News

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकाः दुसऱ्या टी२०आयचे पूर्वालोकनः आपल्या मेन इन ब्लूसाठी पुनरागमनाची संधी

By Mumbai Indians

भारतीय पुरूषांची टीम कटकला बाराबती स्टेडियमवर रविवारी १२ जून रोजी खेळणार असताना दक्षिण आफ्रिकेविरूद्ध त्यांना पहिल्या सामन्यात बसलेल्या धक्क्यावर मात करण्याची आशा आहे. 

आगामी सामना हा २०१७ नंतर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटचे या ठिकाणचे पुनरामगनही ठरेल. भारताचा या मैदानावरील रेकॉर्ड संतुलित आहे- एक विजय आणि बरोबरीत. 

आगामी टी२० सामन्यापूर्वी काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणेः 

ईशानने वेळ साधली आहे 

आपले रोहित शर्मा आणि केएल राहुल भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी२०आय मालिकेत सहभागी होणार नसताना ईशान किशनने फक्त ४८ चेंडूंमध्ये ७६ धावा टोलवून आपण धुरा सांभाळू शकतो हे दाखवून दिले आहे. 

भारताच्या ११ इनिंग्समध्ये हे त्याचे दुसरे अर्धशतक होते. अलीकडेच झालेल्या टाटा आयपीएलमध्ये त्याने ४१८ धावा काढून सर्वाधिक धावा फटकावण्याचा मान त्याने मिळवला. त्याने हीच कामगिरी पुढे सुरू ठेवली आहे. 

गोलंदाजीत बदल? 

ऋषभ पंत आणि भारतीय टीम पहिल्या टी२०आयमध्ये हार पत्करल्यानंतर आपल्या गोलंदाजांवर पुन्हा एकदा विचार करेल आणि त्यांच्याकडे उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग हे दोन अत्यंत प्रतिभाशाली जलदगती गोलंदाज आहेत. त्यांना वाइल्डकार्ड मिळू शकते. 

टाटा आयपीएल २०२२ सीझनमध्ये मलिकने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याने कितीतरी वेळा ताशी १५० किमी वेगाने गोलंदाजी केली आणि अर्शदीपने सामन्याच्या सर्व टप्प्यांमध्ये गोलंदाजीवरील नियंत्रण आणि क्षमता यांद्वारे सर्वांवर प्रभाव टाकला. 

डेव्हिड मिलरची तडाखेबाज खेळी सुरूच 

दक्षिण आफ्रिकन स्टार डेव्हिड मिलरने गुजरात टायटन्ससोबत टाटा आयपीएलच्या सामन्यांमध्ये अप्रतिम कामगिरी केली. त्याने हीच कामगिरी आंतरराष्ट्रीय पटलावरही कायम ठेवली आहे. त्याने मागच्या सामन्यात प्रोटीआजना ३१ चेंडूंमध्ये नाबाद ६४ धावांचा पाऊस पाडला आणि विजय मिळवून दिला. 

फक्त २२ चेंडूंमध्ये त्याने अर्धशतक पूर्ण केले. बॅट हातात असली की तो खूप धोकादायक ठरू शकतो हे मिलरने दाखवून दिले आहे. दुसऱ्या टी२०आयपूर्वी भारताला हे काळजी वाटण्याचे कारण नक्कीच आहे. 

मालिका एका रोमहर्षक कॉन्टेस्टसह सुरू झाली. आता या सामन्यात आणखी धमाल येईल याची आम्हाला आशा वाटते.