News

DCvMI रिपोर्ट: अमन कौरच्या खेळामुळे डब्ल्यूपीएल इतिहासात पाठलाग करताना आपला पहिला पराभव

By Mumbai Indians

“वरच्या फळीने फार जास्त योगदान न देताही आपल्याला १६० धावा करता आल्या ही सकारात्मक गोष्ट आहे,” दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध झालेल्या अटीतटीच्या धावांच्या पाठलागानंतर नाराज झालेली कप्तान कौर एकटीच नव्हती. तिने असायलाही नको होते. डब्ल्यूपीएलमध्ये पाठलाग करत असातना मागच्या दोन सीझनमध्ये हा मुंबई इंडियन्सचा पहिला पराभव असला तरी आपल्या फलंदाजांनी १९३ धावांचा पाठलाग करताना खूप लढा दिला. चला तर बघूया हा सामना कसा झाला ते.

वस्त्रकार, साईका यांनी मधल्या टप्प्यात खेळ सावरला

शफाली वर्मा (१२ चेंडूंमध्ये २८ धावा) आणि मेग लॅनिंग (३८ चेंडूंमध्ये ५३ धावा) यांनी पॉवर प्लेमध्ये चेंडू फटकवायला सुरूवात केली, फक्त पाच ओव्हर्समध्ये त्यांनी ५० धावा केल्या तेव्हा २०० धावा सहजपणे पार होतील असे वाटत होते. परंतु मधल्या ओव्हर्समध्ये पूजा वस्त्रकारने केलेल्या स्मार्ट गोलंदाजीमुळे एमआयला खेळावर पुन्हा वर्चस्व मिळवता आले आणि एका टप्प्यावर त्यांना दिल्लीला १८० धावांवर रोखता आले. तिने चार ओव्हर्समध्ये १/२० अशी कामगिरी केली आणि तिच्यासोबत साईका ईशाकनेदेखील चार ओव्हर्समध्ये १/२९ अशी कामगिरी केली. त्यामुळे त्यांना सामना ताब्यात घेता आला नाही. पण... जेमिमा रॉड्रिक्सने या वेळी कमाल केली. तिने ३३ चेंडूंमध्ये ६९ धावा करताना आठ चौकार आणि तीन षटकार मारले. त्यामुळे डेथ ओव्हर्समध्ये सामना आपल्या हातातून खूप लांब गेला.

हायलीचा धडाका

पहिल्या ओव्हरमध्ये यस्तिका भाटिया बाद झाली. नॅट स्किव्हर ब्रंट दुसऱ्या ओव्हरमध्ये पॅव्हिलियनला परतली. हरमनप्रीत तिसऱ्या ओव्हरमध्ये आऊट झाली. पॉवर प्ले संपेपर्यंत हायली मॅथ्यूजदेखील गेली होती. परंतु तिने हवा असलेला रन रेट कायम राहील याची काळजी घेतली, आक्रमक खेळ केला आणि कॅपिटल्सच्या गोलंदाजांना दबावाखाली ठेवले. तिच्या १७ चेंडूंमधल्या २८ या छोट्याशा खेळातदेखील लढा कायम राहील याची काळजी घेतली गेली.

पुढच्या कौर- युगाचा प्रारंभ, अमनज्योतचे आगमन!

मुंबईच्या वरच्या फळीतल्या फलंदाजांनी लीगच्या पहिल्या टप्प्यात सामने संपवले आहेत. त्यामुळे खालच्या फळीकडे फारसे काही करण्यासारखे नव्हते. परंतु, संधी मिळाल्यावर, जागा मिळाल्यावर अमनज्योत कौर आक्रमणाला तयारच होती. तिने २७ चेंडू झेलले, त्यात सात चौकार मारून ४२ धावा केल्या आणि एमआयच्या यशाची आशा संपूर्ण कालावधीत जिवंत ठेवली. तिने या सीझनचे काही सर्वोत्तम शॉट्स मारले, या सीझनमधले सर्वाधिक धाडसी शॉट्स होते. तिने शिखा पांडेचा प्रचंड वेगाने आलेला शॉर्ट चेंडूदेखील रिव्हर्स स्वीप मारून सीमेपलीकडे जाईल याची काळजी घेतली.

तर, पलटन आपल्याला धावा कमी पडल्या असतील आणि आपण पहिल्या क्रमांकावरून खाली आलो असलो तरी आपण अजूनही पहिल्या तीन क्रमांकावर आहोत. परत येण्यासाठी काय हवे आहे हे आम्हाला माहीत आहे आणि आपण किती पटकन पुन्हा वर येतो हेदेखील तुम्हाला माहीत आहे. असे सामने येतात आणि जातात. येत्या गुरूवारी (६ मार्च) आपण पुन्हा मैदानात आहोत. यूपी वॉरियर्झला हरवून विजयमार्गावर पुन्हा जाण्यासाठी सज्ज आहोत.

थोडक्यात धावसंख्याः दिल्ली कॅपिटल्स १९२/४ (२० ओव्हर्स) (जेमिमा रॉड्रिग्स ६९*(३३), मेग लॅनिंग ५३(३८); पूजा वस्त्रकार १/२०) कडून मुंबई इंडियन्सचा २९ धावांनी पराभव १६३/८ (२० ओव्हर्स) (अमनज्योत कौर४२(२७), हायली मॅथ्यूस २९ (१७); जेस जॉन्सन ३/२१)