News

“आजच्या निकालाने निराश झालोय पण प्लेऑफ्सपर्यंत पोहोचणे ही मोठी कामगिरी आहे”: बाऊचर

By Mumbai Indians

या सीझनने सर्व चाहत्यांना भावनांच्या रोलर कोस्टर राइडवर नेले. मग तो आनंद असो, निराशा असो, उत्साह असो किंवा वेडेपणा असो आणि त्यानंतर काळजाचे तुकडे होणे असो. चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध अंतिम फेरीतला सामना आपली प्रतीक्षा करत होता. परंतु गुजरात टायटन्सच्या शुभमन गिलसारखा अप्रतिम खेळाडू आपल्याला अडवायला उभा राहिला आणि आपले सातवा आयपीएल अंतिम सामना हुकला. परंतु, पलटनला या सीझनमधून एक गोष्ट नक्की मिळेल. ती म्हणजे आमच्या खेळाडूंचा अभिमान आणि त्यांच्यावरील निरतिशय प्रेम.

मार्क बाऊचर, आपले मुख्य प्रशिक्षक सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत या सीझनमध्ये शेवटच्या वेळी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उपस्थित होते.

“हो, माझ्या मते २३३ ही जरा जास्तच धावसंख्या होती. साधारण २५ ते ३० धावांनी जास्त. ही थोडी अस्वस्थ करणारी बाब होती कारण ईशान कशा प्रकारे खेळेल याची आम्हाला खात्री नव्हती. नेहलने आम्ही केलेल्या सराव सामन्यांमध्ये सलामी फलंदाजी केली आणि आक्रमक खेळ केला. त्याची खरोखर गरज होती. आज तशाच प्रकारचा खेळ करण्चाी आवश्यकता होती. हे आमच्यासाठी नेहमीचे नाहीये. पण हे टी२० क्रिकेट आहे आणि आपल्याला परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. आज सामना नियंत्रणाबाहेर गेला आणि ही गोष्ट आम्हाला अस्थिर करणारी ठरली,” ते सामन्याविषयी बोलताना म्हणाले

नेहल लवकर बाद झाला. माझ्याया मते ग्रीनसुद्धा लवकर बाहेर गेल्यामुळे आम्ही थोडे अस्थिर झालो. त्याच्या हाताला दुखापत झाली आणि तो बाहेर गेला. सुदैवाने तो नंतर पुन्हा जाऊन फलंदाजी करू शकला आणि त्याने साधारण १५ व्या ओव्हरपर्यंत आम्हाला बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत आणून ठेवले होते. दुर्दैवाने आम्ही खूप जास्त विकेट्स गमावल्या. त्यामुळे फलंदाजीच्या दृष्टीकोनातून आमची आज पडझड झाली असे म्हणता येईल. आम्ही १५ व्या ओव्हरपर्यंत चांगला खेळ केला. आमचा एखादा फलंदाज शेवटपर्यंत खेळू शकला असता तर आम्ही एकूण धावसंख्येच्या खूप जवळ येऊन पोहोचू शकलो असतो.  

पण ते ज्या प्रकारे खेळले त्यामुळे मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. आम्ही मैदानात जाऊन एकदोन विकेट्स गमावून सामना सोडून येऊ शकलो असतो. पण संघाचा खेळ बघता भविष्यासाठी हे चांगले चिन्ह आहे. चेंजिंग रूममधला उत्साह आणि ते ज्या प्रकारे, विशेषतः फलंदाजीत स्वतःला सिद्ध करत आहेत हे पाहणे आनंददायी आहे. ”

हे आयपीएल आमच्यासाठी रोलरकोस्टर ठरले. आम्ही उतारांपेक्षा जास्त चढ पाहिले. सीझनबाबत एकूणात मत विचारले असताना ते म्हणाले की, सर्वप्रथम, हा अनुभव खरोखर चांगला होता. मला त्याने खूप आनंद झाला. ड्रेसिंग रूममध्ये चांगली टीम तयार झाली. सपोर्ट स्टाफही खूप चांगला आहे. त्यांच्याकडे खूप अनुभव आहे. ही एक कठीण, खूप कठीण स्पर्धा आहे. क्रिकेटचा सामना जिंकण्यासाठी खूप मेहनत लागतेआपण अनेक चांगल्या टीम्सविरूद्ध खेळत असतो आणि हार किंवा जीत होऊ शकतेत्यामुळे ही स्पर्धा खूप तणाव निर्माण करणारी आहे. परंतु प्लेऑफ्सपर्यंत पोहोचणे ही एक मोठी कामगिरी आहे. अर्थातच, आजच्या निकालाबाबत मी निराश आहे परंतु आम्ही अगदी शेवटपर्यंत लढा दिला असे मला वाटते.”

