News

शारदाश्रम, आयईएस व्ही एन सुळे, श्री मा विद्यालय आणि इतर संघांचा एमआय ज्युनियरच्या उपांत्य फेरीत प्रवेश

By Mumbai Indians

शारदाश्रम विद्यामंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल (दादर), आयईएस व्हीएन सुळे इंग्लिश स्कूल (दादर), श्री मा विद्यालय (ठाणे), आयईएस न्यू इंग्लिश स्कूल आणि इतर शाळांच्या संघांनी गुरूवारी मुंबई इंडियन्स तिसऱ्या ज्युनियर १६ वर्षांखालील मुलांच्या आंतरशालेय स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

शारदाश्रम विद्यामंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल (दादर) ने कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल (वांद्रे पश्चिम)वर २४८ धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि मुंबई इंडियन्स ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या (१६ वर्षांखालील) उपांत्य फेरीत धडक मारली.

सिद्धांत सिंगच्या जोरदार १२२ धावा, अथर्व शेळकेच्या ६७ धावा आणि आर्यन दिवटेच्या ५४ धावांमुळे शारदाश्रम शाळेलाय ४० ओव्हर्समध्ये ८ विकेट्सवर ३१२ धावा करता आल्या. धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कार्डिनल ग्रेशियस शाळेचा संघ १८.२ ओव्हर्समध्ये ६४ धावांवर गुंडाळला गेला. अर्जुन बागडे (१५ वर ५ विकेट्स) आणि अथर्व कांबळे (८ वर २ विकेट्स) यांनी मोठे नुकसान केले.

श्रेयांस रायनेदेखील शतक झळकवून (१०६) आयईएस व्हीएन सुळे इंग्लिश स्कूल (दादर)ला आणखी एका १६ वर्षांखालील मुलांच्या सामन्यात व्हीके कृष्ण मेनन एकेडमीवर (बोरिवली) ५६ धावांनी विजय मिळवून देण्यास मदत केली. २७७ धावांच्या पाठलागासाठी उतरलेल्या आयईएस व्हीएन सुळे स्कूलला फक्त २२० धावा करता आल्या. रेहान मुलाणी (२३ वर २) आणि शौर्य राय (२८ वर २) यांनी अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन घडवले.

आणखी एका उपउपांत्य सामन्यात श्री मा विद्यालय (ठाणे)ने हरी रेड्डीच्या १३ धावांवरील ५ विकेट्सचा फायदा घेऊन एसव्हीकेएम- जेव्ही पारेख इंटरनॅशनल स्कूल (विलेपार्ले)चा सात विकेट्सनी पराभव केला आणि शेवटच्या आठ संघांमध्ये प्रवेश केला.

सर्वप्रथम फलंदाजीला उतरलेल्या विलेपार्लेच्या या शाळेला २५.२ ओव्हर्समध्ये सर्वबाद ११४ धावा करणे शक्य झाले. श्री माने १८.१ ओव्हर्समध्ये हे लक्ष्य पूर्ण करताना फक्त तीन विकेट्स घालवल्या. रुजुल राजणेने ३५ धावा करून पाठलागाचे नेतृत्व केले.

आणखी एका रोमांचक सामन्यात आयईएस न्यू इंग्लिश स्कूलने अल बरकत मलिक मोहम्मद इस्लाम इंग्लिश स्कूलवर चार विकेट्सनी विजय प्राप्त केला. अगस्त्य बंगेरा आणि मोहम्मद ताहा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या आणि अल बरकतच्या संघाला ३७.३ ओव्हर्समध्ये १५७ धावांवर रोखले.

आयईएसने २७.३ ओव्हर्समध्ये फक्त सहा विकेट्स घालवून हे लक्ष्य पूर्ण केले. हमझा खान हा (४१) आयईएससाठीचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला तर शिमर सप्रा (१८ वर २) आणि काव्य गोरी (४५ वर २) यांनी अल बरकतसाठी चांगली कामगिरी केली.

दरम्यान १६ वर्षांखालील मुलांच्या आणखी एका उपउपांत्य सामन्यात आर्य कारलेच्या अप्रतिम खेळामुळे (६७) आणि धैर्य रासमच्या ४७ धावांमुळे आरआर एज्युकेशन ट्रस्ट (मुलुंड)ला आयईएस सेकंडरी स्कूलचा (मुलुंड) ५५ धावांनी पराभव करणे शक्य झाले. १७५ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला आयईएस सेकंडरीचा संघ १२० धावांवर बाद झाला. भाविक देसाईने १६ धावांवर २ विकेट्स घेतल्या.

अभिज्ञान कुंडू (७८) आणि आयुष वाडेकर (२१ धावांवर ४ विकेट्स) यांच्या अप्रतिम कामगिरीमुळे अंजुमन ए इस्लाम अल्लाना इंग्लिश (सीएसटी)ने आणखी एका १६ वर्षांखालील मुलांच्या सामन्यात रिझवी स्प्रिंगफील्ड हायस्कूल (खार)चा ९८ धावांनी पराभव केला.

वरूण दोशीच्या सुंदर अर्धशतकामुळे (५४ नाबाद) डॉन बॉस्को हायस्कूल (माटुंगा)ला श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेविरूद्ध ७८ धावांचे लक्ष्य अगदी सहजपणे साध्य करता आले. दोशीच्या इनिंगपूर्वी गोकुळराज देवेंद्र (२९ वर ३) आणि अर्णव गुप्ता (१५ वर २) यांनी डॉन बॉस्कोसाठी अप्रतिम गोलंदाजी केली.

