News

झिंम्बाब्वे विरूद्ध भारतः तीन सामन्यांच्या ओडीआयमध्ये केएल राहुलचे भारताच्या कर्णधारपदी पुनरागमन

By Mumbai Indians

भारतीय क्रिकेट संघ गुरूवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत झिम्बाब्वेशी आमनेसामने येणार आहेत.

या मालिकेत भारतात सहा वर्षांनी ५० ओव्हर्सचे क्रिकेट सामने पुन्हा एकदा खेळले जातील. मागील वेळी एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ३-० असा व्हाइटवॉश विजय प्राप्त केला होता.

एशिया कप २०२२ पुढील आठवड्यात सुरू होणार असताना रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासारख्या ज्येष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला आहे तर केएल राहुल, दीपक चहर, शाहबाझ अहमद आणि कुलदीप यादव यांच्यासारखे खेळाडू संघात परतले आहेत.

राहुल आता मर्यादित ओव्हर मालिकेत कर्णधारपदाची धुरा शिखर धवनकडून स्वीकारणार असून धवन आता उपकर्णधार असेल.

दरम्यान, आयोजक झिम्बाब्वे अत्यंत उत्साहात आहे कारण त्यांनी अलीकडेच बांग्लादेशविरूद्ध २-१ ने मालिका जिंकली आहे. या संघाने श्रीलंकेवर २०१७ मध्ये ३-२ ने विजय प्राप्त केल्यानंतर हा संघाचा पहिला दुहेरी एकदिवसीय मालिकेतील विजय होता.

झिम्बाब्वे विरूद्ध भारताची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ही आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीगचा भाग असेल.

या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेपूर्वी काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे:

मालिकांच्या विजयात भारताचे वर्चस्व

भारताने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत झिम्बाब्वेवर मोठे वर्चस्व गाजवले आहे. त्यांनी खेळलेल्या ६३ सामन्यांपैकी ५१ सामने जिंकले आहेत. झिम्बाब्वेने भारतावर १० विजय प्राप्त केले असून त्यांनी भारतावरील शेवटचा विजय २०१० मध्ये हरारे येथे मिळवला होता.

याशिवाय भारताने झिम्बाब्वेविरूद्ध मागील १२ एकदिवसीय सामने जिंकले आहेत.

झिम्बाब्वेची गती

झिम्बाब्वेने बांग्लादेशविरूद्धची एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकल्यामुळे या टीममध्ये आत्मविश्वास भरलेला आहे. त्यांनी आपला शेवटचा विजय २०१५-१६ मध्ये नोंदवला होता.

सिकंदर रझा (बांग्लादेशविरूद्ध एकदिवसीय मालिकेत २५२ धावा) आणि रिचर्ड गारावा (मागील १० ओडीआयमध्ये १४ विकेट्स) यांचा उत्तम फॉर्म भारताविरूद्ध एकदिवसीय मालिकेतील विजयासाठी झिम्बाब्वेला उपयुक्त ठरेल.

या खेळाडूंवर लक्ष ठेवा

शुभमन गिल झिम्बाब्वे विरूद्ध भारत एकदिवसीय मालिकेत शिखर धवनसोबत सलामीला उतरेल अशी अपेक्षा आहे. हा २२ वर्षीय खेळाडू वेस्ट इंडिजविरूद्ध उत्तम कामगिरी करून प्रेक्षकांच्या नजरेत भरला होता. त्याने १०२.५० च्या सरासरीने २०५ धावा कुटल्या. झिम्बाब्वेविरूद्ध जोरदार खेळी केल्यास गिलची भारताच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत निश्चित कायमस्वरूपी निवड होऊ शकते.

झिम्बाब्वेसाठी ल्यूक जोंगवेवर भारताविरूद्ध विकेट्स घेण्याची जबाबदारी असेल. तेंडाई छतारा आणि ब्लेसिंग मुझराबानी दुखापतग्रस्त होऊन बाहेर पडल्याने, ३१ सामन्यांमध्ये २५ विकेट्स घेतलेला जोंगवे शिखर धवन आणि भारतीय कर्णधार केएल राहुल अशा तगड्या खेळाडूंवर कशी मात करतो हे पाहणे रंजक ठरेल.

झिम्बाब्वे विरूद्ध भारत एकदिवसीय मालिका हरारे स्पोर्ट्स क्लबवर खेळवली जाईल. ही पहिली एकदिवसीय मालिका गुरूवार १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२.४५ वाजता सुरू होईल.