News

“न बघता षटकार कसा मारायचा शिकायचंय तुझ्याकडून”: स्काय डीबीला सांगतो

By Mumbai Indians

त्यांना एकमेकांचं फार कौतुक आहे. त्यांच्यातला एकजण तर चेंडू भिरकावल्यानंतर तो किती लांब गेलाय हे पाहतही नाही. दुसरा फलंदाज मैदानातला एकही कोपरा सोडत नाही. प्रत्येक कोपऱ्यात प्रतिस्पर्धी क्षेत्ररक्षकांना पळवून त्यांना घाम फोडतो. त्यांनी दोघांनी आजपर्यंत एकाही गोलंदाजावर दया दाखवलेली नाही आणि एकही फटका चुकवलेला नाही. स्काय दादा आणि तरूण डीबी आता गप्पा मारतायत तर त्यांची तूफान फटकेबाजी आपल्यासाठी मनोरंजक आहे. फलंदाजीच्या टिप्सपासून ते बटरचिकनपर्यंत, बिर्यानी आणि ५७ चेंडूंमधल्या १६२ धावांपर्यंत त्यांनी प्रत्येक गोष्टीवर गप्पा मारल्या. 

“तुझ्या फलंदाजीची स्टाइल मी कॉपी करायचा प्रयत्न करतोय,” डेवाल्ड ब्रेविस आणि सूर्यकुमार यादव यांनी मुंबई इंडियन्सच्या चॅनलवर एकमेकांसोबत गप्पा मारल्या तेव्हा त्याने सांगितले. “तो न बघता षटकार कसा मारायचा हे तू मला शिकवायलाच हवंस”. 

डीबी खूप उत्साहात होता. तो म्हणाला, “मला नक्कीच आवडेल. माझ्यासाठी तो एक सन्मान असेल आणि मला तुझ्याकडूनही खूप शॉट्स शिकायचे आहेतच. मी तुला एक मजेशीर गोष्ट सांगतो. माझा नो-लुक सहज होतो. विचित्र आहे जरा. सांगू शकत नाही पण आपोआपच होतो. माझे डोके खाली ठेवले तर त्याचा फायदा होईल असे मला वाटते. मग अगदी सहजपणे हे घडून येते.” 

सध्या ब्रेविस खूपच दमदार खेळतोय. त्याने सीएसए टी२० चॅलेंजमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला. त्याने ३५ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले, ५७ चेंडूंमध्ये १६२ धावा केल्या. तब्बल १३ षटकार आणि १३ चौकार. सूर्या तर थक्कच झाला होता! 

“एमआयच्या पेजवर मी पाहिलं की तू ५५ चेंडूंमध्ये १६० पेक्षा जास्त (५७ चेंडूंमध्ये १६२) धावा केल्यास. काय खाऊन काय गेला होतास तू त्या दिवशी?” सूर्याने आपल्या सर्वांच्या मनात असलेला प्रश्न विचारला. 

“मी तर रोजचं ऑम्लेट खाऊन गेलो होतो,” डेवाल्ड हसत म्हणाला. 

“मला काही फार विशेष वाटलं नाही. आपोआप घडलं सगळं. मी त्या क्षणात काय करत होतो हे मलाही आठवत नाही. सगळ्या गोष्टी त्या त्या क्षणात घडल्या. मी प्रत्येक चेंडूवर अगदी योग्य प्रकारे खेळलो. प्रत्येक चेंडूवर मी प्रयत्न केला. शेवटी मी एकाला म्हटलंसुद्धा ‘मी आता पुढच्या प्रत्येक चेंडूवर षटकार मारायचा प्रयत्न करणार आहे. तर तो म्हणाला, तू या इनिंगमध्ये वेगळं काय करत होतास.” 

“आपोआप घडलं सारं. त्या क्षणातच घडलं. माझ्यासाठी खरोखर ती एक खास इनिंग होती.” 

मग दादाचं कौतुक सुरू झालं. आपला दादा सध्या प्रचंड फॉर्ममध्ये आहे. मजेमजेत तो मोठी धावसंख्या उभारून जातो. तो खेळताना असं वाटतं की हा तर त्याच्या डाव्या हाताचा मळ आहे. आपला १९ वर्षीय खेळाडू खरोखर प्रेरित झालाय. आपला नवीन खेळाडू त्याच्या ज्येष्ठ खेळाडूला आदर्श मानत असल्यासारखं वाटतंय. 

“वर्ल्डकपमध्ये तू जे काही खेळलास, संपूर्ण मालिकेत तू ज्या पद्धतीने फलंदाजी केलीस आणि फक्त एका सामन्यापुरती नाही, तू फक्त स्ट्राइक रेट वाढवला नाही, सरासरी वाढवली नाही तर धावांचा पाऊस पाडलास. टी२०चा नंबर १ फलंदाज ठरल्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. याच्याइतकं सुंदर दुसरं काय असणार. मला तुझ्याकडून शिकलंच पाहिजे आणि तुझ्याकडून मला शिकून घ्यायचंच आहे,” ब्रेविस म्हणाला. 

एक गोष्ट मात्र नक्की; स्काय आणि डीबी या दोघांनी मागच्या एका वर्षात खूप प्रगती केली आहे. व्हिडिओ चॅटमधली त्यांची ही केमिस्ट्री अशी असेल तर ते पिचवर आणि तेही वानखेडेवर एकत्र येतील तेव्हा काय होईल याची कल्पनाच केलेली बरी. अंगावर आत्ताच शहारा येतोय! 

पूर्ण व्हिडिओ इथे पाहा