
२०१३ मध्ये #OnThisDay: मुंबई इंडियन्सचे वर्चस्व (पुन्हा एकदा!) – सीएलटी२० चॅम्पियन्स
६ ऑक्टोबर २०१३ 👉 हा दिवस आपल्या पलटनचा प्रत्येक सदस्य आपल्या मनाशी जोडून ठेवतो. कारण या दिवशी जागतिक क्रिकेटला आपले संपूर्ण वर्चस्व दिसले.
ब्लू अँड गोल्डमधल्या आपल्या बॉइजनी दुसरा सीएलटी२० चषक जिंकला आणि हे सिद्ध केले की टी२० क्रिकेटचा विषय येतो तेव्हा मुंबई इंडियन्सचाच पुरता बोलबाला असतो. 😎
अर्थात हे सगळे सोपे नव्हतेच. आपल्या मुलांकडून स्पर्धा हव्या त्या पद्धतीने सुरू झाली नाही परंतु लय गवसली आणि मग सगळे नीट झाले!
ड्वायने स्मिथ आणि रोहित शर्मा यांनी फलंदाजीचे नेतृत्व केले आणि गोलंदाजांना सीमापार टोलवले. स्मिथ इतक्या सुंदर फॉर्ममध्ये होता की त्याने फक्त पाच इनिंग्समध्ये २२३ धावा केल्या आणि मालिकापटूचा पुरस्कार मिळवला. 🔥
मग चालली स्पिनची जादू. आपला लाडका टर्बनेटर हरभजन सिंगने अंतिम सामन्यात कमाल करून दाखवली आणि राजस्थान रॉयल्सच्या संघाला पूर्ण गारद केले. त्याने ४/३२ अशी कामगिरी करून सामनापटूचा किताब मिळवला.
…त्याशिवाय नॅथन कोल्टर नाइलची स्मार्ट कामगिरी आणि गोलंदाजांनी कोणत्याही प्रतिस्पर्धी संघाला टिकूच दिले नाही.
सगळे शांत झाले तेव्हा आपण कामगिरी फत्ते केल होती. जगभरात वर्चस्व दुसऱ्यांदा. आपण २०११ मध्ये हा चषक मिळवला होता आणि २०१३ मधला हा दुसरा विजय टी२० क्रिकेटमध्ये एमआयला एक जागतिक आघाडी देऊन गेला. 🌍
परंतु या दिवशी लोकांच्या भावना आणखी उचंबळून आल्या होत्या. हा फक्त विजय नव्हता तर ही मास्टर ब्लास्टरची त्याच्या लाडक्या टीमसाठी शेवटची मॅच होती. 💙 त्या वर्षी पहिलीवहिली आयपीएल ट्रॉफी मिळवल्यानंतर सीएलटी२० मधला हा विजय या महान खेळाडूला उत्तम निरोपाचा ठरला.
Sachin....You'll be missed!! #SaluteTheLegend here: http://t.co/lAD4cQMMHj #MI pic.twitter.com/a9K0PEgl80
— Mumbai Indians (@mipaltan) October 6, 2013
थोडक्यात सांगायचे तर हा मुंबई इंडियन्सचा खास सीझन होता. आपण शेवटपर्यंत लढा दिला आणि जिंकलो. २०१३ मधली तुमची सर्वांत आवडती आठवण कुठली? आम्हाला कमेंट्समध्ये सांगा … ✍️