच्या पहिल्या फळीत ४८ धावांची चांगली खेळी करून बाद झाला. ड्रेसिंग रूम पीओटीएमनंतर त्यानेही असेच मत व्यक्त केले.

“आम्ही आता सगळे घरी परत चाललो आहोत. त्यामुळे या वेळेचा आनंद घेणे खूप महत्त्वाचे आहे. आम्हाला बरेच काही शिकता आले आहे आणि पुढच्या सीझनमध्ये आम्ही नक्कीच चांगली कामगिरी करू,” असे तो म्हणाला.

आमचा तरूण स्टार डेवाल्ड ब्रेविसने ३३ चेंडूंमध्ये एक महत्त्वाची ३७ धावांची खेळी केली आणि दुसऱ्या विकेटसाठी ईशानसोबत ५० धावांची भागीदारी केली. त्याने टीममधल्या कौटुंबिक वातावरणाबद्दल सांगितले.

“तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं त्या सगळ्यासाठी आभार. ही कौटुंबिक भावना खूप छान आहे. आम्ही मागच्या सहा सामन्यात कशा प्रकारे एकत्र आलो हे पाहणे खूप आनंददायी आहे आणि भविष्यही उज्ज्वल आहे असे माझे मत आहे. विजय प्राप्त करून सीझनचा समारोप करताना आम्हाला खूप छान वाटले,” असे त्याने ड्रेसिंग रूम पीओटीएम मिळाल्यानंतर सांगितले.

डीसीविरूद्ध चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडून सामना संपवणाऱ्या आणि ११ चेंडूंमध्ये ३४ धावा काढणाऱ्या टिम डेव्हिडला टीममधल्या संमिश्र भावनांमुळे विजय प्राप्त करणे शक्य झाले असे वाटते.

“मी सपोर्ट स्टाफचे खूप आभार मानतो कारण हे सर्व एकत्रित प्रयत्नांमुळेच साध्य झाले आहे. आम्ही सीझनच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या भावनांमधून गेलो. त्यामुळे आम्ही आता त्याबद्दल खूप मजबूत असू अशी मला खात्री आहे. आता थोडा आराम करून पुढच्या वर्षी फील्डवर नवीन जोमाने उतरू ,” तो म्हणाला.

आमच्या सामन्यांमध्ये आम्हाला सातत्याने पाठिंबा देणारी आणि आमच्या बाजूने उभी राहणारी आमची पलटन. त्यांनी आपल्या जल्लोषाने आमचा उत्साह वाढवला आणि टीमला कठीण परिस्थितीत पाठिंबा दिला.

आमचा कर्णधार रोहित शर्मा याने पलटनचे त्यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यासाठी आभार मानले.

“या वर्षी चाहत्यांनी आम्हाला खूप आभार दिला. स्टेडियम्सवर त्यांनी आमचा उत्साह प्रचंड वाढवला. जल्लोष एक मिनिटसुद्धा थांबला नाही. ते सतत आमच्या पाठीशी होते आणि आम्ही या वेळी आमची सर्वोत्तम कामगिरी करू शकलो नाही याबाबत मी थोडा निराश आहे,” रो म्हणाला.

“अर्थात, आम्ही प्रयत्न करत आहोत हे त्यांनी समजून घेतले आणि काही गोष्टी आमच्या बाजूने घडल्या नाहीत. मी संपूर्ण एमआय टीमच्या वतीने परिस्थिती कठीण असतानाही आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. ते आमचे खरे चाहते आहेत,” तो शेवटी म्हणाला.

पलटन, आमच्यासाठी हा सीझन कठीण होता. पण आमचे खेळाडू म्हणतात तसे हा अनुभव आम्हाला आणखी मजबूत बनवेल आणि आम्ही या सीझनमध्ये शिकलेले अमूल्य धडे पुढच्या वर्षी आम्हाला खूप उपयुक्त ठरतील!