News

तिलकच्या मॅच्युअर शॉट्सपासून डेव्हिडच्या तडाखेबाज हिट्सपर्यंतः या सीझनचे सर्वोत्तम बॅटिंग परफॉर्मन्स

By Mumbai Indians

आमचा खेळ तुलनेने लवकर संपला असला तरी सीझनमधून अनेक सकारात्मक गोष्टी आम्हाला नेता आल्या. काही निकाल आमच्या बाजूने लागले नसले तरी आमच्या फलंदाजांनी खूप सुंदर इनिंग्स खेळळ्या आणि त्यामुळे आम्हाला चांगली धावसंख्या उभारता आली.

चला आपण त्यातले काही बघूया:

ईशान किशन – डीसीविरूद्ध ८१*, ब्रेबॉर्न स्टेडियम २७ मार्च

आमच्या सीझनच्या पहिल्या सामन्यात आमच्या पॉकेट डायनॅमोने पहिल्या फळीत स्फोटक नाबाद ८१ धावा काढल्या.

कर्णधार रोहित शर्मासोबत बॅटिंग ओपनिंग करण्यात आलेल्या ईशान किशनने आपल्यासमोर आलेल्या दुसऱ्याच चेंडूवर एक जोरदार कव्हर ड्राइव्ह ठोकून आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतर पुढच्या तीन ओव्हर्समध्ये त्याने धुंवाधार धावा केल्या.

साधारण काही ओव्हर्समध्ये रोहित आणि अनमोलप्रीत सिंग हे आऊट झाल्यामुळे वादळ थंडावल्यानंतर ईशानने तिलक वर्मासोबत जोरदार भागीदारी केली आणि डीसीच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. पुन्हा एकदा पाया स्तिर झाल्यावर त्याने मारलेले कट्स, ड्राइव्ह आणि फटके अत्यंत सुरेख होते.

त्याने मिड विकेटवर जोरदार हिट मारून पन्नास धावा पूर्ण केल्या आणि सतत चौकार मारून त्याने उत्तम धाव्या केल्या. त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये दोन चौकार मारले आणि ८१* धावा करून आमचा स्कोअर १७७/५ वर नेऊन ठेवला.

तिलक वर्मा – आरआर विरूद्ध ६१, डी. वाय. पाटील स्टेडियम, २ एप्रिल

डीसीविरूद्ध आपल्या पहिल्या सामन्यात तगडे आगमन केल्यानंतर तिलक वर्माने आमच्या सीझनच्या दुसऱ्या राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या सामन्यात आपले पहिले अर्धशतक झळकवले.

१९४ धावांचा पाठलाग करण्यासाठी चौथ्या क्रमांकावर उतरलेल्या तिलकने आपली इनिंग रवीचंद्रन अश्विनचा सामना करत सुरू केली आणि या दोघांमध्ये एक रंगतदार खेळ रंगला.

तिलकने त्या रात्रीची आपली पहिली बाऊंड्री मारली. त्याने अश्विनच्या चेंडूवर डीप बॅकवर्ड स्क्वेअरवर एक षटकार ठोकला. थोडी मंद सुरूवात केल्यानंतर तिलकने आपला हात सैल सोडून नवदीप सैनीच्या चेंडूंवर चौकार आणि षटकार ठोकले आणि त्यानंतर युजवेंद्र चहललाही त्याने तीच वागणूक दिली.

तिलकने प्रत्येक ओव्हरमध्ये चेंडू सीमारेषापार टोलवला आणि चहलच्या चेंडूवर एक धाव काढून आपले अर्धशतक पूर्ण केले. त्या रात्रीचा सर्वोत्तम शॉट १५ व्या ओव्हरमध्ये तिलकने मारला. त्याने अश्विनकडून आलेल्या चेंडूवर मिडलवर आपला पवित्रा आणि पायाची दिशा बदलली आणि डीप थर्डच्या डोक्यावरून थेट सिक्स टोलवला.

अश्विनने पुढच्याच चेंडूवर त्याला बाद केले असले तरी तिलकने मारलेले हिट्स हे त्याच्या एकूणच सीझनच्या कामगिरीचे निदर्शक होते.

सूर्यकुमार यादव - ६८* आरसीबीविरूद्ध, एमसीए स्टेडियम, ९ एप्रिल

सीझनच्या आपल्या दुसऱ्याच सामन्यात सूर्यकुमार यादवने धमाकेदार शॉट्स मारून आपल्या संघाला कोसळण्यापासून वाचवले आणि शेवटपर्यंत टिकून राहून आपल्याला चांगली धावसंख्या उभारून दिली.

केकेआरविरूद्धच्या सीझनच्या पहिल्याच सामन्यात पन्नास धावांनी सुरूवात केलेला स्काय आरसीबीविरूद्ध चौथ्या क्रमांकावर आला आणि आरसीबीने आपली ६४/५ अशी पडझड केली तेव्हा त्याच्यासमोर त्याचे तीन जोडीदार बाद झाले.

त्याने इनिंग स्थिर करण्यासाठी आपली हल्ल्याची ऊर्मी आटोक्यात ठेवली आणि १५ व्या ओव्हरमध्ये त्याने फटक्यांची आतषबाजी करायला सुरूवात केली.

स्कायने डावखुरा स्पिनर शहबाझ अहमदच्या चेंडूवर कव्हरवरून इनसाइड आऊट सिक्स मारला आणि त्यानंतर त्याला मिड विकेटची सीमारेषा दाखवली. त्याने पन्नास धावांच्या जवळ पोहोचताना अत्यंत सुंदर पुल आणि नावीन्यपूर्ण स्वीप्स मारले.