दुसरीकडे संचित कदम (१९ वर ३) आणि ध्रुव आठुले (२७ वर ३) यांच्या सुंदर गोलंदाजीमुळे स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल (कांदिवली)ला लक्ष्यधाम हायस्कूलला १५१ धावांवर थांबवणे शक्य झाले. स्वामी विवेकानंदच्या टीमने आपल्या इनिंगमध्ये हे लक्ष्य अगदी सहजपणे पूर्ण केले. क्षितिज पाल (४१) आणि शौर्य शरण (३२) यांनी मोठा हातभार लावला. त्यांनी चार विकेट्स गमावून हे लक्ष्य पूर्ण केले.

थोडक्यात धावसंख्या:

मुंबई इंडियन्स ज्युनियर १६ वर्षांखालील आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा सीझन- ३ (उपउपांत्य अंतिम फेरी)

एसव्हीकेएम- जेव्ही पारेख इंटरनॅशनल स्कूल (विलेपार्ले) २५.२ ओव्हर्समध्ये ११४ सर्वबाद (प्रथ पटेल ५०; हरी रेड्डी १३ वर ५) ईशान तावडे (१२ वर २) चा श्री मा विद्यालय (ठाणे)कडून १८.१ ओव्हर्समध्ये ३ विकेट्सवर ११५ धावा करून पराभव (रुजूल राजणे ३५)

सामनापटू: हरी रेड्डी

अल बरकात मलिक मोहम्मद इस्लाम इंग्लिश स्कूल ३७.३ ओव्हर्समध्ये १५७ धावांवर सर्वबाद (चौहान तन्वीर ३३; अगस्त्य बंगेरा ३० वर ३, मोहम्मद ताहा ४१ वर ३) चा आयईएस न्यू इंग्लिश स्कूलकडून २७.३ ओव्हर्समध्ये १५८ धावांवर ६ विकेट्स देऊन पराभव (हमजा खान ४१; शिमर सप्रा १८ वर २, काव्य गोरी ४५ वर २)

सामनापटूः अगस्त्य बंगेरा

आरआर एज्युकेशन ट्रस्ट (मुलुंड)चा ३७.४ ओव्हर्समध्ये १७५ धावांवर सर्वबाद (आर्य कारळे ६७, धैर्य रासम ४७, मान कोळी २३ वर ३, तेजस मोरे ३६ वर ३) आयईएस सेकंडरी स्कूल (मुलुंड)वर २९.३ ओव्हर्समध्ये १२० धावांवर सर्वबाद करून पराभव (तेजस मोरे ६५; भाविक देसाई १६ वर २)

सामनापटू: आर्य कारळे

अंजुमन ए इस्लाम अल्लाना इंग्लिश (सीएसटी) ३७.५ ओव्हर्समध्ये २३१ सर्वबाद (अभिग्यान कुंडू ७८, अब्दुर रेहमान ३६; देवांश राय ३५ वर ४, देव दमानिया ५० वर ३) कडून रिझवी स्प्रिंगफील्ड हायस्कूलचा (खार) ३२.५ ओव्हर्समध्ये ९ विकेट्सवर १३३ धावा करून पराभव (आर्यन निकाळजे २८; आयुष वाडेकर २१ वर ४)

सामनापटूः अभिग्यान कुंडू

श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल २८.५ ओव्हर्समध्ये ७७ वर सर्वबाद (अर्णव वानखेडे ३७; गोकुळराज देवेंद्र २९ वर ३, अर्णव गुप्ता १५ वर २) चा डॉन बॉस्को हायस्कूल (माटुंगा)कडून ६.३ ओव्हर्समध्ये एकही विकेट न देता ७९ धावांवर पराभव (वरूण दोशी नाबाद ५४)

सामनापटूः वरूण दोशी

आयईएस व्हीएन सुळे इंग्लिश स्कूल (दादर)कडून ३९ ओव्हर्समध्ये ६ विकेट्सवर २७६ धावा करून (श्रेयांश राय १०६, विनय उतेकर ५२ वर ४) व्हीके कृष्ण मेनन एकेडमी (बोरिवली)चा ३८ ओव्हर्समध्ये ७ विकेट्सवर २२० धावा करून पराभव (आदिल शेख ८२ नाबाद, आरव जोशी ५६, रेहान मुलानी २३ वर २, शौर्य राय २ वर २८)

सामनापटूः श्रेयांश राय

लक्ष्यधाम हायस्कूल ४० ओव्हर्समध्ये ९ विकेट्सवर १५१ धावा (तनिष शेट्टी ३८, ईशान सेठी ३५, संचित कदम १९ वर ३, ध्रुव आठुले २७ वर ३) चा स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल (कांदिवली)कडून ३२.४ ओव्हर्समध्ये ४ विकेट्सवर १५४ धावांमुळे पराभव (क्षितिज पाल ४१, शौर्य शरण ३२, ईशान सेठी २० वर ३)

सामनापटूः संचित कदम

शारदाश्रम विद्यामंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल (दादर) ४० ओव्हर्समध्ये ३१२/८ (सिद्धांत सिंग १२२, अथर्व शेळके ६७, आर्यन दिवटे ५४, स्वयम जाधव ४६ वर ४) कडून कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल (वांद्रे प.)चा १८.२ ओव्हर्समध्ये ६४ धावांवर सर्वबाद करून पराभव (अर्जुन बागडे १५ वर ५, अथर्व कांबळे ८ वर २)

सामनापटूः सिद्धांत सिंग.