आयपीएल २०२७ च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सकडून संघरचनेची अधिकृत घोषणा

आयपीएल २०२७ च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सकडून संघरचनेची अधिकृत घोषणा

By Mumbai Indians

इंडियन प्रीमियर लीगच्या २०२७ हंगामासाठी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने आज संघरचना आणि खेळाडूंच्या अदलाबदलीबाबत अधिकृत घोषणा केली.

नव्या हंगामाच्या तयारीला सुरुवात करताना मुंबई इंडियन्सने अनुभवी खेळाडूंची भक्कम फळी कायम ठेवली असून, त्यांना उदयोन्मुख प्रतिभावान खेळाडू आणि नव्याने संघात दाखल झालेल्या खेळाडूंची साथ लाभणार आहे. आगामी लिलावाच्या माध्यमातून संघाला आणखी बळकटी देण्याची आणि सध्याच्या भक्कम पायावर अधिक सक्षम संघ उभारण्याची संधी मुंबई इंडियन्सला मिळणार आहे.

आयपीएल २०२७ च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघात कायम असलेले खेळाडू:

(इंग्रजी वर्णानुक्रमानुसार)

  1. अर्शदीप सिंग (ट्रेडद्वारे संघात दाखल)
  2. अश्वनी कुमार
  3. कॉर्बिन बॉश
  4. जसप्रीत बुमराह
  5. मिचेल सँटनर
  6. नमन धीर
  7. क्विंटन डी कॉक
  8. रघु शर्मा
  9. राज अंगद बावा
  10. रोहित शर्मा
  11. रायन रिकेल्टन
  12. शार्दुल ठाकूर
  13. शेरफेन रदरफोर्ड
  14. सूर्यकुमार यादव
  15. तिलक वर्मा
  16. विल जॅक्स

आगामी हंगामात मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग नसलेले खेळाडू

(इंग्रजी वर्णानुक्रमानुसार)

  1. ए. एम. गझनफर
  2. अथर्व अंकोलेकर
  3. दानिश मालेवार
  4. दीपक चहर
  5. हार्दिक पांड्या (ट्रेडद्वारे संघातून बाहेर)
  6. केशव महाराज
  7. क्रिश भगत
  8. महिपाल लोमरोर
  9. मयंक मार्कंडे
  10. मयंक रावत
  11. मोहम्मद इझहार
  12. रॉबिन मिंझ
  13. रुचित अहिर
  14. ट्रेंट बोल्ट

या सर्व खेळाडूंनी संघासाठी दिलेल्या योगदानाची मुंबई इंडियन्स कृतज्ञतेने दखल घेते आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देते.

आगामी वाटचाल

संघाचा भक्कम पाया तयार असून, आगामी लिलावाच्या माध्यमातून संघाला आणखी बळकटी देण्यावर, संघाच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यावर आणि आयपीएलच्या आणखी एका चुरशीच्या हंगामासाठी सक्षम संघ उभारण्यावर मुंबई इंडियन्सचा भर असेल.

मुंबई इंडियन्स आणि #OneFamily यांची ओळख असलेली मूल्यं आणि संघातील सातत्य जपत संघरचना अधिक सक्षम करण्यावर मुंबई इंडियन्सचं लक्ष केंद्रित असेल.