एकोणिसाव्या ओव्हरमध्ये तर स्कायने कमालच केली. त्याने एक पंच, फ्लिक आणि स्लाइस मारला. यातला प्रत्येक शॉट चेंडूला सीमारेषेपार घेऊन गेला. त्याने आपली इनिंग मिड विकेटवर षटकार ठोकून पूर्ण करताना आपल्याला १५१ ची धावसंख्या उभारून दिली.

या इनिंगमध्ये स्कायची प्रतिभा आणि कठीण परिस्थितीत हल्ला करण्याची क्षमता दिसून आली.

डेवाल्ड ब्रेविस- पीबीकेएसविरूद्ध ४९, एमसीए स्टेडियम, १३ एप्रिल

एक अत्यंत सुंदर सीझन खेळणारा दुसरा एक तरूण खेळाडू डेवाल्ड ब्रेविसने पंजाब किंग्सविरूद्धच्या सामन्यात दिमाखदार ४९ धावांची खेळी करून स्वतःचे इरादे दाखवून दिले.

डीबी १९९ धावांचा पाठलाग करण्यासाठी तिसऱ्या स्थानावर आला. सुरूवातीला त्याच्यावर आलेल्या हल्ल्यात त्याची थोडी गडबड झाली. पण त्यातून तो सावरला आणि नंतर आलेल्या प्रत्येक खराब चेंडूला त्याने जाऊ दिले नाही.

डीबीने पॉवरप्लेच्या शेवटच्या ओव्हरमध्ये एक पंच आणि एक ड्राइव्ह मारून आपले दोन चौकार ठोकले. त्यानंतर त्याने त्या रात्रीचा आपला पहिला षटकार ओडियन स्मिथच्या चेंडूवर मिडविकेटवर ठोकला. त्यानंतर अविस्मणीय नववी ओव्हर आली.
राहुल चहरच्या चेंडूवर त्याचा मित्र तिलकने एक धाव काढल्यानंतर डीबीने जोरदार फटकेबाजी सुरू केली. त्याने एक जोरदार चौकार मारून आपली ताकद दाखवून दिली.

दुसऱ्या चेंडूवर डीबीने हेच केले. फक्त या वेळी त्याने चेंडू नजरेच्या टप्प्यात नीट आल्यावर लाँग ऑनवर फटकावून दिला.

चहरने जलदगती आणि शॉर्ट चेंडू टाकून त्याला रोखायचा प्रयत्न केला. पण डीबीने त्याचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडत ही ओव्हर त्या खेळातला सर्वांत मोठा हिट मारून संपवली. त्याना याही वेळी लाँग ऑनवर आणखी एक स्लॉग स्वीप मारला.

डीबीला आपले अर्धशतक पूर्ण करायला फक्त एक धाव कमी पडली. पण त्याच्या बॅटची जादू आणि त्याच्या शॉटचे टायमिंग प्रेक्षकांसाठी एक मेजवानीच ठरले. त्याने प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

टिम डेव्हिड- एसआरएचविरूद्ध ४६, वानखेडे स्टेडियम १७ मे

अत्यंत निर्दयी इनिंगची व्याख्या कोणी विचारली तर टिम डेव्हिडने केलेली ही खेळी कदाचित त्या यादीत पहिल्या स्थानावर येईल.

१९४ धावांचा पाठलाग करताना आम्ही १४.१ ओव्हरमध्ये १२३/३ या परिस्थितीत होतो. आम्हाला ३५ चेंडूंमध्ये ७१ धावांची गरज होती आणि नुकताच तिलक वर्मा बाद झाला होता. ही ओव्हर संपेपर्यंत डॅन सॅम्सदेखील बाद झाला. पण टिम डेव्हिडने किल्ला जोरदार लढवला.

त्याने टी. नटराजनच्या चेंडूंवर दोन जोरदार चौकार मारले आणि एसआरएचच्या गोलंदाजांचा पार धुव्वा उडवला.

अठराव्या ओव्हरच्या सुरूवातीला आम्हाला शेवटच्या तीन ओव्हर्समध्ये ४५ धावांची गरज होती. टिम डेव्हिडने त्यानंतर आपल्या जोरदार फटक्यांचे दुकानच उघडले.

नटराजनने एक वाइड, लो फुल टॉस बॉल टाकून डेव्हिडच्या हातापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. पण या आपल्या फटाक्याने आपल्या लांबलचक हातांचा वापर करून लाँग ऑफवर षटकार ठोकला. आणखी एक फुलटॉस स्क्वेअर लेगच्या मागे ९८ मीटरवर नाहीसा झाला आणि त्याच्या पुढचा बॉलदेखील सीमेपार गेला.

सर्वांत मोठा फटका पाचव्या बॉलवर आला. डेव्हिडने या वेळी आणखी एक धमाका करत चेंडूला लाँग ऑनवर ११४ मीटरवर पाठवला. दुर्दैवाने शेवटच्या चेंडूवर डेव्हिडचा अंदाज चुकला आणि तो बाद झाला.

या अविस्मरणीय ओव्हरमध्ये वानखेडे स्टेडियमने आणखी एका स्टारचा उदय होताना पाहिला.

आमच्या काही नवीन खेळाडूंकडून आणि काही ओळखीच्या खेळाडूंकडून हे स्पेशल परफॉर्मन्स एमआयचे भविष्य चांगल्या हातात असल्याची ग्वाही देतात.