सुवर्णस्वप्नांचा ब्लू डीएनए: टी२० विश्वचषकासाठी स्कायचा भारत सज्ज
वानखेडेची डरकाळी जगात घुमणार
अगदी बरोबर! आपला हा लाडका खडूस एमआयच्या बालेकिल्ल्यातून देशाचे नेतृत्व करण्यासाठी पुढे चालला आहे. अर्थात हे आज ना उद्या होणारच होते. स्काय भारतीय संघाचे नेतृत्व करणार असून आमच्या मुंबईचा हा लाडका छोकरा देशासाठी लढायला तयार आहे. अर्थात निळ्या रंगाची छटा वेगळी असली तरी डोळ्यांतले स्वप्न एकच आहेः पहिल्या चेंडूपासून वर्चस्व गाजवणे आणि चषक घरी आणणे. 🏆.
या स्पर्धेसाठी आपला १५ खेळाडूंचा संघ चार एमआय स्टार्सनी परिपूर्ण आहे. त्यांना विजय कसा मिळवायचा हे नीट माहीत आहे. आपला दादा सूर्य फक्त फलंदाजी करणार नाही तर तो रणनीतीही आखेल. तो आपल्या मुंबईची शाणपत्ती गाजवण्यासाठी तयार आहे. कायम दोन पावले पुढे आणि निर्भय असा हा मुंबईचा एटिट्यूड जगाला पाहायला मिळेल. फाइन लेगवर जागतिक दर्जाच्या गोलंदाजांना दूर लोटणे असो वा त्यांना आपण गल्लीतले खेळाडू असल्याची भावना देणे असो. आपला हा मि. ३६० डिग्री मैदानावर अक्षरशः वर्चस्व गाजवतो. २०२४ च्या “त्या” अंतिम सामन्यातल्या कॅचनंतर काय घडणार हे आपल्याला माहीत आहे. स्काय मैदानात असेल तर इम्पॉसिबल हा शब्द डिक्शनरीतून जाऊन तिथे आय एम पॉसिबल हे वाक्य येते. तो अगदी आनंदाने मैदानावर वर्चस्व गाजवतो.
बूम बूम बुमराह. तो फक्त गोलंदाज नाही तर तो खतरनाक गोलंदाज आहे. 😈. बुमराह खेळायला उतरतो तेव्हा सामना पलटला याची खात्री असते. चौकार षट्कार तर सोडाच पण गोलंदाजांना यॉर्करने आपले घोटे बाद होतील का याची किंवा संथ चेंडूवर खेळताच येणार नाही याची भीती असते. मामला गंभीर असतो तेव्हा बुमराह भाऊ खंबीर असतो. तो प्रतिस्पर्धी संघाला आपला कर्दनकाळ वाटतो ते उगाच नाही.
𝐀𝐩𝐧𝐞 𝐌𝐮𝐦-𝐛𝐡𝐚𝐢𝐬 𝐚𝐭 𝐠𝐥𝐨𝐛𝐚𝐥 𝐬𝐭𝐚𝐠𝐞 🌍💪
— Mumbai Indians (@mipaltan) February 5, 2026
Share your wishes for the MI boys for the T20 World Cup 💙 pic.twitter.com/um2DWhgfK2
आपला हार्दिक “कुंग फू” पांड्या काही कमी नाही. तुम्ही त्याच्यावर प्रेम करा किंवा त्याला नाकारा. पण सामन्यात तणाव असताना तुम्ही त्याला विसरू शकत नाही. तो अल्टीमेट क्लच खेळाडू आहे. बाकीचे सगळे घाबरलेल्या स्थितीत असताना तो एकमेव असा खेळाडू आहे ज्याच्याकडे विजयाची गुरूकिल्ली असते. आपण हे २०२४ च्या अंतिम सामन्यात पाहिले. त्याची ती जबरदस्त विसावी ओव्हर, १६ धावांचा बचाव आणि मोठ्या विकेट्स नावावर (हेन्रिच क्लासेन आणि डेव्हिड मिलर) घेऊन त्याने सामना पालटवला. एकाच स्पर्धेत १०० धावा आणि १० विकेट्सची कामगिरी करणारा हा एकमेव खेळाडू आहे. आपल्या टीमसाठी अत्यंत आनंदाने खेळणारा एचपी कठीण परिस्थितीत टीमला विजयापर्यंत नेण्याची क्षमता ठेवतो.
या वेळी आपला स्ट्रीट स्मार्ट पोरगा तिलक “टीव्ही” वर्मा प्रथमच वर्ल्डकपमध्ये खेळणार आहे. दुखापतग्रस्त झाल्यामुळे तो खेळू शकेल की नाही अशी शंका निर्माण झालेली असताना टीव्हीने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वॉर्म अप सामन्यात १९ चेंडूंमध्ये ४५ धावा केल्या. मधल्या फळीत सूर्याला ज्याची गरज असते तो तिलक आहे. एक डावखुरा आक्रमक फलंदाज जो गोलंदाजांची अजिबात तमा बाळगत नाही. पहिल्या दिवसापासूनच एमआयमध्ये खेळणारा टीव्ही मोठ्या स्टेजवरही अशीच कामगिरी करण्यासाठी उत्सुक असेल.
हे चार खेळाडू #OneFamily चे काळीज आहेत आणि ते जागतिक पटलावर खेळणार आहेत. तुम्ही त्यांना पलटनसाठी खेळताना पाहिले आहे आता भारतासाठी खेळताना पाहा.
या वेळी जिंकायचंच आहे, बस्स! 😤