News

प्लेऑफ्समध्ये पात्र म्हणजे #PlayLikeMumbai स्टाइल ना भावांनो

By Mumbai Indians

आपल्या पोरांनी काल संध्याकाळी दिल्ली कॅपिटल्सवर तब्बल ५९ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे ते हातात एक सामना ठेवून प्लेऑफ्समध्ये आले आहेत! 🤩

आपल्याला प्रथम फलंदाजी करायला सांगितली आणि त्यांच्या संघाने उत्तम गोलंदाजी केली. परंतु आपण मुंबई इंडियन्स आहोत. आपल्याला #PlayLikeMumbai आवडते! 🤓

अठराव्या ओव्हरमध्ये १३२/५ वरून सामन्याच्या शेवटी आपण १८०/५ पर्यंत दौड मारली. स्काय आणि नमन यांनी केलेल्या तोडफोडीमुळे आपल्याला ही चांगली धावसंख्या उभारता आली.

मग काय? आपल्या गोलंदाजांनी चांगलीच कमान सांभाळली. संपूर्ण सीझनमध्ये त्यांनी आपल्या सुंदर खेळाचे प्रदर्शन घडवले आहे आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांना एकेक धाव काढण्यासाठी घाम फोडला आहे.

थोडक्यात सांगायचे तर आपण त्या १८ व्या ओव्हरनंतर केलेली क्लास कामगिरी पुन्हा पुन्हा बघायलाच हवी! 😉 चला तर मग…

१९ वी ओव्हर म्हणजे नमन धीरचा शो 👊

या ओव्हरमध्ये तब्बल २७ धावा कुटल्या गेल्या. चाबूक फलंदाजी काय असते हे बघायचं असेल ही ओव्हर विसरू नका!

**********

विसाव्या ओव्हरमध्ये सूर्या तळपला 🌞

आणखी २१ धावा करून सूर्याने पार्टीला चाल चांद लावले! *स्काय म्हणाला... एकट्या नमननेच का म्हणून मज्जा करायची? 😏

**********

चहर बोले तो कहर... पहिल्या चेंडूपासूनच! 🤌

१८० धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या फाफ डू प्लेसिसची विकेट दुसऱ्याच ओव्हरला पडली. आपल्याला अशीच तर सुरूवात हवी होती!

**********

⚡ + 🃏 = पॉवरप्लेमध्ये डीसीच्या तीन विकेट्स गायब

केएल राहुल आणि अभिषेक पटेल हे फॉर्ममध्ये असलेले फलंदाज लवकर बाद झाले. ही मुंबई स्टाइल नाही तर दुसरं काय आहे!

**********

पुन्हा एकदा सँटेरिफिक परफॉर्मन्स! 🌪️

४ ओव्हर्स • ११ धावा • ३ विकेट्स • १६ डॉट चेंडू… इतकं बास की अजून सांगू!

**********

डीसीच्या फलंदाजीला बूमचे खिंडार 💥

कठीण वेळी मदत हवीय तर बुमराह आहे ना... त्याने ३.२ ओव्हर्समध्ये १२ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्यात

**********

पिक्चर परफेक्ट 🖼️

आपल्या कामगिरीचे थोडक्यात वर्णन!

**********

ती जिंकल्यानंतरची भावना 🥳

आपण जिंकलो ना हार्दिकदादा!

**********

वानखेडेवरचा आयपीएल २०२५ चा शेवटचा सामना अविस्मरणीय होता 💙

पलटन, प्लेऑफ्सलाही असाच सपोर्ट करा. प्लीज... जराही हात आखडता घेऊ नका!