
महान रो-को जोडी परतलीय: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या संघाची घोषणा
येत्या १९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाची घोषणा झाली असून आम्हाला तर खूपच आनंद झालाय. तीन ओडीआय आणि पाच टी२०आय सामने होणार आहेत आणि विश्वास ठेवा ही मालिका अत्यंत रोमांचक होईल. 🔥
भारतीय क्रिकेटचे दोन महान खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली या वेळी ओडीआयसाठी सज्ज आहेत. क्रिकेटप्रेमींना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रोहितचे पुल शॉट्स आणि विराटच्या कव्हर ड्राइव्ह्जमधील धमाका नक्कीच आठवत असेल. अर्थात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये विजय मिळवल्याला काही महिने झाले असले तरी ही आठवण आहेच आणि ब्लूमध्ये त्यांना परत पाहण्यासाठी आम्ही तयार आहोत.
𝘿𝙚𝙠𝙝𝙤 𝙍𝙊 𝙖𝙖 𝙜𝙖𝙮𝙖 🥹🇮🇳 pic.twitter.com/pMwv14hAHK
— Mumbai Indians (@mipaltan) October 4, 2025
रोने कर्णधारपदाची धुरा शुभमन गिलकडे सोपवली असली तरी त्याचे ड्रेसिंग रूममधले अस्तित्व सर्वांना आनंद देईल. कल्पना कराः शुभमन गिलची तरूण आक्रमकता नेतृत्व करेल आणि मागील काही दशकांमध्ये भारतीय क्रिकेटचा वारसा पुढे नेणाऱ्या खेळाडूंचे मार्गदर्शन. खूप मज्जा येईल.
अर्थात पार्टी इथेच संपणार नाहीये. टी२०आय संघात आणखी मजा आहे. सूर्यकुमार दादा कर्णधारपद भूषवणार असून त्याच्यासोबत आपले दोन लाडके खेळाडू- तिलक वर्मा जो आशिया कपमध्ये दर्जेदार कामगिरी करून परतलाय आणि आपला लाडका राष्ट्रीय खजिना जसप्रीत बुमराहही खेळणार आहे. 🤩
टीम इंडिया टी२०आय टप्प्यात आशिया कप २०२५ यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर येणार आहे. आपली पोरं टी२० वर्ल्ड कप २०२६ कडे जाताना उत्तम कामगिरी करण्यासाठी तयार आहेत आणि ही मालिका धोकादायक ऑसी संघाविरूद्ध एक उत्तम लिटमस टेस्ट ठरेल.
**********
तीन ओडीआयमध्ये भारतीय संघ
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मो. सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल.
पाच टी२०आयसाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, वरूण चक्रवर्ती, जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅम्सन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.