त्यांना गोलंदाजीबाबतही विचारण्यात आले. हा विभाग फलंदाजीइतका नक्कीच मजबूत नाहीये. आमच्या गोलंदाजांबाबत सांगायचे झाल्यास माझ्या मते तुम्ही त्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहायला हवे. वानखेडेवर आम्ही केलेली आणि पाठलाग केलेली धावसंख्या पाहायला हवी. कधीकधी आपण आकडेवारीकडे पाहिले तर आपल्याला वाटते की गोलंदाजांनी खूपच धावा दिल्या. हो, काही विभागांमध्ये किंवा काही सामन्यांमध्ये आम्ही अधिक चांगली गोलंदाजी करू शकलो असतो. आमच्याकडे अननुभवी गोलंदाज आहेत. त्याचाही फरक पडला

पण आम्ही खूप चांगली चर्चा केली आणि स्पर्धा जसजशी पुढे गेली तसतसे आम्ही खूप सुधारणाही केली असे माझे मत आहे. आम्ही २०० पेक्षा जास्त धावा केल्या आणि २०० पेक्षा जास्त धावांचा पाठलागही केला. परंतु, वानखेडेवर खेळणाऱ्या सर्वांनाच हे माहीत आहे की ही पिच फलंदाजीसाठी उत्तम आहे. कधीकधी मला गोलंदाजांसाठी वाईट वाटते. कधीकधी २०० पेक्षा जास्त धावसंख्या तुमचा आत्मविश्वास डळमळीत करू शकते.आमच्या काही गोलंदाजांबाबत तसे घडले असावे. परंतु, आम्ही २०० पेक्षा जास्त धावांचा पाठलागही करत होतो. त्यामुळे या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे. ”

बाऊचरला रोहित शर्माच्या फॉर्मबाबतही विचारण्यात आले. त्याचा फॉर्म दुर्दैवाने या सीझनमध्ये फार चांगला नव्हता. तो म्हणाला की, रोहित हा एक दर्जैदार खेळाडू आहे. आम्हाला ज्या प्रकारे खेळायचे आहे त्यानुसार तो अगदी पुढाकार घेऊन नेतृत्व करतो असे मला वाटते. या सीझनमध्ये आमची फलंदाजी उत्कृष्ट होती असे माझे मत आहे. आम्ही सीझनच्या सुरूवातीला बाहेरच गेलो होतो. पण नंतर आम्ही आकडेवारी पाहिली आणि सामन्याच्या काही भागांमध्ये सुधारणा होऊ शकते असा विचार केला. कर्णधारच पुढाकार घेऊन या गोष्टीवर काम करू शकतो

त्यामुळे मागच्या सीझनच्या तुलनेत पॉवर प्लेमध्ये आम्ही ज्या प्रकारे कामगिरी केली ते पाहता ते १० मध्ये आम्ही धावसंख्येचा दर वाढवला आणि चांगले क्रिकेट खेळलो. यामुळे आम्ही चांगल्या स्थितीत आहोत कारण मुलांना त्यातून खूप आत्मविश्वास मिळेल. दुर्दैवाने टी२० सामना अनेकदा कठीण असतो आणि आज आम्ही आमच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करू शकलो नाही. गिलने देखणी इनिंग खेळली. दुर्दैवाने आज आम्हाला चांगले खेळता आले नाही आणि टी२० क्रिकेटमध्ये हे होतच असते. ”

डेवाल्ड ब्रेविसला या सीझनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. परंतु त्याला महत्त्वाच्या सामन्यासाठी संघात का घेतले गेले नाही याबाबत बाऊचरचे मत अगदी स्पष्ट होते. आम्हाला संघात सातत्यपूर्णता हवी होती. मला डेवाल्डसाठी वाईट वाटते. त्याने एकही सामना खेळाला नाही परंतु या वेळी अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूदेखील बाजूला बसले होते. डेवाल्ड तरूण आहे. त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर संधी मिळतील. आम्ही संघात सातत्यपूर्णतेचा विचार केला. दोन एकामागून एक तणावाखालील सामने जिंकलेल्या टीममध्ये बदल करण्याचे कोणतेही कारण नव्हतेत्यामुळे, हा योग्य निर्णय ठरला नसता असे मला वाटते.”

या सीझनमध्ये अनेकांना बरेच काही शिकायला मिळाले. सर्व भागांमध्ये टीमने केलेल्या सुरूवातीच्या तुलनेत ती आता खूपच मजबूत होती. बाऊचरला संघाने केलेल्या लढाईबद्दल खूप अभिमान वाटत होता. गोलंदाजीमध्ये तुम्ही तुमचे दोन स्टार्स गमावता. त्यामुळे थोड्या अडचणी वाढणार होत्याच आणि आम्ही त्या जास्तीत जास्त दुरूस्त करायचा प्रयत्न केला. खेळाडू लवकर आपल्या दुखापतीतून बरे होतील अशी आशा आहे कारण ते बरे झाले नाहीत तर आम्हाला दुसऱ्या पर्यायांचा विचार करावा लागतो आणि त्याबद्दल अनेक गोष्टींची चर्चा करता येते. मला आता त्याबद्दल फार विचार करायचा नाही कारण तो मूर्खपणा ठरेल. आता जरा शांत बसून थोडा विचार करणे, भावनेतून बाहेर येणे आणि सगळे शांत झाल्यावर आणि विशिष्ट व्यक्ती आणि फिटनेसच्या दृष्टीकोनातून त्यांची स्थिती पाहून त्यांच्या भविष्याचा अंदाज आल्यानंतर योग्य ते निर्णय घेणे महत्त्वाचे वाटते.  

आता सगळे संपले आहे. २०२३ वर पडदा पडला आहे. आपण आणखी मजबूत, शक्तिशाली आणि ताकदवान होऊन येईपर्यंत आपण या अटीतटीचा खेळ करणाऱ्या, लढवय्या टीमची आठवण मनाच जागवत राहूया.