News

आला रे: आयपीएल लवकरच येत असल्याची भावना

By Mumbai Indians

फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. याचाच अर्थ असा की, आमची मुंबई ब्लू अँड गोल्डच्या तालावर ठेका धरण्यासाठी तयार होते आहे. मुंबई लोकलमध्ये रोज प्रवास करणाऱ्या, आमची आयपीएल हायलाइट्स पाहणाऱ्या किंवा जवळपासच्या चहाच्या टपरीवर – हा सीझन आपला आहे अशी चर्चा करणाऱ्या क्रिकेटप्रेमींच्या नजरेत हे दिसते. या मेगा इव्हेंटचा काऊंटडाऊन फेब्रुवारीच्या उत्साहापासून सुरू झाला असून शहर वर्षाच्या आवडत्या कालावधीसाठी सज्ज होत आहे.

वानखेडे स्टेडियमवरील दिवे चमकू लागले असतील किंवा काही कट्टर चाहते आपला लकी जर्सी आणि एमआय झेंडे शोधण्यासाठी कपाट शोधू लागले असतील. लोकांचा उत्साहाला उधाण येऊ लागले आहे. मग ते प्रशिक्षण रील्समधून स्क्रोल करणे असो किंवा “मॅच तिकिटांचा सीन काय आहे?”, “शेड्यूल आले आहे का?” किंवा “आपण सगळे वानखेडेला कधी जायचे?” यावर चर्चा करण्यासाठी व्हाट्सअॅप ग्रुप बनवत असतील. आम्ही शेवटचा विजयाचा अनुभव घेऊन सहा वर्षे झाली आहेत. परंतु #OneFamily मध्ये आगामी सीझनमध्ये आमच्या काही चॅम्पियन्सचे पुनरागमन पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आपला 'कुंग फू' पंड्या, 'हिटमॅन' रोहित, 'मिस्टर 360' सूर्या, 'बूम बूम' बुमराह आणि 'टीव्ही' तिलक - या मुख्य एमआय खेळाडूंसह पलटन पुन्हा एकदा क्विंटन डी कॉकच्या पहिल्या फळीतल्या फटकेबाजीवर नजर ठेवेल. २०१९ आणि २०२० मध्ये दोन वेळा विजेता असलेला कॉक पॉवरप्लेमध्ये दमदार सुरूवात करेल. तसेच, प्रतिस्पर्धी संघांच्या छातीत धडकी भरवणारा आपला फिरकी गोलंदाज मयंक मार्कंडेही यावेळी खेळेल.

अष्टपैलू मनोरंजनासाठी मुंबई इंडियन्सचा संघ कायमच आघाडीवर राहिला आहे. २०२६ च्या सीझनमध्ये एमआय लॉर्ड शार्दुल ठाकूर आणि शेरफाने रूदरफोर्ड या दोन पॉवरहाऊसना खेळवेल. म्हणजे जबरदस्त अनुभव आणि बॉक्स ऑफिस हिट.

आता महत्त्वाचे. आयपीएल संघात स्थानिक तडका नेहमीच महत्त्वाचा ठरतो. या वेळी ब्लू अँड गोल्डमध्ये अथर्व अंकोलेकर आपल्या स्वप्नातलं थिएटर असलेल्या वानखेडेवर आपलं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तयार आहे.

तर आता आपण अधिकृतपणे प्री-सीझन मोडमध्ये प्रवेश करत असताना, आमच्या मुंबईचा प्रत्येक कोपरा – अगदी चहाच्या टपरीपासून, वडापावच्या गाड्यापर्यंत, रेल्वे स्टेशनचे नाके आणि जर्सी विकणारे रस्त्यावरील विक्रेते – हे सगळे सज्ज होत आहेत आणि #OneFamily स्पिरिटमध्ये सहभागी होणार आहेत.

तुमची तयारी कुठपर्यंत, पलटन? आहात कुठे? आला की राव सीझन... लागा तयारीला!

मार्च २६ आला ना भावांनो!